मुंबई - कोरोना विषाणूने संपूर्ण भारताला हादरून सोडले आहे. कोरोनावर विषाणूवर मात करण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. आपल्या जीवावर उदार होऊन नागरिकांची सेवा करण्यासाठी डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस कर्मचारी यांच्यासह सफाई कर्मचारीही मोलाचा वाटा उचलत आहेत. मात्र त्यांना मिळणाऱ्या वागणुकीमूळे कामगारांची कुचंबणा होत आहे. विक्रोळी येथील असलेल्या सफाई कामगारांच्या हरियाली आणि टागोर नगर चौकीत कोणतीही सुखसुविधा नसल्यामुळे त्यांचे हाल होत आहे.
कोरोना काळात मुंबईतील सफाई कामगारांची कुचंबणा
एकीकडे कोरोना काळात सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याला महत्व दिले जात असताना, सफाई कामगारांना मात्र अडचणींना सामना करावा लागत आहे. अपुऱ्या सुखसुविधेमुळे विक्रोळी येथील हरियाली आणि टागोर नगर चौकीत सफाई कामगारांच्या वस्तीत त्यांचे हाल होत आहेत.