मुंबई - मालवणी परिसरात एका वर्षाच्या मुलीच्या अपहरणाचा प्रकार पोलिसांनी चोवीस तासात उघडकीस आणला. याप्रकरणी ओडीशाच्या एका २४ वर्षीय महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. सफाला नायक असे तिचे नाव आहे. सफाला ही पश्चिम उपनगरात एका घरी कामाला होती. त्या व्यक्तीच्या घरी ती एक दिवसासाठी राहायला आली होती.
घटना काय घडली?
अपहरण झालेल्या मुलीचे वडील हे टेलरिंगचे काम करत. टेलरिंग कामानिमित्त सफालाशी तोंड ओळख झाली होती. काही दिवसांपुर्वी सफालाची नोकरी गेली होती. गावाला परतण्यासाठी दोन दिवसांचा वेळ असल्याने या काळात तिच्याकडे राहण्यासाठी जागाही नव्हती. त्यामुळे एका दिवसासाठी ती या मुलीच्या घरी राहायला आली. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी घरी मुलगी आणि सफाला नसल्याने कुटुंबिय घाबरले. त्यांनी तात्काळ याची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार मालवणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करून पोलिसांनी तपास करून घोडबंदर परिसरातून त्या आरोपी व एक वर्षीय मुलीला ताब्यात घेतले. मात्र नेमके मुलीला एका पळवले होते याविषयी पोलिसांकडून तपास केला जात आहे.
हेही वाचा - भंडारा बालकं मृत्यू प्रकरण : पिडीत पालकांचा 'आक्रोश'