ETV Bharat / state

Corona Spread : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रोगप्रतिकारक औषधांचा वापर वाढला - Covid

देशात कोरोनाविरुद्ध ( Covid spread ) लढण्यासाठी ( Immunity Power ) नागरिक मोठ्या प्रमाणावर रोगप्रतिकारक औषधांचा ( Antibiotics ) वापर करता आहेत. यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून किडनी खराब होणे, हृदयरोग, रक्तदाब, मधुमेह, चिडचीडेपणा अशा समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या प्रतिरोधक औषधांचा वापर वाढल्याने आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याने डॉक्टर हैराण झाले आहेत.

Antibiotics
Antibiotics
author img

By

Published : Jan 2, 2023, 6:17 PM IST

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रोगप्रतिकारक औषधांचा वापर वाढला

मुंबई - कोरोनाचा फैलाव चीनमध्ये ( Corona spread in China ) पुन्हा वाढल्याने जगात घाबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. भारतातील नागरिकांनी देखील याचा धसका घेतला आहे. कोरोनाला आरोग्यपासून चार हात लांब ठेवण्यासाठी इम्युनिटी पॉवर ( Immunity Power ) वाढावी. याकरिता रोगप्रतिरोधक औषधांचे सेवन ( Antibiotics ) करण्याचा प्रकार वाढीस लागले आहेत. आरोग्यावर यामुळे विपरीत परिणाम होत असून किडनी खराब होणे, हृदयरोग, रक्तदाब, मधुमेह, चिडचीडेपणा अशा समस्यांना सामोरे जावे लागत आहे. दिवसागणिक अशा रुग्णात वाढ होत असल्याने डॉक्टरांची डोकेदुखी वाढली आहे.

चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा हाहाकार - भारतात कोरोनाच्या तीन लाटा धडकल्या. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर जनजीवन येत पूर्ण पदावर आले असताना चीनमध्ये पुन्हा एकदा हाहाकार माजवला आहे. तेथील रुग्णालयात रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे, अशी जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर भारतात आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. राज्य सरकारने ही कोरोनाला पायबंद घालण्यासाठी उपाययोजना आखण्यास सुरुवात केली आहे.

रोगप्रतिकारक औषधांचा आरोग्यावर परिणाम - कोरोनाची भीती भारतीयांच्या आजही मनात आहे. त्यामुळे प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी भारतीयांनी तयारी सुरु केली आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी वारंवार हात धुणे, नियमित मास्क घालणे तसेच सुरक्षित अंतर ठेवणे या त्रिसूत्रीचा अवलंब करण्याऐवजी बहुसंख्य नागरिक हे बाजारात सहज उपलब्ध होणाऱ्या इम्युनिटी पॉवरची औषधे घेण्याच्या मागे लागले आहेत. काढा, गरमागरम वाफेच्या अतिरेकानंतर आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याकडे नागरिकांचा कल दिसून येत आहे. शारीरिक स्वास्थ यामुळे बिघडवत असल्याचे एका वैद्यकीय निरीक्षणातून दिसून आले आहे. रोगप्रतिकारक औषधांचा वाढता वापर डॉक्टरांची डोकेदुखी ठरत आहेत.

किडनी खराब होण्याचा धोका - अनेक रोगप्रतिकारक औषधांमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते. या अतिरिक्त साखरेमुळे नागरिकांना वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. कोणतीही औषधे घेण्यापूर्वी शरीरातील अँटी बॉडीजचे प्रमाण तपासणे फार गरजेचे असते. मात्र, रुग्ण अनेकवेळा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय बाजरातील रोगप्रतिकारक औषधे विकत घेतात. व्हिटामिन टॅबलेट, सप्लिमेंट तसेच अँटिबायोटिक गोळ्या तत्सम इम्युनिटी पॉवर वाढवण्याच्या औषधांचा यात मुख्य समावेश असतो. ही औषधे परिणामकारक असली तरी आरोग्यावर दुष्परिणाम करणारी आहेत. किडनी खराब होणे, हृदयरोग, रक्तदाब, मधुमेह, चिडचीडेपणा अशा समस्यांना सामोरे जावे लागत आहे. हृदयविकार आणि हृदयविकाराची लक्षणे असलेल्या नागरिकांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध घेऊ नये, असा सल्ला अपेक्स हॉस्पिटल समूहाच्या पोषणतज्ञ सल्लागार, क्लिनिकल आहारतज्ञ मृणाली द्विवेदी यांनी दिला आहे.

अनेकांना कोरोनाची बाधा - गेल्या दोन वर्षात कोरोनाच्या महामारीमुळे अनेकजण आर्थीक विवंचनेत आहेत. शरीरावर याचा विपरीत परिणाम होत आहे. आजवर अनेकांना कोरोनाची बाधा झाली असून ते कोरोनामुक्त सुद्धा झाले आहेत. परंतु डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय रोगप्रतिकारक औषधे घेतल्यामुळे आरोग्यावर परिमाण झाला आहे. अनेकांना झोप न येणे, सतत चिंता असल्यामुळे जेवण न जाणे, चिडचीडेपणा, क्रोध येणे अशा समस्यांना सामोरे जावे लागत आहे. हृदयारोग, मधुमेह व उच्च रक्तदाब हे आजार आज घराघरांमध्ये पोहचले आहेत.

औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याने घेणे गरजेचे - औषधाच्या अतिरिक्त डोसमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण घटले आहे. चाळीशी उलटलेल्या नागरिकांना या अतिरिक्त साखरेचा त्रास होतो आहे. तर अतिरिक्त काढा घेतल्यामुळे अनेकांना मूळव्याधीचा त्रास होण्यास सुरुवात झाल्याचे समोर आले होते. अनेकांना शल्यचिकित्सेला सामोरे जावे लागत असल्याचे नेरुळ शुश्रूषा हार्ट केयर व स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक व हृदय शल्यविशारद डॉ. संजय तारळेकर यांनी सांगितले. तसेच रोगप्रतिकारक औषधे ही डॉक्टरांच्या सल्ल्याने घेणे गरजेचे आहे. त्या औषधांमध्ये असलेल्या घटकांचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते याउलट योग्य आहार, नियमित व्यायाम व ६ ते ७ तास झोप घेतल्यास शरीराची प्रतिकारशक्ती नैसर्गिकरीत्या वाढते, असा सल्लाही दिला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.