ETV Bharat / state

नोकरीचे आमिष दाखवून बेरोजगारांकडून पैसे उकळले, बनावट कॉल सेंटरमधील 13 जणांना अटक

ताज सैट्स एयर कॅटरिंग लिमिटेडच्या नावाखाली नोकरी देण्याचे आमिष दाखवून शेकडो बेरोजगारांना लाखो रुपयांचा चुना लावणाऱ्या बनावट कॉल सेंटरवर मुंबई पोलिसांनी कारवाई केली आहे. याप्रकरणी आतापर्यंत 13 जणांना अटक करण्यात आली आहे. सोशल मीडियावर नोकरीची जाहिरात करून बेरोजगारांकडून 2 ते 3 हजार रुपये उकळले जात होते.

mumbai
mumbai
author img

By

Published : Jun 23, 2021, 4:02 PM IST

Updated : Jun 23, 2021, 5:16 PM IST

मुंबई - नोकरीच्या नावाखाली शेकडो तरुणांना फसवणाऱ्या कॉल सेंटरचा मुंबई पोलिसांनी भांडाफोड केला आहे. ताज सैट्स एयर कॅटरिंग लिमिटेडच्या नावाखाली नोकरी देण्याचे आमिष दाखवून शेकडो तरुणांना लाखो रुपयांचा चुना लावला जात होता. या प्रकरणी बनावट कॉल सेंटरवर मुंबई पोलिसांनी छापा मारला आहे.

नोकरीच्या नावाखाली शेकडो बेरोजगारांना गंडा

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियाद्वारे मुंबई विमानतळावर ताज सैट्स एयर कॅटरिंगसाठी नोकरी असल्याचे सांगत जाहिरात प्रसारीत करण्यात आली होती. यासाठी युनिव्हर्सल ग्रुपच्या माध्यमातून ही नोकरभरती सुरू असल्याचे सांगण्यात येत होते. सोशल मीडियाद्वारे जाहिरात देऊन अनेक बेरोजगार तरुणांना ताज सैट्स एयर कॅटरिंगमध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवले जात होते. शिवाय, प्रोसेसिंग फीच्या नावाखाली तब्बल 2 ते 3 हजार रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली जात होती. यासंदर्भात मुंबई पोलिसांकडे तक्रार करण्यात आली. यानंतर गुन्हा नोंदवून तपास करण्यात आला. त्यानुसार, युनिव्हर्सल ग्रुपच्या मिळालेल्या पत्त्यावर पोलिसांनी छापा मारला. या ठिकाणी बनावट कॉल सेंटर चालवले जात असल्याचे लक्षात आले.

आरोपींना पोलीस कोठडी

यानंतर पोलिसांनी घटनास्थळावरून, लॅपटॉप, संगणकाच्या 20 हार्ड डिस्क, स्वाईप मशीन, मोबाइल फोन, चेकबुक, बायोडेटा व इतर कागदपत्रे जप्त केली. याबरोबर 11 पुरुष व 2 महिला कर्मचारी, असे मिळून 13 जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने या सर्वांना 30 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

फसवणूक झालेल्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा

पोलिसांनी या गुन्ह्याचा अधिक तपास केला. त्यात, आरोपींनी अशाप्रकारे मुंबईतील विविध ठिकाणी, वेगवेगळ्या नावाने कार्यालयाची स्थापना केली. त्याद्वारे विविध कंपन्यांच्या नावाने सोशल मीडियावर जाहिरात दिली. तसेच, शेकडो बेरोजगार व्यक्तींची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. दरम्यान, याप्रकरणी फसवण्यात आलेल्या पीडितांचा आकडा आणखी वाढणार आहे. त्यामुळे संबंधित पीडित तक्रारदारांनी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा - शेजाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून महिलेची मुलासह 12व्या मजल्यावरून उडी; काही दिवसांपूर्वीच पतीचे कोरोनाने निधन

Last Updated : Jun 23, 2021, 5:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.