ETV Bharat / state

ही मोदींची लाट नव्हे तर त्सुनामी - गोपाळ शेट्टी - urmila matondkar

२०१४ मध्ये मोदी यांची लाट होती मात्र यंदा ती त्सुनामी झाली आहे. या त्सुनामीमध्ये विरोधक पुर्णपणे उद्धवस्त झाले आहेत. देशात मोदींवर जनतेने भरभरून मतदान केले आहे.

ही मोदींची लाट नव्हे तर त्सुनामी
author img

By

Published : May 23, 2019, 11:33 PM IST

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकासाची कामे केली आहेत. २०१४ मध्ये मोदींची लाट होती. मात्र यावेळी ही त्सुनामी होती. या त्सुनामीमध्ये विरोधक उध्वस्त झाले आहेत.अशी प्रतिक्रिया उत्तर मुंबईचे भाजपचे विजयी उमेदवार गोपाळ शेट्टी यांनी व्यक्त केली आहे.

ही मोदींची लाट नव्हे तर त्सुनामी

देशभरात मोदी यांना जनतेने भरभरून मतदान केल्यानेच भाजपला बहुमत मिळाले आहे.गेल्यावेळेपेक्षा यावेळी एनडीएला मिळालेल्या यशाबद्दल आणि आपल्या मोठ्या विजयाबद्दल त्यांनी जनतेचे आभार मानले. मला उर्मिला मातोंडकर यांचे बिलकुल आव्हान नव्हते पण त्या सेलिब्रिटी असल्याने अख्ख्या देशाचे लक्ष या लढतीकडे लागले होते.पण मी पहिल्यापासून माझाच विजय होईल, असे सांगत होतो कारण माझा माझ्या कामावर विश्वास होता, असे शेट्टी म्हणाले.

आज लोकांना विकास कामे हवी आहेत.पण काँग्रेसने ६० वर्षात काय केले असा सवाल करून त्यांनी राहुल गांधीं यांच्यावर जोरदार टीका केली. माझ्या मतदार संघातील गरीब आणि श्रमिक लोकांच्या पाठीशी ठाम उभा होतो आणि आहे.त्यामुळेच जनतेने मला पुन्हा संधी दिली आहे असे सांगितले. महात्मा गांधी यांनी तेव्हाच सांगितले होते की, काँग्रेसमुक्त भारत करा त्याची सुरवात मोदी, शहा यांनी केली आहे, असे म्हणून त्यांनी आता लोकांनी विकासाला स्वीकारले आहे असे ते म्हणाले. भाजपला आव्हान कोणत्याच पक्षाचे नव्हते.मीडियाने त्यांचा बागुलबुवा उभा केला होता.मोदीसारखे खंबीर पुरुष देशाचे नेतृत्व करत असल्याने लोकांनी त्यांना मोठा पाठिंबा दिला असल्याचे सांगून शत्रू राष्ट्रांना मोदी यांनी दिलेला दणका हे पण एक विजयाचे मुख्य कारण असल्याचे ते म्हणाले.

ही मोदींची लाट नव्हे सुनामी आहे- गोपाळ शेट्टी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकासाची कामे केली आहेत.गेल्यावेळी मोदींची लाट होती. मात्र यावेळी ही सुनामी असल्याने त्याने विरोधक उध्वस्त झाले आहेत.अशी प्रतिक्रिया उत्तर मुंबईचे भाजपचे विजयी उमेदवार गोपाळ शेट्टी यांनी 
     देशभरात मोदी यांना जनतेने भरभरून मतदान केल्यानेच भाजपला बहुमत मिळाले आहे.गेल्यावेळेपेक्षा यावेळी एनडीएला मिळालेल्या यशाबद्दल आणि आपल्या मोठ्या विजयाबद्दल त्यांनी जनतेचे आभार मानले. मला उर्मिला मातोंडकर यांचे बिलकुल आव्हान नव्हते पण त्या सेलिब्रिटी असल्याने अख्ख्या देशाचे लक्ष या लढतीकडे लागले होते.पण मी पहिल्यापासून माझाच विजय होईल असे सांगत होतो कारण माझा माझ्या कामावर विश्वास होता असे शेट्टी म्हणाले.
   आज लोकांना विकास कामे हवी आहेत.पण काँग्रेसने 60 वर्षात काय केले असा सवाल करून त्यांनी राहुल गांधीं यांच्यावर जोरदार टीका केली. माझ्या मतदार संघातील गरीब आणि श्रमिक लोकांच्या पाठीशी ठाम उभा होतो आणि आहे.त्यामुळेच जनतेने मला पुन्हा संधी दिली आहे असे सांगितले. महात्मा गांधी यांनी तेव्हाच सांगितले होते की काँग्रेस मुक्त भारत करा त्याची सुरवात मोदी,शहा यांनी केली आहे असे म्हणून त्यांनी आता लोकांनी विकासाला स्वीकारले आहे असे ते म्हणाले.भाजपला आव्हान कोणत्याच पक्षाचे नव्हते.मीडियाने त्यांचा बागुलबुवा उभा केला होता.मोदी सारखे खंबीर पुरुष देशाचे नेतृत्व करत असल्याने लोकांनी त्यांना मोठा पाठिंबा दिला असल्याचे सांगून शत्रू राष्ट्रांना मोदी यांनी दिलेला दणका हे पण एक विजयाचे मुख्य कारण असल्याचे ते म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.