मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या एका प्रवाशाची बॅग अचानक गहाळ झाली होती. त्या बॅगेत दहा हजार 850 रुपये भारतीय चलन आणि एक हजार अमेरिकन डॉलर होते. अखेर एका सुरक्षा कंपनीच्या तीन कर्मचाऱ्यांनी ही बॅग तेथून घेऊन गेल्याचे निष्पन्न झाल्यानंतर, त्यांच्याविरोधात सहार पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल करून, पोलिसांनी रईस आणि हरेशला अटक केली. त्यांच्या तिसऱ्या साथीदाराचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सुरक्षा कंपणीच्या कर्मचाऱ्यांनी साधला डाव : कांतीलाल हिराणी हे प्रवाशी दोहाहून कतार एअरवेजने सोमवारी संध्याकाळी मुंबईत विमानतळावर आले. विमानतळावर पोहचल्यानंतर हिराणी लेव्हल सिटीसाईड परिसरात आले. तेथे त्यांनी त्यांचे सर्व सामान ट्रॉलीवर ठेवले. काही वेळेनंतर हिराणी त्यांची एक ट्रॉली बॅग घेऊन गेले. तेव्हा ते त्यांची छोटी बॅग घेऊन जायला विसरले. त्या बँगेत दहा हजार 850 रुपयांचे भारतीय चलन तसेच एक हजार अमेरिकन डॉलर, आधार कार्ड आदी साहित्य होते. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी एका पोलिसासह टी-1 येथील नियंत्रण कक्षात जाऊन सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता, तेथील एका सुरक्षा कंपनीच्या कंत्राटावर असलेले तिघे कर्मचारी त्या ठिकाणाहून हिराणी यांची ती बॅग असलेली ट्रॉली घेऊन जाताना दिसून आले.
तिसऱ्या चोराचा शोध सुरु : त्यानंतर सहार पोलिसांनी याबाबत त्या कर्मचाऱ्याकडे बॅगेबाबत विचारणा केली. मात्र त्यांनी बॅगेबद्दल माहिती नसल्याचे सांगितले, त्यामुळे मोहम्मद रईस कुरेशी आणि हरेश पाटील या दोघा कर्मचाऱ्यांना पोलीस ठाण्यात नेण्यात आले. पोलीस ठाण्यात केलेल्या चौकशीत रर्ड्स आणि हरेश यांनी गुन्हा केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे याप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल करून; पोलिसांनी रईस आणि हरेशला अटक केली. त्यांच्या तिसऱ्या साथीदाराचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
तक्रारकर्ता केनियन नागरिक : सोमवारी एका नातेवाईकाच्या लग्नात सहभागी होण्यासाठी दोहाहून मुंबईला आलेल्या २४ वर्षीय केनियन नागरिक असलेल्या कांतीलाल हिराणी यांनी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पार्किंगमधून 1,000 USD अमेरिकन डॉलर आणि 10 हजार ८५० रुपये गमावले होते. तक्रारदार सिव्हिल इंजिनीअरिंगचा विद्यार्थी असून वांशिकतेने गुजराती आहे. तो सोमवारी दुपारी विमानतळावर उतरला आणि पार्किंग स्पॉट – P4 येथे दोन सामानांसह रोख रक्कम असलेली छोटी बॅग घेऊन उभा होता. जेव्हा तो कॅबकडे जाऊ लागला, तेव्हा त्याची बॅग पार्किंगमध्ये राहिली. परंतु आपण ती मागे सोडल्याचे लक्षात येताच तो कॅबसह पार्कींगकडे परतला. बॅग न सापडल्याने त्यांनी विमानतळ अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. नंतर विमानतळ अधिकाऱ्यांनी सहार पोलिसांना याबाबत माहिती दिली.
सहार पोलिसांकडे तक्रार : 'आम्ही पार्किंग लॉटचे सीसीटीव्ही फुटेज तपासले, परंतु बहुतेक अस्पष्ट होते, त्यामुळे आम्हाला संशयितांचे चेहरे ओळखता आले नाहीत. मात्र, आसपासच्या लोकांना विचारपूस केल्याने आम्ही तीन जणांना ताब्यात घेतले. चोरी झाल्यानंतर लगेचच ते घटनास्थळावरून पळून गेले होते,' असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. पीडितेने सहार पोलिसांकडे तीन अनोळखी व्यक्तींविरुद्ध तक्रार दाखल केली, ज्यांनी त्यानंतर तपास सुरू केला. दोन संशयितांना पकडण्यात आले, तर तिसरा शहरातून पळून गेला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
तिघांविरुद्ध गुन्हा दाखल : मोहम्मद रईस कुरैशी, राजपूत कुमार आणि हरेश प्रभाकर पाटील अशी संशयितांची नावे आहेत. ते सर्व विमानतळावर ग्राउंड स्टाफ म्हणून काम करतात आणि खाजगी सुरक्षा एजन्सीद्वारे व्यवस्थापित करतात. फरार झालेला राजपूत कुमार सर्व अमेरिकन डॉलर्स घेऊन उत्तर प्रदेशातील त्याच्या मूळ गावी गेला असल्याचा संशय आहे. या प्रकरणी अद्याप दोन जणांना अटक करण्यात आली आहे. मात्र बुधवारपर्यंत फरार आरोपींला अटक करण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. तिघांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३७९ आणि ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.