मुंबई : याप्रसंगी बोलताना किरीट सोमैय्या म्हणाले की, उद्धव ठाकरे आणि त्यांचे पार्टनर रवींद्र वायकर यांना हिशेब तर द्यावाच लागणार. तसेच किरीट सोमैया यांनी आपल्या जबाबमध्ये सांगितले आहे की, माझ्या जनहिताच्या उपक्रमांतून मला माहिती मिळाली आहे की, महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी उद्धव ठाकरे आणि आमदार रवींद्र वायकर यांच्या पत्नी, मनीषा रवींद्र वायकर, ह्यांनी गाव कोर्लई, तालुका मुरुड येथे मालमत्ता खरेदी करताना घोटाळा आणि फसवणूक केली आहे. ह्या माहितीच्या आधारे, मी शासकीय कार्यालय तसेच अलिबाग येथील जिल्हा परिषद रायगड व ग्रामपंचायत कोर्लई, तालुका मुरुड, जिल्हा रायगड इथून वेगवेगळे कागदपत्र जमा केले आहेत.
वसूल केलेल्या रकमेच्या नोंदीची प्रत : त्या कागदपत्रांवरून आणि विविध संबंधित व्यक्तींकडे चौकशी करताना, मला आढळले की अन्वय मधुकर नाईक हे अनुक्रमांक / गट क्रमांक 787, 788, 789, 790, 791,792,793, 795, 796, 797, 798, 799, 800 801, 802, 803, 804, आणि 805 ह्या गाव कोर्लई, ता. मुरुड, जि. रायगड येथील भूखंडांचे आणि त्यावर उभ्या असलेल्या बांधकामांचे मालक होते. ही बांधकामे अन्वय मधुकर नाईक आणि श्रीमती कुमुद मधुकर नाईक यांच्या नावावर नोंदवली गेली होती आणि ह्या ठिकाणी असलेल्या घरांचे मूल्यांकन देखील करण्यात आले होते ज्यासाठी ग्रामपंचायत रेकॉर्ड दिनांक 10/3/2011 रोजी रु. 7,191/- आणि दिनांक 20/10/2011 रोजी घर मूल्यांकन शुल्क म्हणून वसूल करण्यात आले होते. सन 2009- 2010 सालची, ग्रामपंचायत कोर्लई ह्यांनी आकारलेल्या आणि वसूल केलेल्या रकमेच्या नोंदीची प्रत देत आहे.
मुद्रांक शुल्क न भरता घोटाळा केला आहे? : पुढे किरीट सोमैया म्हणतात की, कागदपत्रांवरून असे आढळून येते की, सौ. रश्मी उद्धव ठाकरे आणि सौ. मनीषा रवींद्र वायकर यांनी सर्व ह्या सर्व मालमत्ता आणि त्यावर असलेली सर्व बांधकामे, विहिरी, झाडे इ. खरेदी केल्या आणि आणि त्याच्या विक्री करारनाम्याची दिनांक 30/04/2014 आणि दिनांक 29/05/2014 रोजी दुरुस्तीनाम्याद्वारे मुरुड येथील सब रजिस्ट्रार कार्यालयात रीतसर नोंदणी केली आहे. संबंधित कागदपत्रांच्या प्रती योग्य वेळी सादर केल्या जातील. ह्या कारारनाम्या आणि दुरुस्तीनाम्या मधून असे दिसते आहे की श्री. अन्वय नाईक आणि सौ. रश्मी ठाकरे आणि सौ. मनीषा वायकर यांच्यात झालेल्या व्यवहारात सदर मालमत्तेवर असलेली बांधकामे/घराचे मूल्यांकन करण्यात आलेले नव्हते आणि त्या बांधकामाचे मुद्रांक शुल्क भरण्यात आले नाही. अशा प्रकारे त्यांनी ही बांधकामे / संरचना विक्री कारारनाम्यात लपवल्या आहेत आणि त्या संरचनांवर मुद्रांक शुल्क न भरून घोटाळा केला आहे.
प्रकरण ठाकरे यांना महागात पडण्याची शक्यता : सरकारची फसवणूक केली आहे आणि ज्यामुळे मुद्रांक शुल्काच्या रूपात सरकारचे नुकसान झाले आहे. तसेच 2019 मध्ये सौ. रश्मी उद्धव ठाकरे आणि सौ. मनीषा रवींद्र वाकर यांनी ग्रामपंचायत कोर्लई, ता. मुरुड कडे अर्ज दाखल केला व ग्रामपंचायतीला विनंती केली की अनुक्रमांक / गट क्रमांक 787, 788, 789, 790. 791,792,793, 795, 796, 797, 798, 799, 800 801 802, 803, 804, आणि 805 या भूखंडांवरील जमिनीच्या मालमत्तेत उभी असलेली संरचना/ पंप शेड इ. त्यांच्या नावे नोंदवण्यात यावे आणि त्यांनी ग्रामपंचायत कोर्लई, ता. मुरुड मधे पाठपुरावा देखील केला. किड्स म्हणायच्या जबाबानंतर आता पुढील गोष्टींच्या तपासात अनेक बाबी निष्पन्न होणार असून हे प्रकरण ठाकरे यांना महागात पडण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वर्तवली जात आहे.