ETV Bharat / state

मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी 11 बॉम्ब ठेवल्याबद्दल आरबीआय गव्हर्नरला धमकीचा ईमेल - आरबीआय गव्हर्नरला धमकीचा ईमेल

मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी 11 बॉम्ब ठेवल्याबद्दल आरबीआय गव्हर्नरला धमकीचा ईमेल आलाय. त्यामुळं मुंबईत एकच खळबळ उडाली आहे.

Threatening mail to RBI Governor
आरबीआय
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 26, 2023, 5:46 PM IST

Updated : Dec 26, 2023, 10:55 PM IST

मुंबई : मुंबईतील रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला ई-मेलद्वारे धमकीचा संदेश आल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईत विविध ठिकाणी 11 बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आली आहे. याबाबत आरबीआय कार्यालयाला एक धमकीचा ई-मेल पाठवण्यात आला आहे. खिलाफत इंडिया नावाच्या ई-मेल (khalifatindia@gmail.com) आयडीवरून ही धमकी देण्यात आली आहे. आरबीआय, एचडीएफसी, आयसीआयसीआय बँकेत बॉम्ब ठेवल्याचं मेलमध्ये नमुद करण्यात आलं आहे. आज सकाळी साडेदहा वाजता आरबीआयच्या ई-मेल आयडीवर हा ई-मेल धडकल्यानं तपास यंत्रणांची झोप उडाली आहे.

देशात मोठा घोटाळा : (khalifatindia@gmail.com) या ई-मेलद्वारे काही मागण्याही करण्यात आल्या आहे. RBI गव्हर्नर तसंच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या नावानं देशात मोठा घोटाळा केला जात आहे, असा दावा मेलमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळं निर्मला सीतारामन, भारतीय रिझर्व बॅंकेचे गव्हर्नरांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी या ई-मेलमध्ये करण्यात आली आहे. RBI गव्हर्नर तसंच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राजीनामा न दिल्यास मुंबईतील 11 ठिकाणी बॉम्बस्फोट घडवले जातील, अशी धमकीही देण्यात आलीय. या प्रकरणी मुंबई पोलीस कसून तपास करत असून मेल पाठवणाऱ्याचा शोध घेत, असल्याची माहिती पोलीस उपायुक्त राज तिलक रौशन यांनी दिली आहे.

विविध ठिकाणी 11 बॉम्ब पेरले : आरबीआय गव्हर्नर यांना पाठवलेल्या धमकीच्या मेलमध्ये मुंबईतल्या वेगवेगळ्या ठिकाणी 11 बॉम्ब ठेवल्याची माहिती देण्यात आली आहे. रिझर्व बँक ऑफ इंडियासह खासगी बँकांमध्ये हे बॉम्ब ठेवण्यात आले आहेत. या बँकांनी भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा केल्याचा आरोप मेलमध्ये करण्यात आला आहे. या घोटाळ्यामध्ये आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास, अर्थमंत्री निर्मला सीतारामन तसंच विविध बँकांचे वरिष्ठ अधिकारी, भारतातील मंत्र्यांचा समावेश असल्याचा दावा मेलमध्ये करण्यात आला आहे. याबाबत आमच्याकडं ठोस पुरावे, असल्याचं धमकीच्या मेलमध्ये लिहिलंय. रिझर्व बँक ऑफ इंडिया, न्यू सेंट्रल ऑफिस बिल्डिंग फोर्ट मुंबई, एचडीएफसी हाऊस चर्चगेट मुंबई, आयसीआयसीआय बँक टॉवर्स बीकेसी मुंबई, या तीन ठिकाणी बरोबर दुपारी एक वाजून 30 मिनिटांनी बॉम्बस्फोट होईल, अशी माहिती देखील या मेलद्वारे देण्यात आली आहे.

उल्लेखनिय बाब म्हणजे या कोणत्याही ठिकाणी आज दुपारी कोणताच अनुचित प्रकार घडला नाही. पोलीस मात्र सतर्क झाले असून काळजी घेत आहेत. याप्रकरणी माता रमाबाई आंबेडकर (एमआरए) मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांसह गुन्हे शाखाही या प्रकरणाचा तपास करत आहे. ईमेलचे ठिकाण गुजरातमध्ये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा -

  1. वर्चस्ववादातून चुनाभट्टीत गोळीबार करणाऱ्या चार आरोपींना आठ तासात अटक
  2. जहाजावर ड्रोन हल्ला प्रकरण; भारतीय नौदलानं अरबी समुद्रात केल्या युद्धनौका तैनात
  3. नांदेड रेल्वे स्थानकावर पॅसेंजर ट्रेनला आग; एक डबा जळून खाक

Last Updated : Dec 26, 2023, 10:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.