मुंबई : महाराष्ट्राच्या राजभावनामध्ये नाईक या पदावर असलेले प्रकाश शंकर सकपाळ यांनी नवी मुंबईमध्ये वसंत आहेर बिल्डरकडून घर खरेदी करताना बिल्डरने फसवणूक केली होती. तब्बल 19 वर्षानंतर मृत सकपाळ यांच्या पत्नी प्रतिभा सकपाळ याना अखेर न्याय मिळाला. मुंबई उच्च न्यायालयाने बिल्डरला घरचा ताबा देण्यास सांगितले आहे. तसेच साडेबारा लाख रुपये तीन महिन्याच्या आत जमा करण्याचे देखील आदेश दिले.
बिल्डरडून फसवणुक : प्रकाश शंकर सकपाळ, त्यांची पत्नी प्रतिभा सकपाळ दोन्हींच्या नावाने नवी मुंबईत घर खरेदीसाठी वसंत आहेर ह्या बिल्डरला विचारणा केली होती. त्याने नवी मुंबईतील एक घर यांना दाखवले, ते यांनी पसंत केले. सर्व व्यवहार झाला. मात्र, नवी मुंबई महापालिकेने ते बेकायदेशीर असल्याचे सांगितले. यानंतर बिल्डरने फसवले म्हणून ग्राहक न्यायालयामध्ये सकपाळ कुटुंबाने धाव घेतली. ग्राहक न्यायालयाने सकपाळ कुटूंबाच्या बाजूने निकाल दिला. मात्र तत्पूर्वी प्रकाश सकपाळ यांचा घर मिळत नसल्याच्या धक्क्याने मृत्यू झाला होता.
साडेबारा लाख द्या अन्यथा कारवाई : सुट्टीतील न्यायालयात न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या एकल खंडपीठासमोर बिल्डरचा जामीन अर्ज सुनावणीसाठी आला असता, न्यायालयाने त्याची गंभीर दखल घेतली. शेवटी, "प्रकाश शंकर सकपाळ आणि त्यांच्या पत्नीने बांधकाम व्यावसायिक वसंत आहेर यांच्याकडून नवी मुंबईत घर खरेदी केले होते, परंतु ते फसवे निघाले" असा निकाल दिला. त्यामुळे बिल्डर वसंत आहेर यांनी उर्वरित साडेबारा लाख रुपये सकपाळ कुटुंबीयांना परत करून त्यांच्या दोन्ही घरांचा ताबा तीन महिन्यांत द्यावा. अन्यथा कारवाई करण्यास तयार राहा असा निकाल दिला"
अखेर आम्हाला न्याय मिळाला : न्यायालयाच्या सुनावणीनंतर प्रतिभा शंकर सकपाळ यांनी ईटीव्ही भारत सोबत संवाद साधताना प्रतिक्रिया दिली की "माझे पती राजभवन मध्ये काम करत होते. आयुष्यभराची जमापुंजी जमा करुन आम्ही घर खरेदी केले. परंतु बिल्डर वसंत आहेर यांनी आमची फसवणूक केली. म्हणून बिल्डर वसंत आहेर यांना तुरुंगावास भोगावा लागला. मात्र उच्च न्यायालयाने अखेर आम्हाला न्याय दिला' अशी भावना त्यानी व्यक्त केली.
हेही वाचा -