ETV Bharat / state

अजितदादांच्या निवडीमुळे राष्ट्रवादीतील ओबीसी नेत्याला आता विरोधी पक्षनेत्याची संधी!

परळी विधानसभा मतदारसंघात भाजप नेत्या व कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांचा पराभव केल्यानंतर धनंजय मुंडे यांचे पक्षातील वजन बरेच वाढले आहे. त्यातच त्यांनी मागील पाच वर्षात विधानपरिषदेमध्ये विरोधी पक्षनेता म्हणून आपल्या कामाचा ठसा उमटवला असल्याने त्यांच्या गळ्यात विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदाची माळ पडू शकते, अशी चर्चा आहे.

अजितदादांच्या निवडीमुळे राष्ट्रवादीतील ओबीसी नेत्याला आता विरोधी पक्षनेत्याची संधी!
author img

By

Published : Oct 31, 2019, 3:53 AM IST

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांची विधानमंडळाच्या नेतेपदी एक मुखाने निवड करण्यात आली. या निवडीमुळे अजित पवार पुन्हा एकदा विधानमंडळातील पक्षाचे नेते ठरले असून विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद आता ओबीसी नेत्याकडे जाण्याचा मार्ग खुला झाला आहे. राष्ट्रवादीने यावेळी ओबीसी नेत्यांमध्ये अनेकांना संधी दिली. पक्षाची सध्याची वाटचाल लक्षात घेता तरुण आमदार म्हणून धनंजय मुंडे अथवा जितेंद्र आव्हाड यांच्या नावाचा विरोधी पक्षनेतेपदासाठी होण्याची शक्यता राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये व्यक्त केली जात आहे. तर, दुसरीकडे ओबीसी नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या नावाचाही प्रस्ताव समोर येण्याची शक्यता आहे.

हेही वाचा - व्होडाफोन भारतामधून गाशा गुंडाळणार?

परळी विधानसभा मतदारसंघात भाजप नेत्या व कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांचा पराभव केल्यानंतर धनंजय मुंडे यांचे पक्षातील वजन बरेच वाढले आहे. त्यातच त्यांनी मागील पाच वर्षात विधानपरिषदेमध्ये विरोधी पक्षनेता म्हणून आपल्या कामाचा ठसा उमटवला असल्याने त्यांच्या गळ्यात विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदाची माळ पडू शकते, अशी चर्चा आहे. त्यातच धनंजय मुंडे हे ओबीसी नेते म्हणून आणि विशेषत: वंजारी समाजातील एक मोठे नेते म्हणूनही परिचित आहेत. त्यामुळे विधानमंडळ नेता मराठा म्हणून अजितदादांचे नाव आल्यानंतर मुंडे यांचे नाव विरोधीपक्ष नेता म्हणून राष्ट्रवादी कडून समोर आणले जाईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

शिवसेना आणि भाजपचा वाद पुढील दोन दिवसात संपण्याची शक्यता असल्याने आठवड्याच्या शेवटपर्यंत युतीचे सरकार राज्य स्थापन होईल असे एकूण चित्र आहे. या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादीकडून विधानमंडळ नेते म्हणून अजित पवार यांची निवड करण्यात आली तर दुसरीकडे भाजपाकडून फडणवीस यांची विधानमंडळ नेता म्हणून निवड करून तेच पुढील मुख्यमंत्री होतील असे संकेत भाजपाकडून स्पष्टपणे देण्यात आले आहेत.

Intro:अजितदादांच्या निवडीमुळे राष्ट्रवादीतील ओबीसी नेत्याला आता विरोधी पक्षनेत्याची संधी !

mh-mum-01-ncp-oppo-munde-7201153

(यासाठी फाईल फुटेज वापरावेत)

मुंबई, ता. ३१:

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांची आज विधानमंडळाच्या नेतेपदी एक मुखाने निवड करण्यात आली. या निवडीमुळे अजित दादा (मराठा) पुन्हा एकदा विधानमंडळातील पक्षाचे नेते ठरले असून विधानसभेत विरोधी पक्षनेते पद आता ओबीसीकडे जाण्याचा मार्ग खुला झाला आहे. राष्ट्रवादीने यावेळी ओबीसी नेत्यांमध्ये अनेकांना संधी दिली आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसची सध्याची वाटचाल लक्षात घेता तरुण आमदार म्हणून धनंजय मुंडे अथवा जितेंद्र आव्हाड यांच्या नावाचा विचार विधानसभेच्या विरोधी पक्ष नेते पदासाठी होण्याची शक्यता राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे ओबीसी नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या नावाचाही प्रस्ताव समोर येण्याची शक्यता आहे.
परळी विधानसभा मतदारसंघात भाजप नेत्या व कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांचा पराभव केल्यानंतर धनंजय मुंडे यांचे वजन राष्ट्रवादीमध्ये बरेच वाढलेले आहे. त्यातच त्यांनी मागील पाच वर्षात विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेता म्हणून एक आपल्या कामाचा एक ठसा उमटवला असल्याने त्यांच्या गळ्यात विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदाची माळ पडू शकते, असे बोलले जात आहे. त्यातच धनंजय मुंडे हे ओबीसी नेते म्हणून आणि विशेषत: वंजारी समाजातील एक मोठे नेते म्हणून ही परिचित आहेत. त्यामुळे विधानमंडळ नेता मराठा म्हणून अजितदादांचे नाव आल्यानंतर मुंडे यांचे नाव विरोधीपक्ष नेता म्हणून राष्ट्रवादी कडून समोर आणले जाईल अशी माहिती एका राष्ट्रवादीच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली.

शिवसेना आणि भाजपचा वाद पुढील दोन दिवसात संपण्याची शक्यता आहे. यामुळे आठवड्याच्या शेवटपर्यंत युतीचे सरकार राज्य स्थापन होईल असे एकूण चित्र दिसते. या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादीकडून विधानमंडळ नेते म्हणून अजित पवार यांची निवड करण्यात आली तर दुसरीकडे भाजपाकडून फडणवीस यांची विधानमंडळ नेता म्हणून निवड करून तेच पुढील मुख्यमंत्री होतील असे संकेत भाजपाकडून स्पष्टपणे देण्यात आले.
Body:अजितदादांच्या निवडीमुळे राष्ट्रवादीतील ओबीसी नेत्याला आता विरोधी पक्षनेत्याची संधी !Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.