ETV Bharat / state

Thackeray Group New Plan : ठाकरे गटाच्या रडारवर शिंदे गटाचे उरलेले 24 आमदार; सुप्रीम कोर्टात खेळणार नवी खेळी - उद्धव ठाकरे

शिंदे गटातील 16 आमदार अपात्र झाले तर ठाकरे गट उरलेल्या 24 आमदारांना अपात्र ठरविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे. ही ठाकरे गटाची नवी खेळी असून अनिल परब सर्वोच्च न्यायालयात याबद्दलची याचिका दाखल करण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षभरापासून महाराष्ट्रातील सत्ता बदलापासून सर्वत्र अस्वस्थता आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये निकालानुसार राज्यातील सत्ता कुणाच्या बाजूने जाते हे अद्यापही पूर्णपणे सिद्ध झालेले नाही.

उद्धव ठाकरे
uddhav Thackeray
author img

By

Published : May 11, 2023, 7:41 PM IST

Updated : May 11, 2023, 8:34 PM IST

मुंबई : महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. शिंदे गटाकडून देण्यात आलेला व्हीप हा बेकायदेशीर असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. शिंदे गटातील 16 आमदारांचे भवितव्य आता विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयावर आहे. जर हे आमदार अपात्र झाले तर ठाकरे गट शिंदे गटात उरलेल्या आमदारावर अपात्रेच्या बॉम्ब टाकणार आहे.

ठाकरे गटाची नवी खेळी : शिंदे गटातील 16 आमदार अपात्र झाले तर ठाकरे गट उरलेल्या 24 आमदारांना अपात्र ठरविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे. ही ठाकरे गटाची नवी खेळी असून अनिल परब सर्वोच्च न्यायालयात याबद्दलची याचिका दाखल करण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षभरापासून महाराष्ट्रातील सत्ता बदलापासून सर्वत्र अस्वस्थता आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये निकालानुसार राज्यातील सत्ता कुणाच्या बाजूने जाते हे अद्यापही पूर्णपणे सिद्ध झालेले नाही. सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भातील निकाल सात सदस्यांच्या घटनापीठाकडे सोपवलेला आहे. परंतु सुरुवातीचे काही निरीक्षणे शिंदे गटाच्या विरुद्ध नोंदवले गेलेले आहेत. परंतु 16 आमदारांच्या अपात्रतेचा महत्त्वाचा मुद्दा या सुनावणीमध्ये आज स्पष्ट होणार आहे. जर 16 आमदार अपात्र झाले तर त्यानंतर पुढची खेळी खेळण्यासाठी ही नवीन याचिका उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने दाखल करण्याची हालचाली सुरू केल्या आहेत. राज्यपालांनी जी कृती केली होती त्या कृती संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी निरीक्षणे नोंदवत "ती कृती बेकायदेशीर" असल्याचे म्हटले. त्या आधारावर आता अनिल परब यांनी नवीन याचिका दाखल करणार आहेत. त्यामध्ये त्यांनी 16 आमदारांनंतर जे 24 आमदार शिंदे गटात उरले आहेत त्यांनादेखील अपात्र करण्याबाबतची ही नवीन याचिका असल्याचे म्हटले जात आहे.

याचिका दाखल करणार पण.. : उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने या नवीन याचिकेमार्फत जे 16 आमदार अपात्र करण्यासोबत शिंदे गटातील उरलेसुरले 24 आमदारदेखील अपात्र व्हावे. यासाठी ही खेळी असल्याचे म्हटले जात आहे. अनिल परब यांनी म्हणाले की " उरलेले 24 आमदारदेखील अपात्र व्हावे" याबद्दलची ही नवीन याचिका आहे. मात्र जोपर्यंत 16 आमदारांच्या संदर्भातील अपात्रतेचा निकाल लागत नाही, तोपर्यंत ही नवीन याचिका दाखल केली जाणार नसल्याचे सांगितले जात आहे.

अपात्र होणारे 16 आमदार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (आमदार, कोपरी-पांचपाखाडी) तानाजी सावंत (आमदार, भूम परंडा), अब्दुल सत्तार (आमदार, सिल्लोड) यामिनी जाधव (आमदार, भायखळा), संदीपान भुमरे (आमदार, पैठण), भरत गोगावले (आमदार, महाड), संजय शिरसाट (आमदार, छत्रपती संभाजीनगर पश्चिम), लता सोनावणे (आमदार, चोपडा), प्रकाश सुर्वे (आमदार, मागाठाणे), बालाजी किणीकर (आमदार, अंबरनाथ), बालाजी कल्याणकर (आमदार, नांदेड उत्तर), अनिल बाबर (आमदार, खानापूर), संजय रायमूलकर (आमदार, मेहेकर), रमेश बोरनारे (आमदार, वैजापूर), चिमणराव पाटील (आमदार, एरोंडोल), महेश शिंदे (आमदार, कोरेगाव).

हेही वाचा -

SC on Uddhav Thackeray Resigns : उद्धव ठाकरेंचा राजीमाना शिंदे-फडणवीसांचा विनर पाईंट

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाचा आमदार हसन मुश्रीफ, अनिल परब यांना दिलासा

Sanjay Raut Reaction: नैतिकतेच्या मुद्द्यावर शिंदे सरकारने राजीनामा द्यावा- संजय राऊत

Last Updated : May 11, 2023, 8:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.