ETV Bharat / state

State Service : अखेर यश गाठलं! रंगकाम करणाऱ्या मजुराची मुलगी झाली अधिकारी; वाचा खास स्टोरी - Etv Bharat Marathi

काही दिवसांपूर्वीच राज्यसेवा आयोगाच्या परीक्षांचे म्हणजेच एमपीएससीच्या परीक्षांचे निकाल जाहीर झाले. या परीक्षांमधून आपल्या राज्याला अनेक नवे अधिकारी मिळणार आहेत. (State Service) या परीक्षांमधून अशीच एक उद्योग निरीक्षक आपल्या राज्याला मिळाले, तिचे नाव आहे रूपाली कापसे. रूपालीने या परीक्षेत यश संपादन करून उद्योग निरीक्षक होण्याचे मान मिळवला आहे. कसा होता रूपालीचा प्रवास? कसा केला त्याने अभ्यास? काय तयारी करावी लागली? याबाबत सविस्तर ईटीव्ही भारतने रुपालीसोबत संवाद साधला आहे.

State Service Pass Rupali Kaoase
राज्यसेवा उत्तीर्ण रूपाली कापसे
author img

By

Published : Jan 10, 2023, 8:26 PM IST

Updated : Jan 12, 2023, 10:21 PM IST

राज्यसेवा उत्तीर्ण रूपाली कापसे

मुंबई : या परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांची स्वतःची एक कहाणी असते. एक सक्सेस स्टोरी असते. रूपालीची देखील तशीच काहीशी आहे. रूपालीची ही सक्सेस स्टोरी आम्ही तिला विचारली असता रूपालीने सांगितलं की, "मी बारावीला असल्यापासून स्पर्धा परीक्षा देण्याचे नियोजन केलं होतं. (Special Story Of Rupali Kapase) पण, खऱ्या अर्थाने परीक्षेची सुरुवात केली ती पदवीच्या शेवटच्या वर्षाला असताना. सुरुवातीला मला मार्गदर्शन वगैरे तसे काही नव्हते. त्यातच दोन वर्ष कोरोना होता. त्यामुळे या काळात स्पर्धा परीक्षा झाल्या नाहीत. असा खूप स्ट्रगल करावा लागला आम्हाला अस रुपाली सांगते.

घरची परिस्थिती बेताची : घरची आर्थिक अडचणी प्रत्येकालाच असतात. मात्र, त्या अडचणींना आपण कवटाळून ठेवायचे की त्या अडचणींवर मात करून पुढे जायचे हे आपल्या हातात असते. मला सुद्धा काही आर्थिक अडचणी होत्या. मात्र, मी त्यांचा फार काही बाऊ केला नाही. माझी आई घरकाम करते तर वडील मजुरी करतात ते रंगकाम करतात. मला देखील काही आर्थिक अडचणी होत्या आणि मी या अडचणींवर मात करून पुढे जायचे ठरवले. मी चुनाभट्टी सारख्या परिसरामध्ये राहते. एका छोट्या चाळीत आमचे घर आहे. एका छोट्याशा घरात आमचे कुटुंब राहते. मी ज्या लायब्ररीमध्ये अभ्यास केला, ती लायब्ररी देखील फक्त दहा बाय दहाची आहे. त्यामुळे अडचणी बऱ्याच आल्या. मात्र, माझे ध्येय हे फिक्स होते. अभ्यास केला, वाचन केले आणि मी आज एक अधिकारी म्हणून तुमच्यासमोर आहे असा विश्वास तिने यावेळी व्यक्त केला.

महिला आयोगात काम : मी बीटेकला असताना आम्हाला स्टायपेंड मिळायचा. त्यावेळी त्या पैशांवर माझे थोडफार भागत होतं. त्यानंतर मी राज्य महिला आयोगात एक उपक्रमावर ट्रेनी म्हणून रुजू झाले. तिथून मला काही मानधन म्हणून थोडेफार पैसे मिळायला लागले. या मिळणाऱ्या पैशावर मी माझा आर्थिक खर्च भागवला आणि दुसऱ्या बाजूला मी माझ्या अभ्यास सुरूच ठेवला होता. आमचा डिजिटल लिट्रसीचा प्रोजेक्ट होता. त्या प्रोजेक्टमधून मिळणाऱ्या मानधनावर दोन वर्ष माझं घर चाललं. पण, आता मागची सहा महिने आम्ही खूप वाईट परिस्थितीतून जातोय असही ती म्हणाली आहे.

कंटाळवाणे आयुष्य जगू नका, आनंदी रहा : आतापर्यंत तुम्ही अनेक अधिकाऱ्यांच्या यशोगाथा ऐकल्या असतील. अनेक अधिकारी सांगतात मी सोळा तास अभ्यास केला, 18 तास अभ्यास केला. रात्र, जागून अभ्यास केला. या अभ्यास करण्यात ते त्यांचं आयुष्य काय जगले हे मात्र विसरून जातात. मात्र, रूपाली कापसे अशी एकमेव अधिकारी आहे जी सांगते अभ्यास करणे गरजेचे आहे. पण, त्यात तुम्ही तुमचं स्वतःचं आयुष्य जगणं देखील तितकाच महत्त्वाचा आहे. रूपाली यांनी सांगितलं की, "आपलं हे जीवन कधीही कंटाळवाण करून जगू नका. माझाच मला कंटाळा येईल इतका देखील मी अभ्यास केला नाही. माझं जवळपास पूर्ण शिक्षणाच गावाकडे झाल्यामुळे मी कधी शेतात जाऊन अभ्यास केला, कधी बागेत जाऊन अभ्यास केला आहे. त्याच्यामुळे मला अभ्यासाचा कंटाळा आला नाही. मी घरच सर्व सांभाळून अभ्यास करायचे. त्यामुळे इतरांप्रमाणे दहा ते बारा तास अभ्यास नाही केला. पण, गरजेपुरता करायचे आणि जेव्हा परीक्षा जाहीर व्हायच्या त्यावेळी थोडा अभ्यास वाढवायचे. बस इतकाच अभ्यास केला मी. मात्र, त्यामध्ये सातत्य ठेवल्याने हे यश आज पाहायला मिळाले असही रुपालीने यावेळी सांगितले आहे. शेवटी काय तर तुमच्या कामात सातत्य ठेवा यश नक्की मिळेल असच रुपाली सांगत आहे.

Last Updated : Jan 12, 2023, 10:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.