ETV Bharat / state

अँटिलिया प्रकरण: पीपीई कीट घालून सचिन वाझे, की इतर कुणी व्यक्ती

author img

By

Published : Mar 16, 2021, 12:49 PM IST

Updated : Mar 16, 2021, 3:18 PM IST

मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानासमोर स्फोटकांसह आढळलेल्या गाडीत ज्या बनावट नंबर प्लेट मिळाल्या त्या ठाण्यातील नौपाडा भागातील सद्गुरु कार डेकोरेटरच्या दुकानातून बनवल्या गेल्या असल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय अँटिलियाबाहेरचा एक सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. त्यात एक व्यक्ती पीपीई कीट घालून फिरत असल्याचा दिसत आहे. ती व्यक्ती सचिन वाझे असल्याचा संशय आहे.

the-nia-suspects-sachin-waze-roamed-by-wearing-ppe-kit-outside-antilia
सचिन वाझे

मुंबई - उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर 24 फेब्रुवारीच्या रात्री एक स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ ठेवण्यात आली. याप्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना एनआयएने(राष्ट्रीय तपास यंत्रणा) अटक केली आहे. या प्रकरणाचे आणखी एक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती पीपीई कीट घालून फिरताना दिसत आहे. पीपीई कीट घातलेली व्यक्ती सचिन वाझे, असल्याचा संशय एनआयएला आहे. त्यामुळे एनआयए वाझे यांना पीपीई कीट घालून चालवणार असल्याची माहिती समोर येत आहे.

पीपीई कीट घालून सचिन वाझे, की इतर कुणी व्यक्ती..पाहा व्हिडिओ..

वाझेंनी जमा केलेल्या पुरावे देखील गायब -

मुकेश अंबानी यांच्या घरा शेजारी सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ कार प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात तपास अधिकारी असलेल्या सचिन वाझेंनी तपास करताना ठाण्यातील दुकानदाराची डायरी, सीसीटीव्ही फुटेज जप्त केले होते. माञ, या वस्तू कायद्यानुसार त्यांनी रेकॉर्डवर घेतल्या नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे तपासाच्या नावाखाली वाझे यांनी पुरावे नष्ट केले का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मुंबई पोलीस आयुक्तांची बदली होण्याची शक्यता -

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या 'अँटिलिया' घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडीतील स्फोटकांच्या संदर्भात मुंबई पोलीस दलातील अधिकारी सचिन वाझे वादात सापडले आहेत. राष्ट्रीय तपास यंत्रणेने वाझेंना या प्रकरणी अटक केली आहे. यानंतर आता मुंबई पोलीस खात्यामध्ये मोठे फेरबदल होणार असल्याची माहिती समोर येत आहे. महाविकास आघाडीमधील काही नेत्यांची यासंदर्भात बैठक होत असून मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची आयुक्त पदावरून उचलबांगडी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हेही वाचा - सचिन वाझेंनी जप्त केलेल्या पुराव्यांची पोलीस दप्तरी नोंद नाही?

Last Updated : Mar 16, 2021, 3:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.