ETV Bharat / state

कासारवडवली हत्या प्रकरणात तक्रारदारच निघाला आरोपी! पोलिसांच्या तपासात 'असा' झाला उलगडा - हत्येचा पूर्वनियोजित कट

Thane Crime News : ठाण्याच्या कासारवडवलीत झालेल्या हत्येप्रकरणी मोठी माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या तपासात तक्रारदारच आरोपी असल्याचं सिद्ध झालंय. ही हत्या दीड कोटीच्या व्यवहारातून सुपारी देऊन झाल्याचं समोर आलंय. तसंच पोलीस अटकेतील आरोपीची कसून चौकशी करीत आहेत.

kasarvadavali murder case prosecutor turned out to be the accused
कासारवडवली हत्या प्रकरण; तक्रारदारच निघाला आरोपी!
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 12, 2023, 7:49 AM IST

ठाणे Thane Crime News : ठाण्याच्या कासारवडवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घटनेमुळं ठाणे शहरात एकच खळबळ उडालीय. पोलिसांच्या माहितीनुसार आनंदनगर विहंग व्हॅली चौकात सतीश पाटील या व्यक्तीची गाडी येताच सोबत असेलला भूषण पाटील खाली उतरला. त्याचवेळी आरोपींनी बसल्या जागीच सतीश पाटील यांच्यावर वार करुन हत्या केली. त्यानंतर हत्येचा पोबारा केला. या प्रकरणात तक्रार करणारा भूषण पाटील हाच आरोपी असल्याचं पोलिसांच्या तपासातून समोर आलंय.

नेमकं काय घडलं : पोलिसांच्या माहितीनुसार शनिवारी (9 डिसेंबर) संध्याकाळी सतीश पाटील (वय 55, रा. वर्तकनगर) आणि त्याचा मित्र भूषण बाळू पाटील (वय 40, रा.आनंदनगर) हे सोबतच कासारवडवली येथे सतीशच्या गाडीतून आले. विहंग व्हॅली चौकात आल्यानंतर गाडी थांबली अन् भूषण पाटील गाडीच्या खाली उतरला. त्यानंतर लगेच दुचाकीवर येत हल्लेखोरांनी सपासप वार करीत सतीशची हत्या केली. या गुन्ह्यात भूषण पाटील हाच तक्रारदार होता. मात्र, पोलिसांनी त्याची चौकशी केल्यानंतर त्यानं सुपारी देऊन हत्या केली असल्याची माहिती समोर आली. या प्रकरणी कासारवडवली पोलिसांनी आरोपी भूषण पाटील आणि नितीन पाटील या दोघांना अटक केली आहे. या हत्येत अन्य काहींचा सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळं पोलिसांनी चार पथकं बनवून फरार आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त परिमंडळ-5 चे अमरसिंग जाधव यांनी दिली.

फरार आरोपींच्या अटकेनंतर हत्येमागचं खरं कारण समोर येईल- अमरसिंग जाधव, पोलीस उपायुक्त

हत्येत सहभागी आरोपीनं केला बनाव : सतीशची हत्या झाल्यानंतर भूषण पाटीलनं स्वतःलाही इजा करून घेतली. तसंच याप्रकरणी तक्रार दाखल करत त्यानं पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता भूषण पाटील हाच खरा आरोपी असल्याचं समोर आलं. दरम्यान, या हत्येप्रकरणी सध्या दोघांची कसून चौकशी केली जात आहे. तर फरार आरोपी पकडल्यानंतर या हत्येमागचं नेमकं कारण काय याचा उलगडा होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचा -

  1. खळबळजनक! तरुणाला नग्न करून बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल
  2. Thane Crime News : धक्कादायक! आपल्या मुलाशी अनैतिक संबंध ठेवणाऱ्या महिलेचा बापाने कट रचून केला खून
  3. Thane Murder: २० वर्षीय चालकाची हत्या; मृतदेह लटकवला झाडाला, तर आरोपीचा शोध सुरू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.