ETV Bharat / state

Teachers Thalinad Agitation : संपामुळे परीक्षा व दहावी बारावीच्या उत्तरपत्रिका तपासण्याचे काम रखडले; सोमवारी शिक्षकांचे थाळी नाद आंदोलन

author img

By

Published : Mar 19, 2023, 10:55 PM IST

जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी पुकारलेल्या राज्यव्यापी संपामुळे दहावी व बारावी परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासण्याचे काम रखडले आहे. दरम्यान, शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे उद्या (20 मार्च) राज्यभरात होणार थाळीनाद आंदोलन होणार आहे. राज्यातील 50,000 पेक्षा अधिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या आंदोलनात सहभागी होणार आहेत.

Teachers Thalinad Agitation
शिक्षकांचे थाळी नाद आंदोलन

मुंबई : जुनी पेन्शन लागू होण्यासाठी आता शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कंबर कसलेली आहे. राज्यातील 50,000 पेक्षा अधिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उद्यापासून जोरदार थाळी नाद आंदोलन करणार आहेत. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी हे आंदोलन केले जाणार आहे. उद्यापासून राज्याच्या संपकऱ्यांना जोरदार पाठिंबा देण्यासाठी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी मैदानात उतरणार आहेत. दहावी बारावीच्या परीक्षांचे उत्तरपत्रिका तपासण्याचे काम ठप्प झालेले आहे. आता शाळा देखील ओस पडू लागलेल्या आहेत. त्यामुळे शिक्षण विभाग देखील आता संपाच्या फेऱ्यात आला आहे.

जुनी पेन्शन योजनेची मागणी : राज्यातील 2005 यावर्षीपासून शासकीय कर्मचारी निमशासकीय कर्मचारी यांना पेन्शन लागू होत नाही त्यावेळच्या शासनाने ही पेन्शन योजना बंद केली .त्याच्यानंतर अनेक वर्षे त्याबाबत आंदोलन देखील झाले. परंतु आता महाराष्ट्रातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच राज्य शासनाचे शासकीय कर्मचारी आणि निमशासकीय कर्मचारी या सगळ्यांनी एकत्रित संयुक्त लढा देण्याचा ठरवलेलं असल्यामुळे राज्यभरात जोरदार संप आंदोलन सुरू आहे.

शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सहभागी : राज्यव्यापी संप आंदोलनामुळे राज्यातील आरोग्य विभाग महसूल, कृषी , ग्रामविकास आणि पाणीपुरवठा तसेच शिक्षण विभाग यामधील सर्व सेवा ठप्प झालेल्या आहेत. त्यापैकी आरोग्य विभागाच्या सेवा पूर्णपणे कोलमडलेल्या आहेत. या सर्व परिस्थितीला पाहून शासनाने संप मिटावा यासाठी संपकऱ्यांना संप मिटवण्यासाठी आवाहन केलेले आहे. परंतु जुनी पेन्शन याबाबत शासन निर्णय करत नाही. आणि नवीन एक समिती जाहीर करते. याबाबत 19 लाख संपकऱ्यांमध्ये मोठा असंतोष आहे. या लाखो कर्मचाऱ्यांमध्ये चार लाख शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी देखील पूर्णपणे सहभागी झालेले आहेत.

मेस्मा कायद्याचे उल्लंघन : तसेच हा संप बेकायदेशीर असल्यामुळे या संपाला न्यायालयाने रोखावे, असा आरोप करीत वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये चार दिवसापूर्वीच याचिका दाखल केली. याचिकेत सरकारी पक्षाच्या वकिलांना विचारणा केली की जनतेला कोणकोणत्या सेवा सुविधा पुरवताना काय नेमकी परिस्थिती उद्भवलेली आहे. ते लिखितपणे सादर करा असे म्हटले. तर याचिकाकर्ते गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितले की, जरी त्यांचा संप करण्याचा अधिकार असला, तरी आणि त्यांच्या मागण्याशी मतभेद असले तरी हा संप बेकायदेशीर आहे. तो मेस्मा कायदा 2023 चे उल्लंघन करणार आहे. म्हणून तो बेकायदेशीर ठरवावा, अशी मागणी त्यांनी आपल्या याचिकेत केली आहे.

न्यायालय काय म्हणाले ? : या याचिकेतील मुद्द्यांना समजून घेत न्यायालयाने दोन्ही पक्षांना ठोस आकडेवारी आणि वस्तुनिष्ठ पद्धतीने माहिती सादर करण्यासाठी सांगितले. आणि पुढील सुनावणी देखील निश्चित केली तसेच संपकरांना नोटीस बजावली जाईल. हे देखील न्यायालयाने निक्षून सांगितलेला आहे.

आवाहनानंतरही संपकरी ठाम : या सर्व पार्श्वभूमीवर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी मात्र उद्यापासून राज्यभर अधिक तीव्रपणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी प्रत्येक जिल्हा आणि तालुका इथल्या तहसील कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय आणि मुख्य शासकीय कार्यालय येथे थाळीनात आंदोलन करतील, असा आजच्या बैठकीत त्यांनी निर्णय घेतला आहे.

हेही वाचा : Supriya Sule Appeal State Govt: 'सरकारने शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी, ईडी सरकार असंवेदनशील'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.