मुंबई- चेंबूर येथील एका खासगी रुग्णालयाच्या चुकीमुळे प्रसुती झालेल्या महिलेला आणि तिच्या ३ दिवसाच्या नवजात बाळाला पहिल्या चाचणीत कोरोना झाल्याचे समोर आले होते. याबाबतची बातमी सर्वात आधी 'ईटीव्ही भारत' ने दिली होती. याची दखल घेत आरोग्य विभागाने हे रुग्णालय सिल केले आहे. या प्रकरणी रुग्णालयाने हलगर्जीपणा केला का, याची चौकशी करून कारवाई केली जाईल, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.दरम्यान बाळाची आणि त्याच्या आईची कस्तुराब रूग्णालयात कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात बाळाची पहिली कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. बाळाच्या आईच्या रिपोर्टची वाट पाहिली जात आहे.
चेंबूर नाका येथील साई रुग्णालयामध्येच एक रूग्ण उपचार घेत होता. मात्र त्यात कोरोणाची लक्षणे आढळल्याने त्याला दुसरीकडे हलण्यात आले. पण ज्या विशेष वार्डात त्याला ठेवण्यात आले होते त्या वार्डाचे निर्जंतूकीकरण करणे आवश्यक होते. मात्र, असे न करताच विशेष वॉर्डमध्ये एका प्रसूती होणाऱ्या महिलेला ठेवण्यात आले. सिजरिंगद्वारे त्या महिलेला बाळ झाले. मात्र, प्रसुतीनंतर महिला आणि तीच्या नवजात बालकाला कोरोना झाल्याचे चाचणीतून समोर आले होते.
याबाबत सर्वात आधी 'ईटीव्ही भारत'ने माहिती दिली होती. त्यानंतर त्याची गंभीर दखल घेत पालिकेने साई रुग्णालय सिल केले आहे. या रुग्णालयातून कोरोनाचा प्रसार झाल्याने तसेच कोरोनाच्या रुग्णाची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाला दिली नसल्याने या रुग्णालयाला सिल लावण्यात आले आहे. सध्या या रुग्णालयाचे निर्जंतुकीकरण केले जात आहे. पुढील काही दिवस हे रुग्णालय बंदच राहणार आहे. दरम्यान, कोरोनाची लागण झालेल्या महिलेला आणि तिच्या बाळावर कस्तुरबा रुग्णालयात विलगीकरण वॉर्डमध्ये उपचार सुरू आहे. तर, या महिलेच्या पतीला अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.
आई आणि बाळाची कोरोनासंबंधी चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यात बाळाची पहिली चाचणी निगेटिव्ह आली आहे. या बाळाची दुसरी चाचणीही निगेटिव्ह आल्यास त्या बाळाला लवकरच घरी जाण्याची परवानगी मिळू शकणार आहे. तर रुग्णालयाने हलगर्जी केल्याचे सिद्ध झाल्यास रुग्णालय प्रशासनावर कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
हेही वाचा- कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतनाही लोकांची गर्दी कमी होईना...