मुंबई: मुंबई पोलीस दलातील अधिकारी सध्या कोणत्या ना कोणत्या कारणावरुन वादाच्या भोवऱ्यात सापडत आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख तसेच माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्यावर देखील अशाच प्रकारचे गंभीर आरोप झाल्यानंतर पोलीस विभाग बदनाम झाले होते नंतर पोलिस विभागाने स्वच्छ प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न केला मात्र पुन्हा एकदा असाच प्रकार समोर आला आहे.
दिलीप सावंतांकडून याप्रकरणी चौकशी
दिलीप सावंत यांनी याप्रकरणी चौकशी केली असता तीन पोलीस अधिकारी वसुलीसाठी सक्रिय असल्याचे त्यांच्या तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर तिघांविरुद्ध एलटी मार्ग पोलीस ठाण्यात आयपीसी कलम 384 आणि 392 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक ओम वनघाटे, सहायक पोलीस निरीक्षक नितीन कदम आणि पोलीस उपनिरीक्षक समाधान जामठाडे या तीन पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला.
व्यापाऱ्यांची पोलीस आयुक्तांकडं तक्रार
आपल्या अधिकाराचा गैरवापर करीत हे तिन्ही अधिकारी लहान मोठ्या व्यापाऱ्यांकडून पैसे उकळायचे. या वसुलीमुळे काही व्यापाऱ्यांनी नाराज होऊन जानेवारी महिन्यात पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्याकडे तक्रार केली होती. यानंतर त्यांनी अतिरिक्त आयुक्त दक्षिण विभागीय आयुक्त दिलीप सावंत यांना या प्रकरणाची चौकशी करण्यास सांगितले होते.
हेही वाचा : D Company re-activates : डी कंपनी पुन्हा सक्रिय मनी लाँडरिंग सिंडिकेटमध्ये डिजिटल वॉलेट, डार्कनेटचा वापर