ETV Bharat / state

BMC Election : मुंबईत सपा, बसपा प्रभाव मावळला

मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक तोंडावर ( BMC Election ) आहे. भाजपने मनपावर झेंडा फडकवण्याची व्यूहरचना आखली ( Upcoming election of Mumbai Municipal Corporation ) आहे. मुंबईत मराठी, उत्तर भाषिक मते निर्णायक ठरतात. उत्तर भाषिकांच्या मतांवर एकेकाळी बसपा, सपा या पक्षांचा प्रभाव होता. मात्र, मुंबईत हे पक्ष फारसे सक्रीय नसल्याची स्थिती ( BSP has faded in Mumbai ) आहे.

author img

By

Published : Oct 26, 2022, 4:50 PM IST

BMC Election
मुंबईत सपा, बसपा प्रभाव मावळला

मुंबई - मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक तोंडावर ( BMC Election ) आहे. भाजपने मनपावर झेंडा फडकवण्याची व्यूहरचना आखली ( Upcoming election of Mumbai Municipal Corporation ) आहे. मुंबईत मराठी, उत्तर भाषिक मते निर्णायक ठरतात. उत्तर भाषिकांच्या मतांवर एकेकाळी बसपा, सपा या पक्षांचा प्रभाव होता. मात्र, मुंबईत हे पक्ष फारसे सक्रीय नसल्याची स्थिती ( BSP has faded in Mumbai ) आहे. त्यामुळे ही एकगठ्ठा मते कोणाला कौल देतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. सोन्याची अंडे देणारी कोंबडी म्हणून मुंबई मनपाची ओळख आहे. मुंबई मनपावर सत्ता काबीज करण्यासाठी भाजपने टार्गेट ठेवले आहे. गेली 25 वर्षे सत्तेतील शिवसेनेत भाजपने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मनसेला हाताशी धरत फूट पाडली आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारी भाजपकडून जोरदार तयारी सुरु झाली आहे.

मुंबईत बसपा प्रभाव मावळला

मतदार भाजपकडे वळल्याचे चित्र - मराठी मतदारांसाठी दहिहंडी, गणेशोत्सवानंतर मराठमोळा दिपोत्सवाचे आयोजन केले आहे. तसेच उत्तर भाषिकांसाठी छठ पूजेचा कार्यक्रम हाती घेतला. मुंबईत एकेकाळी उत्तर भाषिकांची एकगठ्ठा मते बसपा, सपाला जात होती. मात्र, गेल्या काही वर्षांपासून ही मते विभागली गेली आहेत. बसपा, सपा हे पक्ष निवडणूक काळ वगळता फारसे सक्रीय नाहीत. त्यामुळे उत्तर भाषिक मतदार कॉंग्रेसला मतदान करत आला. मात्र, गेल्या काही वर्षांपासून हा मतदार भाजपकडे वळल्याचे चित्र दिसत आहे. आता जातीय, प्रांतिक समीकरण जुळवल्यास सगळ्याच पक्षांना ही निवडणूक लढवताना आपापले संख्याबळ वाढवण्यासाठी वाव आहे. त्यामुळे हे समीकरण कोण जुळवणार हे चित्र येत्या काळात पहायला मिळेल.

दलित मतांचे ध्रुवीकरण - मतांचे ध्रुवीकरणमराठीच्या मुद्यावर शिवसेना, मनसे पक्षाने मुंबईत राजकारण केले. मराठी मतदारांनी भरभरुन शिवसेना, मनसेला पाठिंबा दिला. ही मते डोळ्यासमोर ठेवत भाजपने देखील मराठी कट्टा ही मोहीम सुरू केली. गुजराती मतदार नेहमीच भाजपला साथ देत आले आहेत. उत्तर भारतीय मतदार हे याआधी बसपा, काँग्रेसकडे जात होते, ते मागच्या निवडणुकांमध्ये भाजपकडे वळले. परंतु, आताच्या राजकीय परिस्थितीमुळे ते भाजपला साथ देतील का हा प्रश्न आहे. मुंबईतील मुस्लिम समाज मागील निवडणुकांमध्ये एमआयएम पक्षाला मदत करताना दिसला. आता उत्तर भाषिक, दलित मतांचे ध्रुवीकरण राजकीय पक्ष कसे साधणार हे पाहणे देखील महत्वाचे आहे.

उत्तर भारतीय मतदार निर्णायक ठरणार - भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरामध्ये मोठ्या प्रमाणात परप्रांतीय लोक राहतात. या परप्रातीयांपैकी उत्तर भारतीयांची संख्या 33% च्या आसपास आहे. हे उत्तर भारतीय मतदार निर्णायक मत देऊन मुंबई महापालिकेत कायापालट करू शकतात. त्यामुळे बहुजन समाज पार्टीने उत्तर भारतीयांवर लक्ष केंद्रित केले आहे. आगामी मुंबई महापालिकेच्या पार्श्वभूमीवर उत्तर भारतीय मतदारांचे मनोबल उंचावण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. त्यांची निर्णायक मतं बहुजन पार्टीकडे वळवण्यासाठी प्रयत्न केला जाईल. याच प्रयत्नाचा भाग म्हणून पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक प्रकाश आनंदी हे येत्या 9 नोव्हेंबरला मुंबई दौऱ्यावर येणार आहे. पक्षाने षण्मुाखानंद सभागृहात मेळावा आयोजित केला आहे. येत्या निवडणुकीत बहुजन समाजवादी पार्टीचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणून आमच्या शिवाय महापौर होणार नाही, असा ठाम निर्धार आम्ही केला आहे. या पार्श्वभूमीवर बहुजन समाजवादी पार्टी तळागाळात पोहचून उत्तर भाषिकांची मते आपल्याकडे वळवण्यासाठी प्रयत्न करेल. अशी अपेक्षा आहे असे बसपाचे महाराष्ट्राचे माजी सचिव आणि मुंबईचे माजी अध्यक्ष सुरेश विद्यागर यांनी सांगितले. सपाचे नेते अबू आझमी यांनी, सध्या यावर भाष्य करणे, योग्य नसल्याचे म्हटले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.