मुंबई : यावेळी बोलताना पाटील म्हणाले यावेळी बोलताना सत्यजीत तांबे यांच्याबाबत काहीही चर्चा झाली नाही. तसेच, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेभ थोरात यांच्यातही काही चर्चा नाही असही पाटील यांनी यावेळी सागितले आहे. दरम्यान, बाळासाहेब थोरात यांची नाराजी दूर करण्याचे पुर्ण प्रयत्न आम्ही केलेले आहेत असही पाटील यावेळी म्हणाले आहेत. याबेळी बोलताना थोरात यांनी हा आमच्या कुटुंबातील मुद्दा इतकीच प्रतिक्रिया दिली आहे.
सत्यजीत तांबे यांचे अनेक गौप्यस्फोट : नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाल्यापासून काँग्रेस पक्षातील अंतर्गत गोंधळ चव्हाट्यावर येण्यास सुरुवात झाली होती. त्यातच निवडणुकीतील अपक्ष विजयानंतर सत्यजीत तांबे यांनी अनेक गौप्यस्फोट केले. त्यानंतर राज्यातील काँग्रेस नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. हे सगळे सुरू असतानाच थोरात यांनी आपल्या विधानसभेतील गटनेतेपदाचा राजानामा दिला. या घडामोडीनंतर आज थोरात यांची काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी एच.के. पाटील यांनी भेट घेतली आहे.
खर्गे आणि थोरात यांची भेट होणार : हा आमचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यामुळे यावर बाहेर फार काही चर्चेची गरज नाही. तसेच, बाळासाहेब थोरात यांचा राजीनामा मान्य करण्याचा विषयच येत नाही. ते पक्षातील वरिष्ठ नेते आहेत. आजच्या बैठकीत मी थोरातांना विनंती केली की, तुम्ही रायपुरमध्ये होणाऱ्या काँग्रेसच्या बैठकीला उपस्थित राहा. आणि ते या बैठकीला उपस्थित राहतील असेही ते म्हणाले आहेत. यावळी ते काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि थोरात यांची भेट होणार आहे. असेही पाटील यावेळी म्हणाले आहेत.
काय आहे प्रकरण : गेल्या काही दिवसांपासून तांबे-थोरात विरुद्ध नाना पटोले असा संघर्ष काँग्रेसमध्ये पाहायला मिळाला. याच काळात बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर पक्षांतर्गत वाद उफाळून आल्याचे दिसले. नाशिक मतदारसंघात बाळासाहेबांचे भाचे सत्यजीत तांबे निवडून आले. मात्र, उमेदवारीवरून मोठ्या वादळी घडामोडी पाहायला मिळाल्या. सत्यजीत यांचे वडील डॉ. सुधीर तांबे यांना काँग्रेसकडून तिकीट देण्यात आले. पण त्यांनी फॉर्म भरलाच नाही. अखेर सत्यजीत यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला. त्यानंतर हा पक्षांतर्गत वाद वर आला. दरम्यान, निवडून आल्यानंतर आमच्यासोबत हे षड्यंत्र रचले गेले असा अप्रत्यक्ष आरोप सत्यजित तांबे यांनी पटोले यांच्यावर केल्याने थोरात-पटोले असा वाद उभा राहीला.
हेही वाचा : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी अन् वादग्रस्त वक्तव्य; वाचा सविस्तर