ETV Bharat / state

औरंगाबाद नामांतर : 5 वर्षे सत्तेत असलेलेच ढोंगीपणा करत आहेत - बाळासाहेब थोरात

author img

By

Published : Jan 17, 2021, 3:29 PM IST

Updated : Jan 17, 2021, 3:36 PM IST

मागील पाच वर्षे एकमेकांसोबत सत्तेत असलेले आज नामांतराचे राजकारण करत आहेत, हा ढोंगीपणा नाही तर काय आहे? केंद्रात आणि राज्यात हे दोघेही मांडीला मांडी लावून सत्ता भोगत होते, तेव्हा यांना नामांतराचा मुद्दा का आठवला नाही? असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला.

Balasaheb Thorat
बाळासाहेब थोरात

मुंबई - औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात धुरळा उडविला जात आहे. शिळ्या कढीला ऊत आणून काही मंडळी आपला स्वार्थ साधू इच्छित आहे. काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर सल्ला देणार्‍यांची संख्या वाढत चालली आहे. मात्र, मागील पाच वर्षे एकमेकांसोबत सत्तेत असलेले आज नामांतराचे राजकारण करत आहेत, हा ढोंगीपणा नाही तर काय आहे? केंद्रात आणि राज्यात हे दोघेही मांडीला मांडी लावून सत्ता भोगत होते, तेव्हा यांना नामांतराचा मुद्दा का आठवला नाही? असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला.

हेही वाचा - दुचाकीची चक्क हातगाडीवरून मिरवणूकः इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे लक्षवेधी आंदोलन

औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर औरंगजेब सेक्युलर असल्याचा युक्तिवाद काँग्रेसकडून करण्यात आला होता. तर, दुसरीकडे नामांतरावरून भाजपही शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहे. अशात शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी रोखठोक सदरातून काँग्रेसला टोला लगावला. यात, जर औरंगजेब कोणाला प्रिय असेल तर त्यांना कोपरापासून साष्टांग दंडवत, असे म्हणत संजय राऊत यांनी काँग्रेसला चिमटा काढला. यानंतर बाळासाहेब थोरात यांनी देखील भाजप आणि शिवसेनेला चिमटा काढत, दोन्ही पक्ष ५ वर्षे सत्तेत असताना त्यांना हा मुद्दा का सुचला नाही, अशी टीका केली.

थोरात पुढे म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबादमध्ये सत्तेत असलेल्या या दोघांनीही खरतर औरंगाबादच्या विकासावर बोलायला हवे. औरंगाबादकरांची तीच अपेक्षा आहे. मात्र, महानगरपालिकेत सत्तेत असलेल्या या दोघांनीही जनतेचा भ्रमनिरास केला आहे, म्हणूनच निवडणुकीच्या तोंडावर त्यांना नामांतराच्या मुद्द्याचा आधार घ्यावा लागत आहे. हे दोन्ही पक्ष नामांतराचा मुद्दा काढून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे फार काळ चालणार नाही. औरंगाबादच्या जनतेलाच आज नामांतरापेक्षा विकास महत्वाचा असल्याचे ते म्हणाले.

यामुळे शिवसेनेने नामांतराचा 'सामना' सुरू केला

राज्यात आमचा सहकारी पक्ष असलेल्या शिवसेनेला आपल्या मतांची चिंता वाटते, त्यामुळेच त्यांनी हा नामांतराचा 'सामना' सुरू केला आहे. भाजपच्या बाबतीत बोलायचे झाल्यास ढोंगीपणा हे त्यांचे स्वभाव वैशिष्ट्यच आहे, त्यामुळे त्यांच्या वागण्या-बोलण्याकडे जनता करमणूक म्हणून बघते. असे थोरात म्हणाले. राहिला प्रश्न छत्रपती संभाजी महाराजांवरील श्रद्धेचा, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव वापरून राजकारण करणाऱ्यांनी आम्हाला छत्रपती संभाजी महाराज समजावून सांगण्याची आवश्यकता नाही. आम्ही मराठी आहोत आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे आमचे आराध्यदैवत आहे. त्यामुळेच आम्ही आमच्या आदर्शाचा मतांची पोळी भाजण्यासाठी वापर करणार नाही, आणि कोणी तो करत असेल तर त्याला कडाडून विरोध करू, असा इशारा थोरात यांनी दिला.

सरकार अस्थिर होईल या भ्रमात राहू नये - थोरात

महाराष्ट्राचे सरकार यामुळे अस्थिर होईल अशा भ्रमात कोणी राहू नये. आम्ही तिन्ही पक्षांनी अत्यंत विचारपूर्वक महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी सरकार बनविले आहे. हे सरकार बनविताना आम्ही सर्वांनी एकमताने किमान समान कार्यक्रम ठरविला आहे. हा कार्यक्रम म्हणजे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा, गरीब माणसाच्या हिताचा विचार आहे. भावनेच्या राजकारणाला त्यात थारा नाही. आमचे सरकार स्थिर आहे, खंबीर आहे. त्यामुळे, कोणालाही उकळ्या फुटण्याचे कारण नाही, असेही थोरात म्हणाले.

हेही वाचा - बर्ड फ्ल्यू : राज्यात एकूण १००० पक्षांचा मृत्यू; तपासणीसाठी नमुने पाठवले

Last Updated : Jan 17, 2021, 3:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.