मुंबई - लॉकडाऊन दरम्यान मुंबईतील बांद्रा-पश्चिम परिसरातुन मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली होती. या कारवाईत 11 इंडोनेशियन तबलिगी जमातच्या नागरिकांना अटक करण्यात आली होती. त्यांची पोलीस कोठडी उद्या (मंगळवारी) 28 एप्रिलला समाप्त होत आहे. यात 6 महिलांचा समावेश आहे.
दिल्लीत निजामुद्दीन येथे पार पडलेल्या मरकज येथे हे नागरिक सहभागी झाल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या इंडोनेशियन नागरिकांच्या बाबतीत पोलिसांना 1 एप्रिल रोजी माहिती मिळाली असता ही कारवाई करण्यात आली होती. 12 जणांच्या या समूहातील 2 जण कोरोना संक्रमित आढळून आले होते. यानंतर इतर 10 जणांना 20 दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात आले होते. या नागरिकांचा क्वारंटाईनचा काळ संपल्यानंतर 22 एप्रिल रोजी या 10 जणांना अटक करण्यात आली होती. या परदेशी नागरिकांवर कलम 188, 69, 270 संसर्गजन्य रोग प्रतिबंधक कायद्या नुसार कारवाई करण्यात आली आहे. न्यायालयात या नागरिकांना हजर केले असता 28 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
हेही वाचा - कोरोनाचा धसका; भंडाऱ्यात आढळला पहिला कोरोना रुग्ण