मुंबई : वर्षानुवर्षे दर महिन्याच्या ७ तारीखला कर्मचाऱ्यांना वेतन मिळायचे पण या महिन्यात सुद्धा १२ तारीख रोजी सुद्धा वेतन मिळालेले नाही. या विषयावर सरकारचे अर्थखाते गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून कामगार कामगारांची पीएफ, ग्र्याज्यूटी, बँक कर्ज व इतर मिळून ९७८ कोटी रुपयांची रक्कम थकली असून, वेतनावर अवलंबून असलेल्या विविध संस्था अडचणीत सापडल्या आहेत. या प्रकरणी मंत्रालयातील अर्थ खात्यातील अधिकारी हे सरकारला जुमानत नाहीत. किंबहुना एसटी महामंडळाच्या प्रस्तावाला हरताळ फासला आहे, असा आरोप महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी सरकारला विचारला आहे.
एसटी कर्मचाऱ्यांचा पगार रखडला : अर्थ खात्याचे प्रधान सचिव ओमप्रकाश गुप्ता आहेत.ते पूर्वी एसटीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक होते. खरे तर ज्यांनी आधी या संदर्भात प्रशासकीय अधिकारी म्हणून काम केलेला आहे तेच अधिकारी अर्थ खात्यामध्ये मंत्रालय मध्ये आता याबाबतचे काम सांभाळत आहे तेव्हा त्यांनी खात्याकडे फाईल आली असता त्यावर त्वरित मंजुरी देणं अपेक्षित आहे मात्र ती मंजुरी मिळाली नाही म्हणून हजारो एसटी कर्मचाऱ्यांचा पगार रखडलेला आहे.
न्यायालयाचा आदेश : 'राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा पगार 10 तारीख झाली तरी झालेल्या नाही यासंदर्भातील बातमी दोन दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाली त्याबाबत सरकारपर्यंत ते वार्तांकन गेलेले होते तरीही शासनाच्या वतीने अद्याप एसटी कर्मचाऱ्यांचा कामगारांच्या पगार बाबत निर्णय केलां नाही. म्हणजे शासनाने याबाबत न्यायालयाचा आदेश जो आहे तो जुमानत नाही, असे समजायचे काय असा देखील प्रश्न नाव न सांगण्याच्या अटीवर एसटी कर्मचाऱ्यांनी विचारलेला आहे.
चूल कशी पेटणार : या महिन्याच्या चार तारखेला ९५० कोटी वेतनासाठी मिळावेत असा प्रस्ताव सरकारच्या मंत्रालयातील अर्थ खात्याकडे एसटी महामंडळाने पाठवला आहे. त्यावर अर्थ खात्यातील अधिकारी निर्णय घ्यायला तयार नाहीत. यातून असा निस्कर्ष निघतो आहे की मंत्रालयातील अर्थ खात्यातील अधिकारी हे सरकारला जुमानत नाहीत. असेही बरगे यांनी म्हटले आहे. ज्या एसटी कर्मचाऱ्यांच्या कामगारांच्या पाच महिने आंदोलनामध्ये त्यावेळेला असलेले विरोधी पक्ष आज सत्तेमध्ये आहे. परंतु, सत्तेमध्ये असताना देखील एसटी कर्मचाऱ्यांचा पगार वेळेवर करू शकत नाही. एसटी कामगारांच्या घरात चूल कशी पेटणार याबाबत अद्यापही शासन उदयासिन असल्याचं यावरून स्पष्ट होत आहे.