मुंबई : भांडुपमध्ये 2009 ( Bhandup in 2009 ) मधील अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी ( molestation of a minor girl ) आरोपी चुलत भावाला महानगर दंडाधिकारी ( Magistrate Court ) न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल देत म्हटले आहे की, महिलेच्या इच्छा शिवाय शरीराला स्पर्श करण्याचा पुरुषाला अधिकार नाही असे असे निरीक्षण नोंदवत आरोपी चुलत भावाला न्यायालयाने दोषी ठरवले. 1 महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा ( 1 month imprisonment ) आणि 1 हजार रुपये दंड ठोठावला आहे. या संदर्भातील निकाल न्यायालयाने गुरुवारी दिला असून, यासंदर्भातील सविस्तर निकालाची प्रत वेबसाईटवर शनिवारी उपलब्ध करण्यात आलेली आहे.
चुलत बहिणीचा केला विनयभंग : आरोपीने त्याच्या चुलत बहिणीचा हात धरला होता. त्यातून त्याने स्त्री सन्मानाला धक्का दिला, असा आरोप करीत आरोपीच्या चुलत बहिणीने न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने तिच्या याचिकेचा स्वीकार करीत आरोपीला दोषी ठरवले आणि त्याला शिक्षाही ठोठावली. नात्याचा गैरफायदा घेऊन विनयभंग करणाऱ्या आरोपींना कनिष्ठ न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे. त्यामुळे न्यायालयाचा हा निकाल महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
न्यायालयाने मांडले मत : न्यायदंडाधिकारी न्यायालयाने 13 वर्षांपूर्वी आपल्या तरुण चुलत बहिणीचा हात पकडून लग्नाचा प्रस्ताव ठेवल्याप्रकरणी एका 43 वर्षीय पुरुषाला एका महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा आणि 1 हजार रुपये दंड ठोठावला आहे. न्यायाधीश आर. डी. डांगे यांनी सांगितले की, 2009 मध्ये पीडितेचे वय 16 वर्षांपेक्षा कमी होते. तिने साक्ष दिली की आरोपीच्या वागणुकीमुळे तिला अपमानित आणि लज्जा वाटली. त्याने तिचा आत्मसन्मान दुखावला असा दावा केला जाऊ शकतो असे न्यायाधीशांनी सांगितले.
काय आहे प्रकरण : पीडित मुलगी नववीत असताना 2 फेब्रुवारी 2009 रोजी अल्पवयीन मुलीने भांडुप पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तिने दावा केला की, ती शाळेतून घरी जात असताना तिच्या चुलत भावाने तिचा हात धरला आणि लग्नाचा प्रस्ताव ठेवला. त्याने तिला आपल्या घरी बोलावून फसवल्याचा दावा तिने केला. यावेळी तिच्या बचावासाठी घटनास्थळी आलेल्या तिच्या बहिणीलाही त्याने चापट मारली.
न्यायालयाने दिला निकाल : प्रोबेशन ऑफ ऑफेन्डर्स अॅक्टनुसार आरोपीच्या वकिलाने त्याच्या दयेची विनंती केली आणि त्याला चांगल्या वर्तनाच्या करारावर सोडण्यास सांगितले. मात्र, न्यायाधीश आर. डी. डांगे यांच्या आदेशानुसार कलम 354 अन्वये महिलेचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने गुन्हेगारी बळाचा वापर करणे महिलेला लक्ष्य करण्यात आले. याव्यतिरिक्त पीडितेने त्याच्याविरुद्ध अतिरिक्त तक्रारी केल्या आहेत हे लक्षात घेतले. गुन्ह्याचे स्वरूप पीडितेचे वय आणि इतर तक्रारींचे चालू स्वरूप पाहता हे प्रकरण प्रोबेशन ऑफ ऑफेंडर्स कायद्याच्या फायद्यांसाठी पात्र ठरत नाही, असा निष्कर्ष दंडाधिकाऱ्यांनी काढला. या व्यक्तीला दुसऱ्या गुन्ह्यातून कलम 323 मधून मुक्त करण्यात आले.
हेही वाचा : Umesh Kolhe Murder Case: उमेश कोल्हे हत्या प्रकरणांत सात आरोपींना अटक
हेही वाचा : Umesh Kolhe Murder : लुटमाराची घटना नाही; उमेश कोल्हे यांच्या हत्येमागचे कारण आले समोेर