मुंबई - मुंबईत दिवसेंदिवस वाहनचोरीच्या घटनेत वाढ होत आहे. यामुळे पोलीसही अलर्ट झाले असून टिळक नगर पोलिसांनी ( tilak nagar police ) दोन दुचाकी चोरांना अटक केली असून त्यांच्याकडून 9 दुचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणात आणखी काही महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे.
रोहित पाटील (रा. टिळक नगर) यांची दुचाकी चोरी झाली होती. याबाबत त्यांनी टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला सीसीटीव्ही तसेच खबऱ्यांच्या मार्फत पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला असता त्यांना पुण्यातून अटक करण्यात आली आहे.
त्यांच्याकडून 4 लाख 55 हजार रुपयांची 9 दुचाकी वाहने जप्त करण्यात आली आहे. चोरट्यांनी पवईतून एक, कुर्ला-नेहरुगर येथून दोन, नवी मुंबई येथून दोन तर टिळकनगर येथून चार, वाहने चोरली होती, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील काळे यांनी दिली.
हे ही वाचा - Murder in Dharavi : उपचाराला पैसे नसल्याच्या वादातून सुनेने केली सासूची हत्या