ETV Bharat / state

ऑईल टँकरमधील पेट्रोल चोरून पाणी भरणाऱ्या ३ आरोपींना पोलिसांनी केले गजाआड - mumbai

याप्रकरणी मोहम्मद यासिन सिद्दिकी, सैफ मोहम्मद खान, आणि राजू सरोज या आरोपींना अटक करण्यात आली आहे. या आरोपींनी पोलीस तपासात मुंबई शहरात ऑइल टँकरमधील पेट्रोल काढून त्यामध्ये पाणी मिसळून भेसळ करणारी मोठी टोळी सतर्क असल्याची माहिती दिली आहे. या प्रकरणी आणखी काही आरोपींचा पोलिसांकडून शोध घेतल्या जात आहे.

अटक केलेले आरोपी
author img

By

Published : Sep 19, 2019, 3:55 PM IST

मुंबई - शहरातील बीपीसीएल ऑईल कंपनीच्या रिफायनरीमधून ऑईल टँकरच्या साहय्याने परदेशात ऑईल निर्यात केले जाते. या ऑइल टँकरमधील फर्नेस पेट्रोल काढून त्यामध्ये पाणी भरणाऱ्या टोळीचा छडा मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँच युनिट ९ ने लावला. याप्रकरणी ३ टँकर चालकांना अटक करण्यात आली असून भेसळ करण्यात आलेल्या तीनही टँकरांना हस्तगत करण्यात आले आहे.

ऑइल टँकरमधील पेट्रोल चोरून पाणी भरणाऱ्या ३ आरोपींना पोलिसांनी केले गजाआड

गेल्या काही महिन्यांपासून बीपीसीएल रिफायनरीमधून रिफाईंड करण्यात आलेल्या पेट्रोल टँकरद्वारे जेएनपिटी बंदरात पाठवून परदेशात पाठवले जात होते. मात्र काही महिन्यांपासून बीपीसीएलचे काही टँकर जेएनपिटी येथून परत पाठविण्यात आले होते. परत पाठविण्यात आलेल्या टँकरमधील फर्नेस नावाचे पेट्रोल काढून ऑइल टँकरमध्ये चक्क पाणी मिसळले जात असल्याची तक्रार बीपीसीएलच्या अधिकार्‍यांना मिळाली होती. त्यानुसार मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांच ९ कडे तक्रार दाखल करण्यात आली होती.

हेही वाचा- वंचितांनाच प्रतिनिधीत्व देणार..! प्रकाश आंबेडकरांची 'ईटीव्ही भारत'ला मुलाखत

या प्रकरणी पोलिसांनी १४ सप्टेंबरला मुंबईतील माहूल परिसरातील एका ठिकाणी छापा मारला. त्या ठिकाणी ऑइल टँकरमध्ये पाणी भरून भेसळ करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी मोहम्मद यासिन सिद्दिकी, सैफ मोहम्मद खान, आणि राजू सरोज या आरोपींना अटक करण्यात आली आहे. या आरोपींनी पोलीस तपासात मुंबई शहरात ऑइल टँकरमधील पेट्रोल काढून त्यामध्ये पाणी मिसळून भेसळ करणारी मोठी टोळी सतर्क असल्याची माहिती दिली आहे. या प्रकरणी आणखी काही आरोपींचा पोलिसांकडून शोध घेतल्या जात आहे.

Intro:मुंबईतील बीपीसीएल ऑइल कंपनीच्या रिफायनरी मधून परदेशात पाठवल्या जाणाऱ्या ऑइल टँकर मधील फर्नेस पेट्रोल काढून त्यामध्ये पाणी भरणाऱ्या टोळीचा छडा मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँच युनिट 9 ने लावला आहे . या प्रकरणी तीन टँकर चालकांना अटक करण्यात आली असून भेसळ करण्यात आलेले 3 टँकर हस्तगत करण्यात आले आहेत..Body:गेल्या काही महिन्यांपासून बीपीसीएल रिफायनरी मधून रिफाईंड करन्यात आलेले पेट्रोल टँकर द्वारे जेएनपिटी बंदरात पाठवून परदेशात पाठवले जात होते. मात्र काही महिन्यांपासून बीपीसीएल चे काही टँकर जेएनपिटी येथून पुन्हा पाठविण्यात आले होते. परत पाठविण्यात आलेल्या
टँकर मधील फर्नेस नावाचे पेट्रोल काढून ऑल टॅंकर मध्ये चक्क पाणी मिसळले जात असल्याची तक्रार बीपीसीएल च्या अधिकार्‍यांना मिळाली होती. त्यानुसार मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांच 9 कडे तक्रार दाखल करण्यात आली होती. Conclusion:
या प्रकरणी पोलिसांनी 14 सप्टेंबर रोजी मुंबईतील माहुल परिसरातील एका ठिकाणी छापा मारून ऑइल टँकर मध्ये पाणी भरून भेसळ करताना आरोपींना अटक केलेली आहे. याप्रकरणी मोहम्मद यासिन सिद्दिकी , सैफ मोहम्मद खान , आणि राजू सरोज या आरोपींना अटक करण्यात आलेली आहे .मुंबई शहरात ऑल टॅंकर मधील पेट्रोल काढून त्यामध्ये पाणी मिसळून भेसळ करणारी मोठी टोळी सतर्क असल्याची माहिती पोलीस तपासात या आरोपींनी दिली आहे. या प्रकरणी आणखी काही आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

( बाईट- अकबर पठाण , डीसीपी , क्राईम ब्रँच)
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.