ETV Bharat / state

पालकत्व गमावलेल्या विद्यार्थ्यांना पदवी-पदव्युत्तरपर्यंत शिक्षण मोफत - मंत्री उदय सामंत

author img

By

Published : Jun 29, 2021, 7:54 PM IST

Updated : Jun 29, 2021, 10:34 PM IST

कोरोना काळात पालकत्व गमावलेल्या विद्यार्थ्यांना पदवी, पदव्युत्तर शिक्षण मोफत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

मंत्री उदय सामंत
मंत्री उदय सामंत

मुंबई - कोरोना काळात पालकत्व गमावलेल्या विद्यार्थ्यांना पदवी, पदव्युत्तर शिक्षण मोफत देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. तर खासगी अनुदानित, विनाअनुदानित महाविद्यालयांना देखील यासंदर्भात निर्णय घेण्याच्या सुचना केल्या आहेत, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी (दि. 29 जून) मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

बोलताना मंत्री उदय सामंत

शुल्क सवलत, प्रयोगशाळा व ग्रंथालय शुल्क 50 टक्के

ज्या विद्यार्थ्यांचे आई-वडील, कोरोनामुळे दगावले आहेत. अशा विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. अनुदानित महाविद्यालय व विद्यापीठीय विभागातील सर्व अभ्यासक्रमासाठी आकारण्यात येणाऱ्या इतर शुल्कांमधील जिमखाना शुल्क, विविध गुणदर्शन/उपक्रम शुल्क, कॉलेज मॅगजीन शुल्क, संगणक शुल्क, क्रीडा निधी, वैद्यकीय मदत निधी आणि युथ फेस्टिवल अशा बाबींवर कोणत्याही प्रकारे खर्च आकारण्यात आलेला नाही. त्या बाबींसाठी आकारण्यात येणारे शुल्क पूर्णपणे माफ करण्यात येईल, अशी माहिती मंत्री सामंत यांनी दिली. कोरोना काळात विद्यार्थी महाविद्यालयात येत नाहीत. प्रयोगशाळा व ग्रंथालयाचा वापर नाही. तरीही देखभाल व ग्रंथालयामध्ये ई-कन्टेंट विकत घेण्यासाठी खर्च करण्यात येतो. ही बाब विचारात घेत, राज्य शासनाने संबंधित शुल्कात 50 टक्के सवलत देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांद्वारे व वसतीगृहाचा उपयोग केला नाही. त्यामुळे वसतीगृह शुल्कापोटी आकारण्यात येणारे शुल्क पूर्णपणे माफ केले जाणार असल्याचे सामंत म्हणाले.

विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित महाविद्यालयांनाही दिलासा

विनाअनुदानित किंवा कायम विनाअनुदानित महाविद्यालयांद्वारे आकारण्यात येणाऱ्या शिक्षण शुल्क व विकास निधी यामध्ये सवलत दिली जाणार नाही. पण, इतर शुल्कामधील जिमखाना शुल्क, विविध गुणदर्शन/उपक्रम शुल्क, कॉलेज मॅगजीन शुल्क, संगणक शुल्क, क्रीडा निधी, वैद्यकीय मदत निधी आणि युथ फेस्टिवल अशा ज्या बाबींवर कोणत्याही प्रकारे खर्च आकारण्यात आलेला नाही. त्या बाबींसाठी आकारण्यात येणारे शुल्क पूर्णपणे माफ केले जाणार आहे. त्याचप्रमाणे प्रयोगशाळा व ग्रंथालय शुल्क यामध्ये 50 टक्के सवलत दिली जाईल, असेही सामंत यांनी सांगितले.

सीईटीबाबत लवकरच निर्णय

सीईटीबाबत निर्णय झाला आहे. निविदाही काढली आहे. जोपर्यंत 12 वीचा निकाल लागत नाही. तोपर्यंत निर्णय घेऊ शकत नाही. 12 वीचा निकाल लागल्यानंतर दोन दिवसात सीईटीचा निर्णय घेण्यात येईल, असे मंत्री सामंत यांनी सांगितले.

कोकणातील गणेशोत्सव

कोकणात गणेशोत्सव मोठ्या उत्सवात साजरा केला जातो. नव्या मार्गदर्शक सुचनांमधील जाचक अटींचा फटका गणेशोत्सव मंडळांना बसणार आहे. मुख्यमंत्र्यांनी विश्वासात न घेता निर्णय घेतल्याचा मंडळांचा आरोप आहे, असा प्रश्न सामंत यांना विचारला असता, कोविड लाट कधी ओसरेल, हे सांगता येत नाही. राज्य शासनाने त्यानुसार मार्गदर्शक सूचना आखल्या आहेत. गणेशोत्सव काळात अशीच परिस्थिती राहीली तर विचार करावा लागेल. लोक हिताचा हा निर्णय असून कोकणातील मंडळे त्याला सहकार्य करतील, असे सामंत म्हणाले. मूर्तिकारांशी चर्चा करून उंची बाबत निर्णय घेणार असल्याही सामंत म्हणाले.

परिस्थिती आटोक्यात

रत्नागिरी जिल्ह्यात डेल्टा प्लसचा रुग्ण आढळून आला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी खबरदारी घेत, प्रतिबंधित क्षेत्र तयार केले. दुर्दैवाने महिलेचा मृत्यू झाला. उर्वरित रुग्णांची तब्येत ठणठणीत आहे. कोरोनाची रुग्ण संख्याही घटली असून ज्या ठिकाणी परिस्थिती आटोक्यात आली आहे, तेथील निर्बंध उठवले आहेत, असे सामंत यांनी सांगितले.

हेही वाचा - 'सरासरीपेक्षा कमी पाऊस असलेल्या तालुक्यात शेतकऱ्याने पेरणी करू नये'

Last Updated : Jun 29, 2021, 10:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.