ETV Bharat / state

Cyrus Mistry: सायरस मिस्त्री अपघात प्रकरण! याचिका फेटाळत याचिकाकर्त्यालाही दंड

उद्योगपती सायरस मिस्त्री अपघात प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका करण्यात आली होती. ही याचिका आज मंगळवार मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. या प्रकरणात पोलिसांकडून तपास योग्यपद्धतीने झाला नसल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती चपळगांवकर यांनी याचिकाकर्त्याला दंड ठोठावत याचिका फेटाळून लावली आहे.

Cyrus Mistry
सायरस मिस्त्री
author img

By

Published : Jan 17, 2023, 7:26 PM IST

मुंबई : उद्योगपती सायरस मिस्त्री प्रकरणात स्थानिक रहिवासी संदेश जेधे यांनी याचिका दाखल केली होती. मुंबई उच्च न्यायालयाने प्रश्न उपस्थित केला होता. यामध्ये सदर याचिकेतील मागण्यांकरता दंडिधिकारी कोर्टातही दाद का मागितली नाही. तसेच, याचिका करण्यामागील उद्दिष्ट काय? असा प्रश्न देखील याचिकाकर्त्याला मागील सुनावणी दरम्यान विचारला होता.

लवकरच निर्णय घेऊ : मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिकेत गाडी चालवणाऱ्या अनाहिता पंडोले नशेत असल्याचा याचिकाकर्त्यांचा वकिलांचा आरोप आहे. मात्र, सरकारी वकिलांनी हे आरोप फेटाळले आहेत. तपास योग्य दिशेनं सुरू असल्याचा दावा सरकारी वकीलांनी आज सुनावणी दरम्यान केला. आम्ही आमची पुढची कायदेशीर भूमिका काय असणार आहे यावर लवकरच निर्णय घेऊ, असे वकील एड विकार राजगुरू यांनी सांगितले आहे.

काय आहे प्रकरण : उद्योगपती सायरस मिस्त्री अपघात संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. सायरस मिस्त्री अपघात प्रकरणात पोलिसांकडून करण्यात आलेल्या तपासावर अनेक प्रश्न या याचिकेत उपस्थित करण्यात आले आहेत. पालघर पोलिसांकडून करण्यात येणाऱ्या तपासावर याचिकर्त्याचा अनेक आक्षेप घेण्यात आले आहे. यात दाखल गुन्ह्यात कलम 304 देखील लावण्यात लावा, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. पालघर येथील संदेश शिवाजी जेधे यांनी एड सादिक अली यांच्यामार्फत जनहित याचिका दाखल केली आहे.

कोण होते सायरस मिस्त्री? : सायरस मिस्त्री यांची ओळख एक यशस्वी उद्योगपती अशी होती. त्यांचा जन्म (दि. 4 जुलै 1968) साली झाला होता. (दि. 28 डिसेंबर 2012)रोजी त्यांना टाटा समूहाचे अध्यक्षपद देण्यात आले होते. त्यानंतर (दि. 24 ऑक्टोबर 2016)रोजी त्यांना या अध्यक्षपदावरुन हटवण्यात आले होते. ते टाटा समुहाचे सहावे अध्यक्ष होते. त्यानंतर हा वाद कोर्टातही गेला होता. भारतात आणि इंग्लंडमध्येही सर्वाधिक महत्तवाचे उद्योगपती अशा पदवीने त्यांना सन्मानित करण्यात आले होते.

हेही वाचा : CBI : उद्योगपती भोसलेंच्या आरोग्य तपासणीसाठी डॉक्टरांच्या समिती करावी, सीबीआयचा कोर्टात अर्ज

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.