मुंबई - मुंबईमध्ये गोवर आजाराचा संसर्ग ( Measles infection in Mumbai ) वाढल्याच दिसून आल आहे. मुंबईतील गोवंडी येथील एम पूर्व विभागात सर्वाधिक गोवरचे रुग्ण सापडले ( Maximum number of measles cases in Mumbai ) असून आतापर्यंत तीन मुलांचा मृत्यू ( Three died of measles ) झाला आहे. या कारणास्तव मुंबई महानगरपालिका, ( Mumbai Municipal Corporation ) राज्य सरकार व आता केंद्र सरकारही सतर्क झाले असून गोवर प्रतिबंधक लसीकरणाची मोहीम ( Measles vaccination campaign ) या विभागामध्ये राबवली जात आहे. परंतु ही मोहीम राबवली जात असताना एकविसाव्या शतकातही आजही अनेक जण ही लस घेण्याऐवजी दरवाजाला कडूलिंबाचा पाला बांधून लस बरी होते असे सांगत, या लसीकडे पाठ ( Citizens neglect of measles vaccination ) फिरवताना दिसत आहेत.
लस न घेतल्याने संसर्गात वाढ - गोवंडीमध्ये गोवरची साथ मोठ्या प्रमाणात फैलावत असल्याने मुंबई महापालिकेसह, राज्य व केंद्रीय यंत्रणा सुद्धा हादरल्या आहेत. आज केंद्रीय,राज्य आरोग्य विभागाच्या टीमने प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देत पाहणी केली. विशेष म्हणजे स्थानीय नागरिकांचा त्यांच्या मुलास लस देण्याबाबत मोठा विरोध आहे. ९० टक्के हा परिसर मुस्लिम बहुल इलाका असल्याने ते आपल्या मुलांना लस देण्यास तयार होत नाहीत. परंतु शासनाकडून पूर्ण प्रयत्न केले जात आहेत. लसीकरणास नकार देणाऱ्या पालकांना पटवून देण्यासाठी स्थानिक नेत्यांची मदत घेतली जात आहे. तसेच मशिदींच्या माध्यमातून सुद्धा याबाबत जनजागृती केली जात आहे. तरीही बऱ्याच प्रमाणात लहान मुले लस घेण्यास पुढे येताना दिसत नाहीत. विशेष म्हणजे याच कारणासाठी परिसरात मोठ्या संख्येने लसीकरण न झालेल्या मुलांमुळे हा उद्रेक झाला आहे. कोविड-19 साथीच्या आजारानंतर, मोठ्या प्रमाणात- स्केल लसीकरण मोहिमेशी तडजोड केली जात असल्याचे दिसून येत आहे.
आजही समाजात अनेक गैरसमजुती - गोवंडी येथील रफी नगर, लोटस या विभागातील घरे दाटीवाटीने असून इथे अस्वच्छता ही मोठ्या प्रमाणात आहे. येथील लोकसंख्येपैकी ९० टक्के लोकसंख्या ही उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश या राज्यांमधून स्थलांतरित आहेत. इथल्या जास्त करून घरात आई, वडील कामावर बाहेर जातात तर, घरी मोठ्या मुलांना लहान मुलांची काळजी घ्यायची असते. जेव्हा त्यांना लसीकरणासाठी बोलवले जाते तेव्हा पालक उपलब्ध नसतात. यामुळे या भागातील मुले लसीकरणापासून वंचित राहण्याचे हे एक महत्त्वाचे कारण आहे. तसेच लसीकरणानंतर काही प्रमाणात ताप येत असल्या कारणाने सुद्धा ते लस घ्यायला बघत नाहीत. इथे राहणारी ४४ वर्षीय रुकसाना बेग, सांगतात की माझी तीन मुलं आहेत. त्यापैकी दोघांना गोवर येऊन गेली आहे. परंतु आम्ही लस घेतली नाही. या अगोदर सुद्धा आमच्या वेळी जेव्हा आम्हाला गोवर झाली होती तेव्हा सुद्धा आम्ही दरवाजाला कडूलिंबाचा पाला बांधायचो. तसेच आता गरम पाण्यामध्ये कडुलिंबाचा पाला टाकून त्याने आंघोळ करतो. ही लस घ्यायची आवश्यकता नाही.कडुलिंबाच्या पाल्याने लस बरी होते.
लसीकरण महत्त्वाचे - गोवर व रूबेला या आजारांपासून मुलांचे संरक्षण करण्यासाठी लसीकरणाची पहिली मात्रा बालकास नऊ महिने पूर्ण झाल्यावर, दुसरी मात्रा १६ महिने पूर्ण झाल्यावर देणे गरजेचे असते. या दोन्ही मात्रा पालिकेचे आरोग्य केंद्र, दवाखाने, सर्व सामान्य रुग्णालयांसह वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये उपलब्ध असतात. पालकांनी आपल्या ९ तसेच १९ महिन्यांच्या बालकांचे लसीकरण पूर्ण करून घ्यायचं आव्हान पालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आल आहे. या विभागातील सामाजिक कार्यकर्त्या शकीला फिरोज खान यांनी सांगितले आहे की, हे लसीकरण यापूर्वीही व्हायचं. यापूर्वीही कडुलिंबाचा पाला गोवर आल्यानंतर दरवाजाला बांधायला जात असे. परंतु आता विज्ञान एवढ पुढे गेलं आहे की, आम्ही सर्वांना विनंती करतो की त्यांनी लसीकरण करावं. आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी जाऊन लसीकरण केले जात आहे. ते त्यांनी करून घ्यावं. कारण हा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असल्याने त्याचा मोठा घातक परिणाम आपल्या मुलांवर होऊ शकतो. त्यामुळे ज्यांना आवश्यकता आहे त्या सर्वांनी लसीकरण करून घ्यावे, असं आव्हानही शकीला खान यांनी केलं आहे.