ETV Bharat / state

अचानक हृदयक्रियाबंद पडण्याबाबत व्यापक प्रमाणात जनजागृती करणे गरजेचे- डॉ. यश लोखंडवाला - मुंबई विद्यापीठ

भारतात सुमारे २० लाख लोकांचा मृत्यू होत असून, त्यापैकी जवळपास ८० टक्के लोकांना रुग्णालयसुद्धा गाठता येणे शक्य होत नाही. मात्र, अशा लोकांना जीवनदान मिळू शकते. यासाठी सर्वसामान्य लोकांमध्ये याबद्दल व्यापक प्रमाणात जनजागृती होणे गरजेचे आहे, असे मत भारतातील प्रसिध्द हृदयरोग तज्ज्ञ डॉ. यश लोखंडवाला यांनी व्यक्त केले आहे.

अचानक हृदयक्रियाबंद पडण्याबाबत व्यापक प्रमाणात जनजागृती करणे गरजेचे- डॉ. यश लोखंडवाला

author img

By

Published : Jun 2, 2021, 4:14 AM IST

मुंबई - अचानकपणे हृदयक्रिया बंद पडण्याच्या प्रकारामुळे भारतात सुमारे २० लाख लोकांचा मृत्यू होत असून, त्यापैकी जवळपास ८० टक्के लोकांना रुग्णालयसुद्धा गाठता येणे शक्य होत नाही. अचानक हृदयक्रिया बंद पडल्याचे निदर्शनास येते. तात्काळ सीपीआर सारख्या पद्धतीचा वापर केल्यास अशा लोकांना जीवनदान मिळू शकते. यासाठी सर्वसामान्य लोकांमध्ये याबद्दल व्यापक प्रमाणात जनजागृती होणे गरजेचे आहे, असे मत भारतातील प्रसिध्द हृदयरोग तज्ज्ञ डॉ. यश लोखंडवाला यांनी व्यक्त केले आहे.

'अनेक देशांत उच्च माध्यमिक शालेय अभ्यासक्रमात कार्डिअक अरेस्टसाठी प्रशिक्षण'

ऑस्ट्रेलिया, जापान, स्कॅनेडेविअन देश आणि युएएस सारख्या जगातल्या अनेक देशांत उच्च माध्यमिक शालेय अभ्यासक्रमात कार्डिअक अरेस्टसाठी प्रशिक्षण दिले जाते. याबाबत व्यापक जनजागृती होणे गरजेचे असल्याचे लोखंडवाला यांनी व्यक्त केले आहे. मुंबई विद्यापीठाचे बाळासाहेब ठाकरे अध्यासन केंद्र, प्रा. बाळ आपटे सेंटर फॉर स्टडीज इन स्टूडेंट अँड यूथ मुव्हमेंट आणि आयकेअर यांच्या सयुंक्त विद्यमाने ऑनलाइन माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या 'ऑनलाईन अवेरनेस अँड ट्रेनिंग कँपेन ऑन सडन कार्डिअक अरेस्ट' या विषयांवर ते उपस्थितांना मार्गदर्शन करत होते. यावेळी प्रसिध्द हृदयरोग तज्ज्ञ डॉ. ब्रायन पिंटो, हेल्थ सायकोलॉजिस्ट डॉ. किंजल गोयल, प्रशिक्षक सुमया राघवन, आनंद श्रीवास्तव, सहपोलिस आयुक्त, कायदा व सुव्यवस्था विश्वास नांगरे पाटील, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर, प्र-कुलगुरू प्रा. रविंद्र कुलकर्णी, कुलसचिव प्रा. बळीराम गायकवाड, प्राचार्य डॉ. अजय भामरे यांच्यासह विविध प्राधिकरणाचे सदस्य उपस्थित होते.

हृदयविकार बदल जनजागृती

अचानकपणे हृद्यक्रिया बंद पडणे, हृदयविकार, त्याची लक्षणे, त्यासाठी घ्यावयाची काळजी आणि अशी समस्या उद्भवल्यास तातडीने करावयाची प्रक्रिया अशा अनेक, महत्वपूर्ण मुद्यांवर हृदयरोग तज्ज्ञ डॉ. यश लोखंडवाला यांनी उद्बबोधन केले. तसेच प्रशिक्षकांनी ऑनलाईन सादरीकरण करून अचानकपणे हृदयक्रिया बंद पडण्याच्या घटना निदर्शनास येताच तात्काळ करावयाच्या उपाययोजना समजावून सांगितल्या. सर्वसामान्य समजेल अशा सोप्या पद्धतीने या अत्यंत महत्वाच्या विषयांवर उद्बोधन केल्याबद्दल डॉ. यश लोखंडवाला आणि चमूचे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांनी विशेष ऋण व्यक्त केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.