ETV Bharat / state

लॉकडाऊन संपल्या नंतर देशात अराजकता माजेल- संजय राऊत - uddhav thakre samna

शिवसेनेच्या मुखपत्रात प्रसिद्ध केलेल्या लेखात राऊत यांनी कोरोना संदर्भात घडत असलेल्या स्तिथीवर परखड भाष्य केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे धिरोदात्तपणे जनतेशी संवाद साधत आहेत. पदभार स्वीकारला तेव्हापासून त्यांच्यासमोर फक्त आव्हानांचीच रांग लागली आहे. त्यात हे कोरोना आणि लॉकडाऊनचे संकट. लॉकडाऊन इतक्या लवकर संपणार नाही, असे संजय राऊत यांनी आपल्या लेखात म्हटले आहे.

sanjai raut mumbai
संजय राऊत
author img

By

Published : Apr 12, 2020, 3:38 PM IST

मुंबई- महाराष्ट्रातही कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ३० एप्रिल पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. या रोगाचा मुकाबला करण्यासाठी हाच एकमेव उपाय आहे, मात्र लॉकडाऊन संपल्यावर काय? याचा विचार केला असता देशात अराजकता माजेल, अशी भीती शिवसेनेचे खासदार आणि नेते संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे.

शिवसेनेच्या मुखपत्रात प्रसिद्ध केलेल्या लेखात राऊत यांनी कोरोना संदर्भात घडत असलेल्या स्तिथीवर परखड भाष्य केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे धिरोदात्तपणे जनतेशी संवाद साधत आहेत. पदभार स्वीकारला तेव्हापासून त्यांच्यासमोर फक्त आव्हानांचीच रांग लागली आहे. त्यात हे कोरोना आणि लॉकडाऊनचे संकट. लॉकडाऊन इतक्या लवकर संपणार नाही, हे आता नक्की. देशातील १३० कोटी जनता लॉकडाऊन संपल्यावर काय करेल, हाच खरा प्रश्न माझ्यासारख्यांना पडला आहे, असे राऊत यांनी म्हटले.

"लॉकडाऊन नंतर देशाची कल्पना करवत नाही"

राऊत पुढे म्हणाले की, गोरगरीब जनतेला, मजूरवर्गाला आज सरकारतर्फे अन्नधान्याची सोय केली जात आहे. लॉकडाऊन संपल्यावर हे मोफत अन्नधान्य रेशन वगैरे गरिबांना मिळणार नाही. त्याच वेळी कोट्यवधी नागरिक बेरोजगार झालेले असतील. आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी हे लाखो नागरिक नक्की काय करतील? अमेरिकेत आजमितीस ७५ लाख नोकऱ्या गेल्या आहेत. संपूर्ण युरोपात ६० लाख नोकऱ्या संपल्या आहेत. अशा वेळी लॉकडाऊन नंतर आपल्या देशाचे चित्र काय असेल याची कल्पनाही करवत नाही, असे संजय राऊत यांनी आपल्या लेखात म्हटले आहे.

"पोटासाठी लोक कायदा हातात घेतील"

जनता कंगाल होईल, भूकबळीला बळी पडतील, पोटासाठी लोक कायदा हातात घेतील आणि बाळासाहेब ठाकरे ज्या अराजकतेचे भाकीत सतत करत होते, ती अराजकता देशाच्या रस्त्यांवर उसळताना दिसेल, असे परखड भाष्य करताना राऊत यांनी भीती व्यक्त केली आहे. लॉकडाऊन नंतर मास्क उतरतील तेव्हा अनेक दिवसांनी मित्र, शेजारी, सहकारी यांच्या चेहऱ्याचे दर्शन होईल, पण त्या मास्कच्या मागे जे तोंड आहे त्या तोंडात निदान एकवेळचा तरी घास पडावा इतकीच अपेक्षा असल्याचे राऊत यांनी सांगितले.

लॉकडाऊन नंतर सर्व 'फोटोबाज' गायब होतील

लॉकडाऊन नंतर जगण्या-मरण्याचा खरा प्रश्न निर्माण होईल. सध्या काही लोक गरिबांना मदत करताना फोटो काढून प्रसिद्धी मिळवत आहेत. पण, लॉकडाऊन नंतर त्यांना ही समाजसेवा परवडणार नाही. यावर राजस्थान सरकारने चांगला निर्णय घेतला आहे. लॉकडाऊनच्या निमित्ताने मदत वाटतानाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करणे हा तेथे गुन्हा ठरवण्यात आला आहे. भारतीय दंड विधान कलम १८८ नुसार अशा 'फोटोबाज' मंडळींवर कारवाई करण्याचे आदेश तेथील सरकारने दिले आहेत. 'लॉकडाऊन' नंतर हे सर्व फोटोबाज गायब होतील, असेही राऊत यांनी म्हटले आहे.

"डॉ. मनमोहन सिंह, रघुराम राजन वेडे नव्हते"

लॉकडाऊन सुरू असताना सर्वच राज्यकर्ते जनतेला अर्थव्यवस्थेचे भयंकर चित्र दाखवत आहेत. हा एक प्रकारे इशारा आहे. नोटबंदीने उद्योगधंदा, अर्थव्यवस्था, व्यापार साफ मारून टाकला. त्याचे परिणाम कोरोनानंतर जास्त जाणवतील. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन वेडे नव्हते, यावर सध्याच्या राज्यकर्त्यांना येत्या महिन्याभरातच मोहोर उठवावी लागेल. देश संकटात आहे, तो जास्त संकटात जाऊ नये. या संकटाचा उपयोग राजकीय फायद्या तोट्यासाठी कोणी केला तर त्यांना देशाचे शत्रू ठरवून बहिष्कृत केले पाहिजे, असे राऊत यांनी आपल्या लेखात म्हटले.

कोरोनाने विदारक पद्धीतीने मृत्यूनंतरचे जीवन दाखवले

मृत्यूनंतरचे जीवन कसे असते? यावर मौलाना, साधू-संत, चर्चचे पाद्री नेहमीच प्रवचन देत असतात. चीन, अमेरिका, इटलीसारख्या देशात मोठमोठ्या 'चरी' खोदून तेथे एकाच वेळी मृतदेहांचे सामुदायिक दफन करण्यात आले. कोरोनाने मृत्यूनंतरचे हे जीवन अशा विदारक पद्धतीने दाखविले. लॉकडाऊन नंतरचे जीवन तितक्याच भयानक अराजकाचे दर्शन देणारे असेल. राज्यकर्त्यांची खरी कसोटी तेव्हाच लागेल. आता ही फक्त झलक आहे, दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकत्रित कोरोनाशी सामना करत आहेत. सध्याचे दिवसही निघून जातील, असा आशावाद संजय राऊत यांनी आपल्या लेखात व्यक्त केला आहे.

हेही वाचा- अमृतांजन पुलाच्या खांबाच्या जागेवर रस्त्याच्या कामाला सुरुवात

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.