ETV Bharat / state

वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवा नियमित राज्य शासन सकारात्मक - मंत्री अमित देशमुख - वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर

शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांमध्ये तात्पुरत्या स्वरुपात कार्यरत असलेल्या सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवा नियमित करण्याबाबत राज्य शासन सकारात्मक असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले. वैद्यकीय अधिकारी यांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भातील बैठक आज (दि. 21) विधानभवनात आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.

छायाचित्र
छायाचित्र
author img

By

Published : Oct 21, 2021, 6:36 PM IST

मुंबई - शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांमध्ये तात्पुरत्या स्वरुपात कार्यरत असलेल्या सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवा नियमित करण्याबाबत राज्य शासन सकारात्मक असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.

वैद्यकीय अधिकारी यांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भातील बैठक आज (दि. 21) विधानभवनात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला आमदार नाना पटोले यांच्यासह वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण आयुक्त वीरेंद्र सिंह, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्यासह वित्त व नियोजन विभागाचे तसेच विधी व न्याय विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्ताव ठेवणार

वैद्यकीय अधिकारी (गट- अ) संवर्गातील वैद्यकीय अधीक्षक, उपअधिक्षक आणि वैद्यकीय अधिकारी (गट- ब) या पदांचे नव्याने सेवाप्रवेश नियमांचे प्रारुप वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत तयार करण्यात येत आहे. सेवाप्रवेश नियमांचे प्रारुपन तयार झाल्यानंतर या वैद्यकीय अधिकारी यांच्या सेवा नियमित करण्याबाबतचा प्रस्ताव मंत्रीमंडळ बैठकीत ठेवण्यात येईल. या प्रस्ताव तातडीने मंत्रीमंडळ बैठकीत आणण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने आवश्यक ती तयारी करावी. तसेच कोविड काळात डॉक्टरांची आवश्यकता अधोरेखित झाली असून राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांची पदे तातडीने भरण्याबरोबर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवा नियमित करण्यात यावी, असे आमदार पटोले यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा - महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी व्यापक लसीकरण मोहीम राबविणार - उदय सामंत, अशी आहे नियमावली

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.