मुंबई: नवी मुंबईत शिवकालीन ऐतिहासिक बेलापूर किल्ल्याचा विकास करण्यासाठी २०१८ मध्ये १८ कोटी खर्च करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी पुरातत्व विभागाची मान्यता घेतलेली नाही. परिणामी पुरातत्त्व विभागाच्या नियमानुसार काम झालेले नाही. आयआयटीने देखील कामावर ठपका ठेवला आहे. संबंधितावर कोणती कारवाई केली, अशी विचारणा शिंदे यांनी केली. तसेच बेलापूर किल्ल्याचा असुरक्षित यादीत समावेश करावा. सिडकोकडून देखभालीचे काम काढून घेऊन पुरातत्व विभागाकडे द्यावे, अशी मागणी केली. राज्य शासनाकडून नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले. बेलापूर किल्ल्याची देखभाल दुरुस्ती सिडकोने केली. किमया आर्किटेक्ट या ठेकेदाराला संवर्धन वास्तुशास्त्रज्ञाच्या सल्ल्याने काम दिले. पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालय संचालनालयाच्या निकषानुसार कामाला पूर्व परवानगी दिली. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे दुरुस्तींचे काम दर्जेदार झालेले नाही, असे पुरातत्व विभाग व वस्तु संग्रहालय विभागाच्या पाहणीत आढळून आले आहे. सिडकोने चौकशी समिती नेमली आहे. या दोन्ही समित्यांचा लवकरच अहवाल प्राप्त होईल, तसेच पुरातत्व विभागाला देखभालीचे काम हस्तांतरीत करण्यात येईल, असे मंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.
Announcement : बेलापूर किल्ला लवकरच पुरातत्व विभागाकडे हस्तांतरीत केला जाणार
नवी मुंबईतील बेलापूर किल्ल्याची दुरावस्था (Bad condition of Belapur fort) झाली आहे. प्रशासनाची अनास्था याला कारणीभूत असल्याची खंत आ. शशिकांत शिंदे (MLA Shashikant Shinde) यांनी विधान परिषदेत व्यक्त केली. तारांकित प्रश्नाद्वारे त्यांनी किल्ल्याच्या दुर्दशेकडे लक्ष वेधले. दरम्यान, लवकरच किल्ला पुरातत्व विभागाकडे हस्तांतरीत (The forts will soon be handed over to the Archaeological Department) केला जाईल, अशी ग्वाही राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे (Minister Eknath Shinde) दिली.