ETV Bharat / state

The story behind arrest Kurulkar : कुरुलकर यांच्या अटकेमागची कहाणी - कुरुलकर यांना केले ब्लॅकमेल

डीआरडीओचे संचालक प्रदीप कुरुलकर यांना अटक करण्यात आली. त्यांची ९ मे पर्यंत एटीएस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. त्यांना अटक का झाली. त्यांनी असे काय केले की एटीएसने त्यांची रवानगी थेट तुरुंगात केली. वाचा नेमके काय केले प्रदीप कुरुलकर यांनी...

The story behind arrest Kurulkar
The story behind arrest Kurulkar
author img

By

Published : May 5, 2023, 5:21 PM IST

Updated : May 5, 2023, 8:13 PM IST

मुंबई - डीआरडीओचे संचालक प्रदीप कुरुलकर यांना हेरगिरीच्या आरोपावरुन अटक केली आहे. त्यांना पुण्यातील कोर्टात हजर करण्यात आले. त्यानंतर त्यांची ९ मे पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. कुरुलकर यांच्यावर एका अर्थाने हेरगिरी केल्याचा आरोप आहे. कुरुलकर यांच्या अटकेनंतर पूर्ण सुरक्षा यंत्रणेत खळबळ माजली. एवढ्या मोठ्या पदावरील आणि थेट अब्दुल कलाम यांच्याबरोबर काम केलेल्या शास्त्रज्ञाने असे कसे अडकले असा प्रश्न विचारला जात आहे. कुरुलकर यांच्यावर कारवाई केल्याने आता आधी कारवाई झालेले अधिकारीही चर्चेत आले आहेत.

कुरुलकर यांच्या अटकेमागची कहाणी
कुरुलकर यांच्या अटकेमागची कहाणी

देशाच्या सुरक्षेला धोका - प्रदीप कुरुलकर यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून, शत्रू देशाला आपल्या ताब्यातील अधिकृत गुपिते जी बाहेर गेली तर देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण करू शकतात, हे माहीत असूनही, संवेदनशील तपशील शत्रू देशाला बेकायदेशीरपणे दिला, असे एटीएसच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. थेट एटीएसनेच ही माहिती दिल्याने हे प्रकरण किती गंभीर आहे हे लक्षात येते. त्यामुळेच कुरुलकर यांच्यावर थेट अटकेची कारवाई करण्यात आली. त्यांना न्यायालयासमोर उभे करुन ९ मे पर्यंत कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

कुरुलकर यांच्या अटकेमागची कहाणी
कुरुलकर यांच्या अटकेमागची कहाणी

सोशल मीडियाचा गैरवापर - प्रदीप कुरुलकरांच्या संदर्भात आता विविध प्रकारची माहिती बाहेर येत आहे, त्यानुसार सूत्रांनी सांगितले की, कुरुलकर यांना सोशल मीडिया साइट्सवरील एका महिलेच्या फोटोचे आमिष दाखवण्यात आले होते. त्यानंतर गेल्यावर्षी ते पाकिस्तानी गुप्तचरांच्या संपर्कात आले होते. कुरुलकर यांनी क्षेपणास्त्राची रचना आणि ठिकाण यासह काही महत्त्वपूर्ण माहिती एका पाकिस्तानी एजंटला दिली होती. तपासात हे निष्पन्न झाल्याने सोशल मीडिया किती घातक ठरू शकतो याची मोठी जाणीव झाली आहे. एखाद्याचे आयुष्य जसे सोशल मीडियाने घडू शकते. तसेच एखाद्या नामवंताचे आयुष्य बरबाद होण्यासाठीही सोशल मीडिया कारणीभूत ठरु शकतो हे यातून आता स्पष्ट होत आहे.

कुरुलकर यांच्या अटकेमागची कहाणी
कुरुलकर यांच्या अटकेमागची कहाणी

कुरुलकर कसे अडकले हनीट्रॅपमध्ये - पाकिस्तानी एजंटच्या हनीट्रॅपमध्ये कुरुलकर कसे अडकले याची रंजक माहितीच एटीएसने दिली आहे. अनेक प्रकरणांप्रमाणेच, पाकिस्तानी हेरांनी कुरुलकर यांच्याशी सोशल मीडियाद्वारे संपर्क साधला. त्यांचा विश्वास संपादन केल्यावर त्यांना खासगी फोटो आणि व्हिडिओ शेअर करण्याची लालच दाखववून त्यांची फसवणूक केली. हनी ट्रॅपचा भूलभुलैया भल्या-भल्यांना अडकवण्यास कारणीभूत ठरल्याची अनेक उदाहरणे आहेत. असे म्हणतात की बाई, बाटली आणि जुगार माणसाला आयुष्यातून उठवतो. कुरुलकर यांच्या बाबतीतही आमिषाला बळी पडून त्यांचा गेम करण्यात आला असेच म्हणावे लागेल.

कुरुलकर यांच्या अटकेमागची कहाणी
कुरुलकर यांच्या अटकेमागची कहाणी

कुरुलकर यांना केले ब्लॅकमेल - कुरुलकर यांनीही त्यांचे वैयक्तिक खासगी फोटो एजंटांना पाठवले. त्यातच कुरुलकर फसत गेले. त्यांच्या खासगी फोटो आणि व्हिडिओचा वापर करून कुरुलकर यांना हळूहळू ब्लॅकमेल करण्यात आले. त्यातूनच त्यांना संवेदनशील संरक्षण माहिती शेअर करण्यास पाकिस्तानी एजंटांनी भाग पाडले. सोशल मीडियावरुन शेअर केलेल्या गोष्टींचा वापर ब्लॅकमेल करण्यासाठी होत आहे. कुरुलकर यांनाही याच माध्यमातून ब्लॅकमेल करण्यात आले. त्यामुळे अशा माहिती, फोटो, व्हिडिओ शेअर करताना त्याचा दुरुपयोग होऊ शकतो. एवढेच नाही तर ब्लॅकमेल करण्यासाठी त्याचा सहज उपयोग होऊ शकतो हेही यातून स्पष्ट झाले आहे.

कुरुलकर यांच्या अटकेमागची कहाणी
कुरुलकर यांच्या अटकेमागची कहाणी

पोलिसांच्या हाती लागले पुरावे - पोलिसांनी पुढे माहिती देताना आणखी धक्कादायक खुलासा केला आहे. कुरुलकर हे आपले कर्तव्य बजावत असताना, व्हॉट्सअप मेसेज आणि व्हॉईस तसेच व्हिडिओ कॉलद्वारे पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेच्या (पीआयओ) एजंटांच्या संपर्कात असल्याचे पुरावेच हाती लागले आहेत. इंटरनेटवर आपण काहीही करताना आपले वैयक्तिक आयुष्य आणि खासगीपणा जपत असल्याची ग्वाही नेहमीच देण्यात येते. मात्र या दुनियेत सर्वच जणांच्यावर तिसऱ्या डोळ्याची नजर असतेच. हा तिसरा डोळा कधी उघडेल आणि एखाद्याचे आयुष्य कधी उद्ध्वस्त होईल हे सांगता येत नाही. कारण एखादे असे संवेदनशील प्रकरण घडले की सर्व तपास यंत्रणांच्या हाती ही माहिती चुटकीसरशी उपलब्ध होते. त्यामुळे सबळ पुरावे हाती लागल्याने लगेच कारवाई होऊ शकते, हेही या प्रकरणातून स्पष्ट झाले आहे.

Last Updated : May 5, 2023, 8:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.