मुंबई- मौज मस्तीसाठी महागड्या दुचाकी चोरणाऱ्या अट्टल चोरट्यास एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. हा चोरटा अंधेरी पूर्वेच्या एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दुचाक्या चोरायचा. राहुल खेते (वय.२०) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
राहुल हा अंधेरी पूर्वेतील सुभाष नगरचा रहिवासी आहे. तो फक्त मौज मस्ती करण्यासाठी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीमधून महागड्या दुचाकी चोरी करून निघून जायचा. मात्र, ज्या ठिकाणी दुचाकीमधील पेट्रोल संपेल, त्या ठिकाणी दुचाकी सोडून राहुल पळून जायचा. या आरोपीला पोलिसांनी सापळा रचून एमआयडीसी परिसरातून अटक केली आहे. एमआयडीसी पोलिसांनी आरोपीकडून ४ महागड्या यामाहा कंपनीच्या दुचाकी हस्तगत केल्या आहेत. याप्रकरणाचा पुढील तपास एमआयडीसी पोलीस करीत आहेत.
हेही वाचा- आरेला मुख्यमंत्र्यांचे पुन्हा कारे, झाडांच्या कत्तलीच्या चौकशीसाठी नेमली समिती