मुंबई New Year २०२४ Celebration : मुंबईकरांनी नववर्षाच्या स्वागतासाठी वेगवेगळे प्लॅनिंग केले आहेत. मुंबईकर दरवर्षी मुंबईतील प्रसिद्ध ठिकाणी जात नवीन वर्षाचे स्वागत करतात. (Thirty First Party ) या वर्षी देखील मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया, मरीन ड्राईव्ह, जुहू चौपाटी आणि दादर चौपाटी येथे जाऊन फटाक्यांची आतिषबाजी आणि गाण्यांच्या ठेक्यावर मुंबईकर नवीन वर्षाच्या स्वागताचे सेलिब्रेशन करणार आहेत. (New Year Cheers )
गेट वे ऑफ इंडिया : मुंबईचे प्रवेशद्वार अशी गेट वे ऑफ इंडियाची ओळख आहे. या ठिकाणी प्रत्येक वर्षी मुंबई तसेच पश्चिम व मध्य उपनगरातून मोठ्या प्रमाणात लोकं येत नवीन वर्षाचं स्वागत करतात. रात्री 12 वाजता फटाके फोडून आणि फुगे उडवून तसेच गाण्यावर ठेका धरत, एकमेकांना शुभेच्छा देऊन नवीन वर्षाचे स्वागत करतात. यावेळी गेट वे ऑफ इंडिया येथे मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी होत असल्यामुळं पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात केलेला असतो. खासकरून तळीरामांवर पोलिसांची करडी नजर असते. प्रत्येक वर्षी नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी आम्ही कुटुंबासह गेट वे ऑफ इंडिया येथे जातो. या दिवशी बाहेरच खाणे-पिणे होते, भटकंती होते आणि आम्ही इन्जॉय करतो, असं सायनला राहणारे मंगेश कांबळे यांनी सांगितलं.
मरीन ड्राईव्ह : मुंबईची शान म्हणजे मरीन ड्राईव्ह. क्वीन्स नेकलेस म्हणजेच राणीचा हार असं देखील मरीन ड्राईव्हच्या बाबतीत म्हटलं जातं. मरीन ड्राइव्हची लांबी सुमारे ४.३ किमी लांब आहे. एका बाजूला निळा समुद्र आणि दुसऱ्या बाजूला मोठमोठ्या इमारती आणि मध्येच रस्त्यावरील अर्धगोलावर रोषणाई यामुळं इथे विलोभनीय दृश्य असते. या ठिकाणीही नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकर मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. येथे फिरण्यासाठी मोठी जागा असल्यानं घरातूनच जेवण किंवा खाण्यासाठी पदार्थ मुंबईकर घेऊन येतात. 12 वाजल्यानंतर टाळ्या, शिट्या तसेच फटाके फोडून मरीन ड्राइव्ह येथे मुंबईकर नवीन वर्षाचे स्वागत करतात. "मागील सात वर्षांपासून आमचा कॉलेजचा ग्रुप नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मरीन ड्राइव्ह येथे जातो. आम्ही या ठिकाणी खूप धमाल, मजा आणि मस्ती करतो. या वर्षी पण आम्ही येथे जाणार आहे, असं सांताक्रूज येथे राहणारा स्वप्निल खेडेकर यानी सांगितलं.
जुहू चौपाटी आणि दादर चौपाटी : नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईत सर्वाधिक गर्दी गेट वे ऑफ इंडिया आणि मरीन ड्राईव्ह या ठिकाणी होते. यानंतर जर गर्दी कुठे होत असेल तर जुहू चौपाटी आणि दादर चौपाटी येथे. या दोन्ही ठिकाणी समुद्रातील फेसाळणाऱ्या पाण्याचा आवाज, बोचरी थंडी आणि वातावरणातील गारवा याचा मुंबईकर अनुभव घेत नवीन वर्षाचे मोठ्या उत्साहात स्वागत करतात. "मी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी दादर चौपाटी येथे मागील वर्षी गेले होते आणि याही वर्षी दादर चौपाटी येथे माझ्या मैत्रिणीसह मी जाणार आहे, असं लोअर परेल येथे राहणारी सारीका इंगळे हिनं म्हटलं आहे. फटाक्यांची आतिषबाजी करत दादर चौपाटी येथे सरत्या वर्षाला निरोप देत, मुंबईकर नवीन वर्षाचं स्वागत करतात. याशिवाय मुंबईतील काही प्रसिद्ध हॉटेल्स आणि पब या ठिकाणी देखील मुंबईकर नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मोठी गर्दी करतात.
थंडीचा अनुभव घेत नववर्षाचे स्वागत : नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईत सर्वाधिक गर्दी गेट वे ऑफ इंडिया आणि मरीन ड्राईव्ह या ठिकाणी होते. यानंतर जर गर्दी कुठे होत असेल तर जुहू चौपाटी आणि दादर चौपाटी येथे. या दोन्ही ठिकाणी समुद्रातील फेसाळणाऱ्या पाण्याचा आवाज, बोचरी थंडी आणि वातावरणातील गारवा याचा मुंबईकर अनुभव घेत नवीन वर्षाचे मोठ्या उत्साहात स्वागत करतात.
हेही वाचा: