ETV Bharat / state

Deccan Queen Express : पुढच्या महिन्यापासून नव्या रंग-रुपात धावणार दख्खनची राणी, नवे डबे मुंबईत दाखल

मुंबई ते पुण्यादरम्यान दररोज धावणाऱ्या आणि चाकरमान्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग असलेली दख्खनची राणी अर्थात डेक्कन क्वीन एक्स्प्रेस ( Deccan Queen Express ) आता नव्या व आकर्षक डब्यांसह धावण्यासाठी सज्ज झाली आहे. चेन्नई येथील इंटिग्रल कोच फॅक्टरी (आयसीएफ) मधून डेक्कन क्वीनसाठी नवे 16 डबे मुंबईत दाखल झाले आहेत. लवकरच डेक्कन क्वीनच्या डायनिंग डबलचा कोचही मुंबईत दाखल होणार असून मार्च महिन्यात नव्या रुपात आणि नव्या रंग रुपात डेक्कन क्वीन एक्स्प्रेस धावणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचा एका अधिकाऱ्याने दिली आहे.

दख्खनची राणी
दख्खनची राणी
author img

By

Published : Feb 28, 2022, 10:26 PM IST

मुंबई - मुंबई ते पुण्यादरम्यान दररोज धावणाऱ्या आणि चाकरमान्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग असलेली दख्खनची राणी अर्थात डेक्कन क्वीन एक्स्प्रेस ( Deccan Queen Express ) आता नव्या व आकर्षक डब्यांसह धावण्यासाठी सज्ज झाली आहे. चेन्नई येथील इंटिग्रल कोच फॅक्टरी (आयसीएफ) मधून डेक्कन क्वीनसाठी नवे 16 डबे मुंबईत दाखल झाले आहेत. लवकरच डेक्कन क्वीनच्या डायनिंग डबलचा कोचही मुंबईत दाखल होणार असून मार्च महिन्यात नव्या रुपात आणि नव्या रंग रुपात डेक्कन क्वीन एक्स्प्रेस धावणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचा एका अधिकाऱ्याने दिली आहे.

नव्या रंग-रुपात धावणार दख्खनची राणी

16 डबे मुंबई दाखल - भारतीय रेल्वेमध्ये प्रतिष्ठित आणि ऐतिहासिक रेल्वे असा मान मुंबई-पुणे डेक्कन क्वीनला आहे. या गाडीला चाकरमानी दख्खनची राणी म्हणून संबोधतात. जून 1930 पासून डेक्कन क्वीन हे मुंबई ते पुणे दरम्यान धावत आहे. तेव्हापासून या गाडीला डायनिंग कार आहे. दोन वर्षांपूर्वी या दख्खनची राणीला अत्याधुनिक लिंक-हॉफमन-बुश (एलएचबी) डबे लावण्याची योजना रेल्वेने आखली होती. मात्र, डायनिंग डब्यामुळे एलएचबी डबे जोडण्यात तांत्रिक अडचणी येत होत्या. मात्र, आता या अडचणींवर मात करून एलएचबी बनावटीची डायनिंग कार तयार करण्यात आली आहे. डेक्कन क्वीनला भारतीय रेल्वेमधील एलएचबी डायनिंग कार असलेल्या पहिल्या रेल्वेचा मान मिळणार आहे. सध्या चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरी (आयसीएफ)मधून डेक्कन क्वीनचे 16 डबे तयार हुन मुंबईत दाखल झाले आहेत.

लाल, हिरव्या आणि पिवळ्या रंग असणार - या ऐतिहासिक डेक्कन क्वीनचा रंग सुद्धा बदलण्यात आले आहे. रेल्वे मंत्रालयाने डेक्कन क्वीनसाठी लाल, हिरव्या आणि पिवळ्या पट्ट्यांसह "प्रतिबंधित इम्प्रेरियम" रंगाची छटा देण्यात आली आहेत. अहमदाबाद येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन (एनआयडी) च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी डेक्कन क्वीनने प्रवास करुन नियमित प्रवाशांशी संवाद साधल्यानंतरच रंग निश्चित करण्यात आला आहे. सध्या मध्य रेल्वेच्या दादर रेल्वे स्थानकांवर डेक्कन क्वीनचे नवीन 16 डबे दाखल झाले आहेत. आता एलएचबी डायनिंग कार लवकरच मुंबई दाखल होणार आहेत. त्यानंतर मार्च महिन्याचा शेवटी नव्या रंगात डेक्कन क्वीन एक्स्प्रेस धावणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचा एका अधिकाऱ्यांनी दिली आहेत.

असा असणार डायनिक कार - नवीन डायनिंग कार ही अपघातरोधक असणार आहे. एलएचबी डब्यांमुळे अपघाताची तीव्रता कमी होणार आहे. तर, डायनिंग कारमध्ये 10 टेबल असणार आहेत. यावर 40 प्रवासी बसू शकतील. तसेच नेहमीप्रमाणे प्रवाशांच्या पसंतीचे खाद्यपदार्थ प्रवाशांना मिळणार आहेत, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाच्यावतीने देण्यात आली.

हेही वाचा - Mini Train Matheran : माथेरानची राणी सुसाट; मध्य रेल्वेने मिनी ट्रेन चालवून दोन कोटी रुपयांची कमाई!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.