ETV Bharat / state

मुंबईत 25 हजारांसाठी 2 महिन्याच्या बाळाला चोरले; आरोपी तासात गजाआड - बाळ

26 जूनच्या पहाटेची ही घटना आहे. शहाबाज बक्षी शेख (26) असे त्या आरोपीचे नाव आहे.

मुंबई
author img

By

Published : Jun 28, 2019, 5:19 PM IST

मुंबई - माहीम परिसरातून फुटपाथवर झोपलेल्या एका महिलेचे 2 महिन्यांचे बाळ चोरून ते 25 हजार रुपयांना विकण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या आरोपीला दादर जीआरपी पोलिसांनी अवघ्या तासाभरात दादर रेल्वेस्थानकातून अटक केली आहे. तसेच ते बाळ सुखरूप त्याच्या आईकडे सोपवले आहे. 26 जूनच्या पहाटेची ही घटना आहे. शहाबाज बक्षी शेख (26) असे त्या आरोपीचे नाव आहे.

मुंबईत 25 हजारांसाठी 2 महिन्याच्या बाळाला चोरले; आरोपीला तासाभरात अटक

माहीम रेल्वे स्थानकाच्या बाहेर फुटपाथवर मधू अर्जुन परमार (30) ही महिला तिची दोन जुळी मूले चंदू व गणेश यांच्यासह झोपली होती. अचानक जाग आल्यावर मधूला तिच्या दोन मुलांपैकी चंदू हा गायब असल्याचे लक्षात आले. घाबरलेल्या मधूने माहीम पोलीस ठाण्यात बाळ हरवल्याची तक्रार दाखल केली. तक्रार दाखल केल्यानंतर पीडित महिला दादर रेल्वेस्थानकात आल्यावर तिने दादर रेल्वे पोलिसांना याबद्दल माहिती दिली. घटना जरी माहीम पोलिसांच्या हद्दीत घडली असली तरी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून दादर जीआरपी पोलिसांनी तत्काळ पहाटे 3 वाजता दोन टीम बनवून बाळाचा शोध घेतला असता, दादर रेल्वे स्थानकावरील मध्य व पश्चिम दिशेला जोडणाऱ्या स्काय वॉकखाली एक व्यक्ती बाळासह आढळून आला.

25 हजारांच्या मोबदल्यात बाळ चोरले

पोलिसांनी शहाबाज बक्षी शेख (26) या आरोपीला बाळाबद्दल हटकले असता आरोपीने उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन बाळ आईला दाखवले असता, चोरीला गेलेले हेच बाळ आपले असल्याचे मधू परमार हिने ओळखले. अटक करण्यात आलेल्या आरोपीला कळवा येथील एका व्यक्तीने 25 हजारांच्या मोबदल्यात बाळ चोरण्यास सांगितले होते. बाळ चोरून पहाटे 4 वाजता पहिल्या ट्रेनने आरोपी शहाबाज हा कळवा येथे जाऊन बाळाला विकणार असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे तात्काळ कारवाई करण्यात आल्याने 2 महिन्यांची बाळाची त्याची त्याच्या आईसोबत पुन्हा भेट झाली आहे. या संदर्भात पोलिसांनी कलम 363, 370, 34 नुसार गुन्हा नोंदवून माहीम पोलीस ठाण्याकडे गुन्हा वर्ग करण्यात आला आहे.

Intro:मुंबईतील माहीम परिसरातून फुटपाथवर झोपलेल्या एका महिलेच्या 2 महिन्यांच्या बाळ चोरून ते 25 हजार रुपयांना विकण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या आरोपीला दादर जीआरपी पोलिसांनी अवघ्या तासाभरात दादर रेल्वेस्थानकातून अटक करीत 2 महिन्यांच्याया बाळाला सुखरूप त्याच्या आईकडे सोपविले आहे. Body:ही घटना आहे 26 जून च्या पहाटेची , माहीम रेल्वे स्थानकाच्या बाहेर फुटपाथवर मधू अर्जुन परमार (30) ही महिला तिची दोन जुळी मूल चंदू (2 महिने), गणेश (2 महिने) यांच्यासह झोपली होती. अचानक जाग आल्यावर पीडित मधूला तिच्या दोन मुलांपैकी चंदू हा गायब असल्याचे लक्षात आले.घाबरलेल्या मधू ने माहीम पोलीस ठाण्यात बाळ हरविल्याची तक्रार दाखल केली. तक्रार दाखल केल्यानंतर पीडित महिला दादर रेल्वेस्थानकावर आल्यावर तिने दादर रेल्वे पोलिसांना याबद्दल माहिती दिली. गुन्हा जरी माहीम पोलिसांच्या हद्दीत घडला असला तरी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून दादर
जीआरपी पोलिसांनी तात्काळ पहाटे 3 वाजता दोन टिम बनवून बाळाचा शोध घेतला असता , दादर रेल्वे स्थानकावरील मध्य व पश्चिम दिशेला जोडणाऱ्या स्काय वॉक खाली एक इसम बाळासह आढळून आला. Conclusion:25 हजारांच्या मोबदल्यात बाळ चोरले

पोलिसांनी शहाबाज बक्षी शेख (26) या आरोपीला बाळाबद्दल हटकले असता आरोपीने उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन बाळ पीडित आईला दाखविले असता चोरीला गेलेले हेच बाळ आपले असल्याचे मधू परमार हिने ओळखले. अटक करण्यात आलेल्या आरोपीला कळवा येथील एका व्यक्तीने 25 हजारांच्या मोबदल्यात बाळ चोरण्यास सांगितले होते. बाळ चोरून पहाटे 4 वाजता पहिल्या ट्रेन ने आरोपी शहाबाज हा कळवा येथे जाऊन बाळाला विकणार असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे तात्काळ कारवाई करण्यात आल्याने 2 महिन्यांची बाळाची त्याची त्याच्या आईसोबत पुन्हा भेट झाली आहे. या संदर्भात पोलिसांनी कलम 363,370,34 नुसार गुन्हा नोंदवून माहीम पोलीस ठाण्याकडे गुन्हा वर्ग करण्यात आला आहे.

( बाईट- विश्वास पांढरे , पोलीस निरीक्षक , दादर जीआरपी)
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.