ETV Bharat / state

शिंदे गटाला निकाल आपल्या बाजूस लागण्याचा विश्वास - उद्धव ठाकरे गट

MLA Disqualification: शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं होतं. (Shinde Group) त्याचवेळी शिवसेना पक्षात देखील मोठा भूकंप होत शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे चाळीस आमदार सोबत घेऊन भाजपासोबत सत्तेत बसले. (Uddhav Thackeray Group) दोन्ही गटाकडून आमदार अपात्रते संदर्भात विधानसभा अध्यक्षांकडे याचिका दाखल केल्या गेल्या होत्या. त्या अनुषंगाने आज महत्त्वपूर्ण निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर देणार आहेत. निकाल आपल्याच बाजूनं लागेल असा विश्वास शिंदे गटाच्या मंत्र्यांकडून व्यक्त केला जात आहे. (Assembly Speaker)

The Shinde group
शिंदे गट
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 11, 2024, 8:55 AM IST

मुंबई MLA Disqualification : शिवसेनेच्या आमदार अपात्रते प्रकरणी आज निर्णय येणार आहे. शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी निर्णय आमच्याच बाजूने येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. (Rahul Narvekar) येणारा जो निकाल आहे तो आमच्या बाजूने लागणार असून सर सलामत आहे आणि पगडी पण हजार राहणार आहे. तसंच पेपर फुटी संदर्भात बोलताना पाटील म्हणाले की पेपर वारंवार फुटणे ही चुकीची गोष्ट आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण होत असतो. जो कोणी दोषी असेल त्यावर सरकारने निश्चितपणे कारवाई केली पाहिजे. सरकार कारवाई करणार असा ठाम विश्वास गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला आहे. (MLA Eligibility Decision)

मंत्री गुलाबराव पाटील आणि दीपक केसरकर यांचे मत

सत्याचा विजय होईल केसरकर : राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज सह्याद्री अतिथीगृह येथे संपन्न झाली. बैठकीनंतर दीपक केसरकर यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. मंत्री दीपक केसकर यावेळी म्हणाले की, मंत्रिमंडळ बैठक आणि आमदार अपात्रतेचा निर्णय याचा कुठलाही संबंध नाही. राज्य मंत्रिमंडळ बैठक दर आठवड्याला होत असते. कुपोषित बालकांच्या संदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून राज्यात नागरी भागातील अतितीव्र कुपोषित बालकांसाठी नागरी बालविकास केंद्र सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. सगळ्यांना आजच्या निकालाची उत्कंठा असेलच शेवटी सत्तेचा विजय होत असतो, त्यामुळे नेहमीच रडीचा डाव खेळायचा याला कुठेतरी पायबंद बसेल असं आपल्याला वाटत असल्याचं दीपक केसरकर यांनी म्हटले आहे.

हा कॉन्स्टिट्यूशनल ऑथॉरिटीचा अपमान: आमदार अपात्रतेच्या निर्णयामुळे निर्णय देणाऱ्यांवरील कमेंट्स थांबतील. विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयानंतर आम्ही आमची भूमिका पत्रकार परिषदेत मांडणार असल्याचे दीपक केसरकर म्हणाले. ठाकरे गटाचे खासदार सर्व फिक्सिंग केलं असल्याचं त्याला उत्तर देताना केसरकर म्हणाले की, हा कॉन्स्टिट्यूशनल ऑथॉरिटीचा अपमान आहे. एक तर त्यांना प्रक्रिया माहीत नाही. कोणताही निर्णय कायद्याच्या आधारे घेतला जातो. कोणी सांगितलं म्हणून निर्णय घेतला जात नाही. यांना माहिती नाही त्या अशा प्रकारचे वक्तव्य करू शकतात असा टोलाही त्यांनी संजय राऊत यांना लगावला आहे. भारतात लोकशाही आहे. मात्र काही पक्ष ती मानत नाही. पेपर फुटी झाली असेल तर चौकशी करून कारवाई केली जाईल, त्यामुळे अधिक माहिती नसल्यामुळे मी यावर बोलणार नसल्याचं केसरकर म्हणाले.

हेही वाचा:

  1. विधानसभा अध्यक्षांवर जबाबदारी देणं चुकीचं, आमदार अपात्रता सुनावणीपूर्वी पृथ्वीराज चव्हाण यांचं मत
  2. आमदार अपात्रतेचा निकाल कसा असेल? खुद्द विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी 'ही' दिली माहिती
  3. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी आज सायंकाळी साडेचार वाजता लागणार निकाल, वाचा सविस्तर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.