ETV Bharat / state

भांडुपमधील अपहरण झालेल्या चिमुकलीचा मृतदेह रेल्वे रुळावर आढळला; हत्येपूर्वी नराधमाचा अत्याचार - भांडुप चिमुकलीवर अत्याचार

अकरा वर्षीय लहान मुलीचा मृतदेह विद्याविहार स्थानकाजवळील रेल्वे रुळाजवळ पोलिसांना सापडला आहे. वैद्यकीय अहवालात लैंगिक चिमुकलीवर अत्याचार करून गळा दाबल्याने तिचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यानुसार भांडुप पोलिसांनी अपहरण, हत्या, बलात्कार आणि पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

प्रातिनिधीक छायाचित्र
author img

By

Published : Nov 11, 2019, 11:14 AM IST

मुंबई - भांडुपच्या सोनापूर परिसरातून अकरा वर्षीय चिमुकलीचे अपहरण झाल्याची घटना समोर आली होती. या मुलीचा मृतदेह विद्याविहार स्थानकाजवळील रेल्वे रुळाजवळ पोलिसांना सापडला आहे. याप्रकरणी एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वैद्यकीय अहवालात लैंगिक मुलीवर अत्याचार करून गळा दाबल्याने तिचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यानुसार भांडुप पोलिसांनी अपहरण, हत्या, बलात्कार आणि पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे भांडुप परिसरात घबराट पसरली असून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.

भांडुप येथील अपहरण झालेल्या चिमुकलीचा मृतदेह रेल्वेरूळावर आढळला

हेही वाचा - जंगलपरिसरात मुलीचा संशयास्पद मृतदेह आढळला

पीडित मुलगी आपल्या भावंडांसोबत ५ नोव्हेंबरला दुपारी चर्चगल्ली येथे खेळत होती. याचदरम्यान एक अनोळखी तरुण या ठिकाणी आला. तो तिला हात पकडून दुसऱ्या ठिकाणी घेऊन गेला. बराच वेळ मुलगी बेपत्ता असल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. परिसरातील दुकानांमधील सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात आले. एका कॅमेऱ्यामध्ये हा तरुण चिमुकलीला हात पकडून एलबीएस रोडच्या दिशेने जात असल्याचे दिसून आले. कुटुंबियांनी तत्काळ याबाबत तक्रार केली. तेव्हापासून पोलिस आणि कुटुंबीय तिला घेऊन जाणाऱ्याचा शोध घेत असताना विद्याविहार स्थानकानजीक रेल्वे रुळाजवळ मुलीचा मृतदेह सापडला. पोलिसांनी तिचा मृतदेह राजावाडी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. मृतदेहाचे शवविच्छेदन तज्ञ डॉक्टरांकडून करण्यात येणार आहे. याप्रकरणी संशयित आरोपीची पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे.

Intro:भांडुप येथील अपहरण झालेल्या मुलीचा मृतदेह विद्यविहार रेल्वे स्थानक जवळ आढळल्याने खळबळ

भांडुपच्या सोनापूर परिसरातून एका अकरा वर्षीय कुलसुम शेख  या लहान मुलीचं अपहरण झाल्याची घटना 5 नोव्हेंबर रोजी समोर आली होती आता या मुलीचा मृतदेह विद्याविहार रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे रुळाजवल पोलिसांना काल रात्री सापडला असून या प्रकरणी पोलिसांनी एका संशयित इसमाला ताब्यात घेतले आहे.Body:भांडुप येथील अपहरण झालेल्या मुलीचा मृतदेह विद्यविहार रेल्वे स्थानक जवळ आढळल्याने खळबळ

भांडुपच्या सोनापूर परिसरातून एका अकरा वर्षीय कुलसुम शेख  या लहान मुलीचं अपहरण झाल्याची घटना 5 नोव्हेंबर रोजी समोर आली होती आता या मुलीचा मृतदेह विद्याविहार रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे रुळाजवल पोलिसांना काल रात्री सापडला असून या प्रकरणी पोलिसांनी एका संशयित इसमाला ताब्यात घेतले आहे.

5 नोव्हेंबर रोजी कुलसुम आपल्या भावंडांसोबत भांडुपच्या सोनापूर परिसरातील चर्च गल्ली मध्ये दुपारच्या वेळी खेळत होती. यादरम्यान एक अनोळखी इसम त्या ठिकाणी आला आणि त्याने कुलसुमचा हात पकडून तिला त्या ठिकाणाहून घेऊन गेला . तिच्यासोबत खेळणाऱ्या भावंडांनी हा प्रकार तिचे वडील अब्दुल यांना सांगितला. अब्दुल यांनी लगेच परिसरात शोधाशोध केली परंतु त्यांना ती कुठेच आढळून आली नाही.अखेर रस्त्याशेजारी असलेल्या दुकानांमध्ये असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा अपहरणकर्ता आणि ती मुलगी दिसत होती. एक अज्ञात व्यक्ती एलबीएस मार्गावर तिला घेऊन जात असल्याचं त्यांच्या निदर्शनास आले. यानंतर भांडुप पोलीस ठाण्यामध्ये यासंदर्भात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.यादरम्यान भांडुप पोलिस आरोपीचा शोध घेत होते .यातच तिचा मृतदेह विद्यविहार रेल्वे स्थानक परिसरातील रुळाच्या बाजूला आढळून आल्याने खळबळ उडाली असून रेल्वे लोहमार्ग पोलिसांनी मृतदेह घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात पाठवला असून मृतदेहाचे शवविच्छेदन तज्ञ डॉक्टरांकडून करण्यात येणार आहे.याप्रकरणी संशयित आरोपीची पोलीस कसून चौकशी करीत आहेत.
Byt : मोहमद पपू (मुलीचे चुलता)Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.