ETV Bharat / state

संचारबंदीत दारूचे गोडाऊन फोडणाऱ्या चोरट्यांना अटक - दारूचे बॉक्स

मुंबई शहरात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना राज्यात सर्वत्र संचारबंदी लागू आहे. या काळात पोलीस दिवस-रात्र रस्त्यावर, नाक्यावर बंदोबस्तात कार्यरत आहेत. नागरिक घरी मोठ्या संख्येने घरी असल्याने मुंबईतील रोजच्या गुन्ह्यांचे प्रमाण कमी झाले आहे.

thieves who robbed liquer godown arrested by kurla police
संचारबंदीत दारूचे गोडाऊन फोडणाऱ्या चोरट्यांना अटक
author img

By

Published : Apr 1, 2020, 5:29 PM IST

मुंबई - कोरोना विषाणूचा संसर्ग सर्वत्र पसरू नये, म्हणून गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह देशभरात लॉकडाऊन असून राज्यात संचारबंदी सुरू आहे. या काळात अत्यावश्यक सेवा व अन्नधान्य दुकान चालू आहेत. यात मद्याची दुकाने बंद असल्याने दारू मिळत नसल्याने तळीराम हवालदिल झाले आहेत. कुर्ला पश्चिम बैल बाजार येथील एक दारूचे गोडाऊन चोरट्यांनी फोडून 11 दारूचे बॉक्स चोरले होते. याची किंमत 1 लाख 15 हजार रुपये असून 4 आरोपींविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून 2 आरोपींसह मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

संचारबंदीत दारूचे गोडाऊन फोडणाऱ्या चोरट्यांना अटक

मुंबई शहरात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना राज्यात सर्वत्र संचारबंदी लागू आहे. या काळात पोलीस दिवस-रात्र रस्त्यावर, नाक्यावर बंदोबस्तात कार्यरत आहेत. नागरिक घरी मोठ्या संख्येने घरी असल्याने मुंबईतील रोजच्या गुन्ह्यांचे प्रमाण कमी झाले आहे. काही चोरट्यांनी मात्र पोलिसांच्या बंदोबस्तात ही मुंबईच्या विनोबा भावे पोलीस ठाणेअंतर्गत कुर्ला बैल बाजार येथे आकाश ट्रेडिंग कंपनीचे दारुचे गोडाऊन 4 चोरट्यांनी 29 मार्चच्या रात्री फोडून 11 बॉक्स चोरले याची तक्रार गोडाऊन मालकांनी पोलिसांकडे दिल्यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे ४ चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले होते.

thieves who robbed liquer godown arrested by kurla police
संचारबंदीत दारूचे गोडाऊन फोडणाऱ्या चोरट्यांना अटक

याप्रकरणी इरफान खान (21) आणि वसंत नाईक (22) या अभिलेखांवरील दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. चोरीच्या मुद्देमालातील 2 दारूचे बॉक्स रिकामे मिळाले असून उर्वरित 9 बॉक्सचा माल हस्तगत करण्यात आला आहे. इतर 2 आरोपींचा शोध सुरू असून लवकरच त्यांना अटक करू, असे विनोबा भावे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश पवार यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.