ETV Bharat / state

Threats To Woman : शिवसेना नेता दिपाली सय्यद यांच्या विरोधात तक्रार करणाऱ्या महिलेला धमकी

author img

By

Published : May 31, 2022, 10:47 PM IST

शिवसेना नेत्या दिपाली सय्यद (Shiv Sena leader Deepali Syed) विरोधात तक्रार करणाऱ्या (who lodges a complaint ) भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांची मोबाईलवर अज्ञात व्यक्तीकडून अश्लील मेसेज आणि अज्ञात व्यक्तीने घेतलेले कर्ज न फेडल्यास अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी (Threats to a woman) दिल्याचा प्रकार समोर आला आहे.

मुंबई: दिपाली सय्यद विरोधात तक्रार करणाऱ्या भाजप पदाधिकारी महिलेच्या मोबाइलवर अनोळखी व्यक्तीने घेतलेले कर्ज फेडण्यास सांगितले आहे. तसेच पैसे न दिल्यास सोशल मिडियावर माॅर्फ केलेले अश्लील फोटो पोस्ट करण्याची धमकी दिली आहे. या प्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात मुंबईच्या वर्सोवा पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम 354 अ, 500, 506, 509 आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2008 कलम 27 अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

दिपाली सय्यद यांच्या विरोधात केलेल्या तक्रारीचा मनात राग ठेवूनच हे कृत्य केले जात असल्याचा संशय भाजप महिला पदाधिकार्याने तक्रारीतून व्यक्त केला आहे. दीपाली सय्यद यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून नरेंद्र मोदींवर आक्षेपार्ह शब्द वापरत टीका केली होती. त्यांचे ट्वीट सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आले होते. त्यानंतर भाजप नेत्यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले होते. दीपाली सय्यद यांच्या टीकेनंतर भाजप महिला आघाडी कडून त्यांच्यावर ओशिवारा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.