ETV Bharat / state

Speaker Faces Difficulties : नियुक्ती होताच विधानसभा अध्यक्षांपुढे अडचणी - राहुल नार्वेकर

राज्यात रंगलेल्या सत्तेच्या सारीपाटावरील पुढच्या अंकात. अखेर भाजप व शिंदे गटाने अध्यक्षपदाची पहिली लढाई जिंकली. आणि राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) हे विधानसभा अध्यक्ष बनले. (the appointment is made) अध्यक्षपदासाठीची निवडपध्दत आणि शिंदे गटाने न पाळलेला व्हीप यावर काॅंग्रेस तसेच विरोधकांनी आव्हान दिले आहे. तर अध्यक्षांनी शिंदे गटाच्या गटनेत्याला मान्यता दिली आहे. हीच प्रकरणे त्यांच्या समोर अडचणी निर्माण ( the Speaker of the Assembly faces difficulties) करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Rahul Narvekar
राहुल नार्वेकर
author img

By

Published : Jul 3, 2022, 2:24 PM IST

Updated : Jul 3, 2022, 8:37 PM IST

मुंबई: विधानसभा अध्यक्षपदाची (Assembly Speaker) पहिली लढाई भाजप व शिंदे गटाने जिंकली. भाजप व शिंदे गटाचे उमेदवार राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) 164 मते मिळवत जिंकले. तर, मविआच्या राजन साळवींनी 107 मते मिळाली विधान परिषदत निवडणुकीत शिवसेनेला मतदान करणाऱ्या एमआयएमनेही मविआच्या उमेदवाराकडे पाठ फिरवली. सपा आणि एमआयएमचे मिळून तिघे आमदार तटस्थ राहीले. शिवसेनेचे आमदार आणि बंडखोर शिवसेना आमदारांत सभागृहात वाद होण्याची शक्यता होती पण निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडली.

निवडणुक पद्धतीवर आक्षेप: विधिमंडळ अधिवेशनाचे कामकाज सकाळी 11 वाजता सुरु झाले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवनिर्वाचित आमदारांची सभागृहाला ओळख करुन दिली. मतदानासाठी राहुल नार्वेकर यांचा प्रस्ताव भाजपने सादर केला. त्यानंतर आवाजी पद्धतीने मतदान झाले. त्यात नार्वेकर यांना बहुमत मिळाल्याचे चित्र होते. मात्र, आवाजी मतदान पद्धतीलाच मविआने आक्षेप घेतला. त्यामुळे आमदारांची शिरगणती करुन अध्यक्ष निवडला गेला. या प्रक्रियेसाठी विधानसभेच्या सभागृहाचे दरवाजे प्रक्रीया संपेपर्यंत दरवाजे बंद करण्यात आले होते महाविकास आघाडीने सरकारस्थापनेच्या वेळी याच पध्दतीचा अवलंब केला होता. तेव्हा भाजपने त्यावर आक्षेप घेतला होता. या संदर्भात न्यायालयात याचिकाही दाखल आहे. हेच कारण सांगुन राज्यपाल मधल्या काळात नव्या अध्यक्षाच्या निवडीला परवाणगी देत नव्हते मात्र यावेळी पुन्हा त्याच आक्षेपार्ह पध्दतीवर आक्षेप आहे.

शिवसेनेचा व्हीप पाळला नाही : महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांना मतदान करावे, असा व्हीप शिवसेनेने आपल्या आमदारांना बजावला होता. मात्र, शिंदे गटाने शिवसेनेचा व्हीप पाळला नाही. शिवसेनेच्या सर्व बंडखोर आमदारांनी भाजप उमेदवार राहुल नार्वेकर यांना मतदान केले. त्यामुळे राहुल नार्वेकर यांनी बहुमताचा आकडा सहज पार केला. अध्यक्षपदासाठी त्यांना 164 आमदारांनी मतदान केले. समाजवादी पक्षाचे आमदार अबु आझमी व रईस शेख तटस्थ राहिले. एमआयएमचे आमदारही तटस्थ राहिले. त्यांनी मविआ उमेदवाराला मत दिले नाही. त्यामुळे मविआ उमेदवार राजन साळवी यांना 107 मतेच मिळवता आली.

गोगावले यांची ठाकरे गटा बद्दल तक्रार: शिवसेनेचा व्हीप पाळला गेला नाही अशी तक्रार असताना शिंदे गटाकडून प्रतोद भरत गोगावले यांनी व्हीपविरोधात मतदान करणाऱ्या शिवसेनेच्या १६ आमदारांविरोधा तक्रार दाखल केली आहे. शिंदे गटाकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना त्या संदर्भात पत्र दिले आहे. अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात भरत गोगावले यांचा शिवसेनेचे प्रतोद असा उल्लेख करण्यात आला आहे. विधानसभा अध्यक्षांनी गोगावले यांच्या पत्राचे वाचन केले आणि महाविकास आघाडीच्या आक्षेपा सोबतच गोगावलेचे पत्रही कामकाजात पटलावर आनले.

शिवसेनेकडून शिंदे गटाची तक्रार: विधानसभा अध्यक्षांची निवडवणूक जाहीर होताच विधीमंडळाचे शिवसेनेचे पक्ष प्रतोद सुनील प्रभू यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व आमदारांना व्हीप जारी केला होता. महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांनाच सर्वांनी मतदान करावे, असा व्हीप आमदारांना देण्यात आला होता. व्हीप जारी केल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आक्रमक झाले. आमच्याकडे बहुमत असल्याने सुनील प्रभू यांनी जारी केलेला व्हीप आम्हाला लागू होत नाही, अशी प्रतिक्रिया शिंदे यांनी दिली मात्र कोणाचा व्हीप खरा हा कळीचा मुद्दा म्हणुन समोर आला.

ते सत्तापालटा होण्याची वाट पाहत होते का ? : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणीस यांचे भाषण सुरु होताना मध्येच उठून, गेले दीड वर्ष महा विकास आघाडी सरकार विधानसभा अध्यक्षाची निवड व्हावी अशी विनंती राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना करत होत. आम्हाला माहीत नाही ते कशाची वाट पाहत होते. मात्र राज्यात सत्तापालट झाल्यानंतर लगेच त्यांनी विधानसभा अध्यक्षाच्या निवडणुकीसाठी परवानगी दिली. कदाचित ते सत्तापालट होण्याची वाट पाहत होते का ? असा सवाल केला. तसेच महाविकास आघाडीकडून राज्यपाल नियुक्त आमदारांच्या निवडीसाठी 12 नावे पाठवण्यात आली. त्यांची नियुक्ती करावी अशी मागणीही त्यांनी केली.

राज्यपालांतला रामशास्त्री जागा झाला : अध्यक्षपदाच्या मतदान प्रक्रियेबद्दल महाविकास आघाडी विशेषत: काॅंग्रेसने मोठा आक्षेप नोंदवताना राज्यपालांच्या भुमीकेवर टीकास्त्र सोडले आहे. महाविकास आघाडी सरकार असताना नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर दीड वर्षापासून विधानसभा अध्यक्षाच्या निवडणूक घेण्यात यावी अशी विनंती राज्यपालांना करण्यात आली. मात्र राज्यपालांनी परवानगी दिली नाही मात्र आता राज्यात सत्ता बदलल्यानंतर राज्यपालांच्या आतला रामशास्त्री जागा झाला असा टोला काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी लगावला आहे.

लोकशाहीची पायमल्ली झाली : शिंदे गटाकडूनही संपुर्ण शिवसेना आमदारांसाठी व्हीप जारी करण्यात आला होता. शिवसेनेचा व्हिप झुगारून ३९आमदारांनी विरोधात मतदान केले. यामुळे लोकशाहीची पायमल्ली झाली. हे महाराष्ट्राची १३ कोटी जनता विसरणार नाही आणि इतिहासात याची नोंद घेतली जाईल. असे सांगत शिवसेना नेते शिवसेनेचे नेते सुनील प्रभू यांनी आपला संताप व्यक्त केला. आणि तसेच या प्रकाराबाबतची खंत संपूर्ण विधीमंडळाच्या आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात असेल. असेही स्पष्ट केले.

खुर्चीवर आपण कितीकाळ बसाल?: आज या अध्यक्षपदाच्या निवडीत सुरुवातीपासून ते आतापर्यंतचा क्रम होता. त्या क्रमामध्ये ज्या पद्धतीने ही निवडणूक झाली त्यात या सदनात आमचा व्हीप झुगारून ३९ सदस्यांनी या व्हीपच्या विरोधात मतदान केले, लोकशाहीची पायमल्ली केली हे देखील इतिहास कधी विसरणार नाही. त्यामुळे याची खंत असेल, असे नमूद करताना या विधीमंडळाचा कार्यकाल किती काळ असेल आणि त्या खुर्चीवर आपण कितीकाळ बसाल या बद्दलची शंका जनतेला आहे हे असे सांगत सुनील प्रभू यांनी अध्यक्षां समोरच्या अडचणींची जाणीव करुन दिली.

हेही वाचा : Rahul Narvekar : विधानसभा अध्यक्ष झालेल्या राहुल नार्वेकरांचा राजकीय प्रवास...

Last Updated : Jul 3, 2022, 8:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.