मुंबई CBI court : दिल्लीमधील रहिवासी असलेल्या फराज सुलतान खान यानं मुंबईतील पत्रकाराकडं 30 लाख रुपयाची लाच टेलिफोनद्वारे मागितली असा आरोप होता. त्या विरोधात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागात खटला दाखल झाला होता. मात्र, यासंदर्भात पुरावा नसल्यानं सीबीआयच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एम आर पुरवार यांनी सीबीआयच्या तपासावर संशय व्यक्त करत आरोपीची निर्दोष मुक्तता केली.
काय आहे प्रकरण : मुंबईत माहिती अधिकाराच्या अंतर्गत अर्ज करणारे पत्रकार केतन तिरोडकर यांना मोक्का कायद्यांतर्गत प्रकरणात आरोपी म्हणून उभं केल्यानंतर हे प्रकरण समोर आलं. केतन तिरोडकर 2006 मध्ये दिल्लीमध्ये असताना त्यांच्याकडून फराज सुलतान खान यानं एका प्रकरणात यशस्वी होण्यासाठी 30 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्याबदल्यात केतनला एका खटल्यात त्याच्या बाजूनं निर्णय करण्यास मदत करेल, असं खान म्हणाल्याची माहिती केतन यांच्या वकीलांनी न्यायालयात दिली. तर आरोपी खान यांच्या वतीनं वकील सईद अख्तर यांनी बाजू मांडली. ते म्हणाले की, संपूर्ण कथित संभाषणात कोणत्याही गोष्टींचा थांब पत्ता नाही, सबळ पुरावे नाही, यामध्ये कोणतेच तथ्य नाही. कारण तपासात अनेक विसंगती आहेत. परिणामी आरोपीला आरोपातून दोष मुक्तता मिळाली पाहिजे.
हॉटेलमध्ये आलिशान सोय करण्याची सूचना : फरार सुलतान खान यानं पत्रकार केतन तिरोडकर यांना न्यायालयीन प्रकरणांमध्ये मदत करून देतो. दिल्ली उच्च न्यायालयाचे एक न्यायाधीश ओळखीचे आणि त्यांचे मेहुणे मुंबई उच्च न्यायालयात कार्यरत आहे. त्यामुळे केंद्र सरकारमधील मंत्र्यांचे आपले चांगले संबंध आहेत. त्याच्या आधारे तुला तुझ्या प्रकरणातून मदत करता येईल, असं सांगून केतन तिरोडकर यांच्याकडून तीस लाख रुपयांची मागणी केली. तसंच आलिशान हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशी सूचना केली असल्याचं सीबीआयचे वकील गायकवाड यांनी न्यायालयात सांगितले.
सीबीआयच्या तपासावरच सीबीआय न्यायालयाचे प्रश्नचिन्ह : दोन्ही गटांची बाजू ऐकल्यानंतर विशेष सेवा न्यायालयाचे न्यायाधीश एम आर पुरवार यांनी आदेशात नमूद केलं की, आरोपी विरोधात कोणतेही सबळ पुरावे नाहीत. कथित संभाषण आणि आवाजाचे नमुने तसंच आवाजासंदर्भातील फॉरेन्सिक तपासणी अहवालाबाबत शंका येते. त्याविषयी उपस्थित झालेले साक्षीदार आणि साक्षीदारांच्या विश्वासार्हतेबद्दल प्रचंड संशय आहे. तपासात अनेक त्रुटी आहेत हे स्पष्टपणे दिसतंय. त्यामुळंच सदरील प्रकरणाच आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात येत असल्याचं न्यायालयानं म्हटले. .
हेही वाचा -