ETV Bharat / state

मुंबईकरांनो सावधान! कोरोनाचे रुग्ण 30 टक्क्यांनी वाढण्याची भीती - corona patients increased in mumbai

मुंबईतील कोरोना रुग्णंसंख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे. जुलै आणि ऑगस्टमध्ये नियंत्रणात आलेली रुग्णसंख्या वाढू लागली आहे. गेल्या काही दिवसांत 2 हजार रुग्ण दररोज आढळून येत आहेत. सप्टेंबर महिन्यात कोरोना रुग्णांमध्ये सरासरी 30 टक्क्यांनी वाढ होऊ शकते, अशी भीती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी व्यक्त केली.

corona patients increased in mumbai
मुंबईत कोरोना रुग्णांमध्ये वाढ
author img

By

Published : Sep 9, 2020, 7:51 PM IST

मुंबई- सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात रुग्णांमध्ये साधारणतः 20 टक्क्यांची वाढ झाली आहे. ही वाढ सप्टेंबरमध्ये खाली येण्याची शक्यता नसून याउलट सप्टेंबरमध्ये 30 टक्के रुग्णांची वाढ कायम राहील. दररोज 2000 ते 2500 दरम्यान कोरोना रुग्ण आढळतील,अशी माहिती खुद्द मुंबई महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे. कोरोनाचा कहर रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना पालिकेकडून करण्यात येत आहेत. वाढत्या कोरोना रुग्णांवर योग्य उपचार करण्यासाठी आरोग्य यंत्रणा-पालिका सज्ज असल्याचेही काकाणी यांनी सांगितले आहे.

जुलै-ऑगस्टमध्ये नियंत्रणात आलेला मुंबईतील कोरोना संसर्ग पुन्हा एकदा वेगाने वाढू लागला आहे.अनलॉक 4 आणि मिशन बिगीन अगेन नंतर घराबाहेर पडणाऱ्याची संख्या वाढली आहे. तर त्याचवेळी मास्क, फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांची ऐशी तैशी मुंबईत सुरू आहे. त्यातच नुकताच गणेशोत्सव पार पडला असून यावेळीही लोक मोठ्या संख्येने एकत्र आले. परिणामी आता मुंबईत कोरोना रुग्णांचा आकडा वाढू लागला आहे.

हेही वाचा-महाराष्ट्राच्या पर्यटन विकासासाठी तरुणांना साद; नवपदवीधरांसाठी एमटीडीसीचा इंटर्नशिप कार्यक्रम

मुंबईत मार्चमध्ये पहिला रुग्ण आढळला आणि त्यानंतर कोरोना रुग्णसंख्या वाढू लागली. सुरुवातीला 50, 100, 500, 1 हजार रुग्ण आढळत होते. त्याच वाढ होऊन 3 हजार रुग्ण आढळत होते. मात्र, पालिका आणि आरोग्य यंत्रणांनी जिवाची बाजी लावत विविध उपाययोजना राबवल्या. परिणामी जुलै-ऑगस्टमध्ये कोरोना बऱ्यापैकी नियंत्रणात आला. 800 ते 1500 दरम्यान रुग्ण आढळत होते. सप्टेंबरमध्ये कोरोनाचा कहर वाढला आहे. आता रुग्णांचा आकडा पुन्हा 2000 पर्यंत जाऊ लागला आहे. त्याचवेळी मुंबईतील अ‌ॅक्टिव्ह रुग्णांमध्येही मोठी वाढ झाली आहे. अ‌ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 20 हजारांवरुन 25 हजारांवर गेली आहे. ही बाब चिंता वाढवणारी आहे. याविषयी काकाणी यांना विचारले असता त्यांनी सध्या 20 टक्क्यांपर्यंत रुग्ण आठवड्याभरात वाढले, असे म्हटले आहे. तर ही परिस्थिती सप्टेंबरमध्ये अशीच राहील अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.

अनलॉक आणि मिशन बिगीन अगेन मध्ये नागरिक नियमांचा भंग करत आहेत. मास्कचा वापर आणि फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होत नाही. तेव्हा या नियमांचे पालन व्हावे यासाठी उपाययोजना तसेच कारवाईला वेग देणार आहोत, असे काकाणी यांनी स्पष्ट केले आहे.

सप्टेंबरमध्ये 2000 ते 2500 दरम्यान रोजचा रुग्णांचा आकडा असू शकेल, अशी भीती ही त्यांनी व्यक्त केली आहे. मात्र, त्याचवेळी कोविड सेंटरमध्ये बेड आणि आयसीयू बेडची क्षमता वाढवण्यात येत आहे. मनुष्यबळही वाढवले जात आहे. त्यामुळे रुग्ण वाढले तरी त्यांना वेळेवर आणि योग्य उपचार मिळतील, असा दावा काकाणी यांनी केला आहे. मृत्यूदर कमी करणे हे ही मुख्य लक्ष ठरवत त्या दृष्टीनेही प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

सेव्हन हिल्समध्ये रुग्ण वाढले

अंधेरीतील सेव्हन हिल्स कोविड रुग्णालयावरील भार ऑगस्टमध्ये कमी झाला होता. रुग्णसंख्या देखील कमी झाली होती. पण आता येथील रुग्णांमध्ये पुन्हा वाढ होऊ लागली आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात येथे 30 टक्के रुग्ण वाढल्याची माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. बाळकृष्ण अडसुळ यांनी दिली आहे. गेले काही दिवस सेव्हन हिल्समध्ये दिवसाला 40 ते 45 रुग्ण दाखल होत होते. मात्र, आता 80 ते 90 रुग्ण दाखल होतात, असेही त्यांनी सांगितले आहे. दरम्यान, नागरिक योग्य ती काळजी घेत नसल्याने संसर्ग वाढत असल्याचे सांगत त्यांनी नागरिकांना नियम पाळण्याचे आवाहन केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.