ETV Bharat / state

"गुडमॉर्निंग, कदाचित ही अखेरची शुभसकाळ असेल,'' डॉ मनीषा जाधव यांची अखेरची पोस्ट

मुंबईत एका डॉक्टरचा कोरोनामुळे मृत्य झाला आहे. मनीषा जाधव असे त्यांचे नाव आहे. त्या स्वतः शिवडी क्षयरोग रुग्णालयाच्या प्रमुख होत्या. त्यांचे पतीही शताब्दी रुग्णालयात विभाग प्रमुख आहेत. दरम्यान मनीषा यांनी 'ही शेवटची सकाळ असेल' अशी पोस्ट केली होती.

author img

By

Published : Apr 21, 2021, 4:20 PM IST

Updated : Apr 21, 2021, 8:03 PM IST

Mumbai
Mumbai

मुंबई - शिवडी क्षयरोग रुग्णालयाच्या प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. मनीषा जाधव यांचे काल (20 एप्रिल) सकाळी कोरोनामुळे निधन झाले. त्यांनी दोनच दिवसांपूर्वी फेसबुकवर "ही शेवटची शुभसकाळ असेल" अशा आशयाची पोस्ट लिहिली होती. त्यानंतर त्यांचे निधन झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या निधनाबाबत महापौर किशोरी पेडणेकर यांनी दु:ख व्यक्त केले आहे.

कोरोनामुळे निधन -

मुंबई महापालिकेचे शिवडी येथे क्षयरोग रुग्णालय आहे. या रुग्णालयात प्रमुख वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. मनीषा जाधव काम करत होत्या. त्यांचे पती कांदिवलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात खातेप्रमुख या पदावर कार्यरत आहेत. यामुळे डॉ. मनिषा यांना ताप येत असल्याने कांदिवलीतील शताब्दी म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांना कोरोना झाल्याचे समोर आले. त्यांच्यावर उपचार सुरु असतानाच सोमवारी त्यांचे निधन झाले. त्या ५२ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती आणि मुलगा असा परिवार आहे. त्यांच्यावर उपचार सुरु असतानाच त्यांनी फेसबूकवर गुड मॉर्निंगची पोस्ट टाकली होती आणि मी पुन्हा या व्यासपीठावर भेटू शकणार नाही, अशी खंत व्यक्त करत आपल्या मृत्यूची पुसटशी कल्पना त्यांनी दिली होती.

महापौरांनी केले दुःख व्यक्त -

महापौर किशोरी पेडणेकर यांनी त्यांच्या जाण्याबाबत शोक व्यक्त केला आहे. डॉ. मनीषा जाधव या काळजीपूर्वक सर्वांची विचारपूस करायच्या, उत्तम काम करत असत. त्यांना कोरोनाची लागण झाली तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्या कर्तव्यदक्ष अधिकारी होत्या, आम्ही कर्तव्यदक्ष डॉक्टर गमावला, अशा शब्दात पेडणेकरांनी आपले दु:ख व्यक्त केले.

Jadhav
जाधव यांची अखेरची पोस्ट

काय आहे अखेरची फेसबुक पोस्ट -

"गुडमॉर्निंग , कदाचित ही अखेरची शुभसकाळ असेल. शरीर निघून जाते; मात्र आत्मा कायम राहतो, कायम राहतो '' अशा आशयाची पोस्ट डॉ. मनीषा जाधव यांनी फेसबुकवर शेअर केली होती. ही त्यांची शेवटची पोस्ट ठरली आहे.

Last Updated : Apr 21, 2021, 8:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.