मुंबई: विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Leader of Opposition Devendra Fadnavis) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS president Raj Thackeray) यांनी सभा घेऊन मुख्यमंत्री आणि शिवसेनेवर निशाणा साधला होता. आपणही सभा घेऊन विरोधकांना उत्तर देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होत. त्याच अनुषंगाने आज पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना इशारा देत, 14 मे ला मुंबईत होणाऱ्या सभेत विरोधकांवर हल्ला चढवणार असल्याचा इशारा दिला आहे.
मुंबईतील के. सी कॉलेजमध्ये भारतीय विमा कर्मचारी सेना महासंघाच्या रौप्य महोत्सव कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्र्यांनी हा इशारा दिला आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारच्या खाजगीकरण धोरणाला ही ठाकरे शैलीत टोला लगावला. "खाजगीकरणाची खाज वाढत चालली असून, कोठे कोठे खाजवणार माहित नाही" असा खरमरीत टोला मुख्यमंत्र्यांनी यावेळी नाव न घेता केंद्र सरकारला लगावला.
राजकारणामुळे देशाचे शत्रू बाजूला पडले, मात्र पक्षाच्या शत्रू कोण आहे? त्याचा सफाया करा, असे धोरण सुरू असल्याची टीकाही यावेळी त्यांनी केली. तसेच आवाहन स्वीकारून भगवा पुढे न्यायचा आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा हे आपले स्वप्न होते. भविष्यातही शिवसेनेचाच मुख्यमंत्री हवा हे आपले स्वप्न आहे.अजूनही ते स्वप्न अपूर्ण आहे. मात्र कधी स्वप्नातही आपण मुख्यमंत्री होऊ असे वाटले नव्हते. मी नाही तर माझा पक्ष एक नंबर राहिला पाहिजे असे आवाहन या कार्यक्रमाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी शिवसैनिकांना केले. यासोबतच विमा कर्मचाऱ्यांनी देशभर केलेल्या कामाचे कौतुक आपल्या भाषणातून मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.
हेही वाचा : BMC Bulldozer Action : मुंबईत ठाकरे सरकारचा बुलडोजर पटर्न; 'या' व्यक्तींवर कारवाई!