ETV Bharat / state

Sharad Pawar News: ठाकरे गटाकडून शरद पवारांच्या राजकीय नेतृत्वावर प्रश्नचिन्ह, शरद पवारांनी दिले रोखठोक उत्तर - सामाना शरद पवार राजीनामा

सामानामधून आता थेट शरद पवारांच्या राजकीय नेतृत्वावर आणि फुटीर नेत्यांवर टीका करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे नेते व कार्यकर्त्यांमुळे शरद पवारांनी राजीनामा मागे घेतला. मात्र, त्यांना राजकीय वारस निर्माण करण्यात अपयश आल्याचे ठाकरे गटाने म्हटले आहे. त्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवार न्यूज
Sharad Pawar News
author img

By

Published : May 8, 2023, 10:04 AM IST

Updated : May 9, 2023, 10:51 AM IST

मुंबई - राष्ट्रवादीच्या अध्यक्ष पदाचा शरद पवारांनी राजीनामा देऊन वापस घेतल्यानंतरही राजकारणात पडसाद उमटत आहेत. ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनामधून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर निशाणा साधला आहे. शरद पवार हे राजकीय वारस निर्माण करण्यात अपयशी ठरल्याचे सामनात म्हटले आहे. यावर शरद पवार यांनी रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवार माध्यमांशी बोलताना म्हणाले, की आम्ही पक्षात काय करतो, हे संजय राऊतांना माहित नाही. विविध पातळ्यांवर पक्षात नेत्यांची फळी आहे.आम्ही काय करतो, हे आम्हाला ठाऊक आहे. आम्हाला त्यात समाधान आहे. त्यामुळे कुणी टीका केली तरी आम्ही लक्ष देत नाही. आम्ही कशाचीही प्रसिद्धी करत नाही. आमच्यालेखी अग्रलेखाचे महत्त्व नाही. तो आमच्या घरातला प्रश्न आहे, असे रोखठोक प्रत्युत्तर शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिले आहे.

सामनामधून शरद पवारांच्या राजीनाम्यामागे अंतर्गत गटबाजी असल्याचे यापूर्वीच म्हटले होते. आता, याचाच पुनरुच्चार करत अप्रत्यक्षपणे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लक्ष्य करण्यात आले. दुसरीकडे शरद पवारांच्या नेतृत्वावरदेखील ठाकरे गटाना प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सामानात म्हटले, की शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष पद सोडल्याने देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. मात्र, त्यांना पक्ष पुढे नेणारे नेतृत्व करता आले नाही. पवार हे मोठे राष्ट्रीय नेते असून त्यांच्या शब्दाला राष्ट्रीय राजकारणात मान आहे. मात्र, त्यांना वारस करण्यात अपयश आले. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर अनेकांना आपले कसे होणार याची चिंता वाटू लागले. कार्यकर्ते रस्त्यावर उतरून मनधरणी करू लागले. पवारांनी राजीनामा मागे घेणे ही भाजपला नौटंकी वाटते. मात्र भाजपने जगातील सर्वात मोठ्या नौटंकीबाज पंतप्रधान मोदींकडे पाहावे.

खरे मर्द कोण? शिवेसेनेतून फुटून एकनाथ शिंदे यांनी भाजपबरोबर संधान साधून सत्ता मिळविली आहे. यामुळे ठाकरे गटाने शिंदे गटासह भाजपवर टीका केली आहे. सामनामध्ये म्हटले, की भाजपमध्ये लोकशाही मार्गाने निवडणूक येण्याची क्षमता नाही. त्यासाठी ईडी, सीबीआयसारख्या संस्थांचा वापर करून विरोधकांविरोधात राजकारण करण्यात येते. भाजपसाठी बॅगा भरणाऱ्याने शंभर दिवस शेळी बनून जगायचे की एक दिवस वाघ बनायचे याचा विचार करावा. या बॅगा भरणाऱ्यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन केल्यास खरे मर्द कोण? असे म्हणत ठाकरे गटाने शिंदे गटावर निशाणा साधला आहे.

फुटीर नेत्यांवर टीका- पक्ष बदलण्याची तयारी असणाऱ्यांनी पक्ष सोडला नाही. पवारांनी राजीनामा मागे घेण्याशिवाय पर्याय नव्हता. मात्र, पक्ष कोठे आहे, याचा अंदाज पवारांनी घेतला आहे. शिवसेना सोडून गेले आहेत, त्यांची उकिरड्यावरील बेवारस कुत्र्यासारखी झाली आहे. तशीच अवस्था राष्ट्रवादी सोडून जाणाऱ्या सरदारांची होणार आहे. सीबीआय व ईडीचे भीतीने जे भाजपमध्ये जाणार आहेत, त्यांच्यावर कारवाईची तलावर लटकती राहणार आहे. सामनामधून शिंदे गटाच्या नेत्यांना बेवारस म्हटले तीव्र राजकीय प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.

दरम्यान, सामनामधील संपादकीयबाबत शरद पवार यांना सोलापूरमध्ये माध्यमांनी प्रतिक्रिया विचारली. त्यावर सामाना वाचून प्रतिक्रिया देऊ, अशी मिश्किल प्रतिक्रिया पवार यांनी दिली. रविवारी आमदार नितेश राणे यांनी खासदार संजय राऊत हे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचा दावा केला होता. त्यानंतर राजकारणात खळबळ उडाली होती. या आरोपानंतर दुसऱ्याच दिवशी सामानामधून राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारांवर टीका करण्यात आली आहे.

हेही वाचा-

Nitesh Rane On Sanjay Raut : संजय राऊत हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार; नितेश राणे यांचा मोठा दावा

Manipur Violence : महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना मणिपूरमधील शिवसेना कार्यालयात आसरा; मुख्यमंत्र्यांनी साधला संवाद

Sanjay Raut on BJP : 'कधी राम तर कधी हनुमान; निवडणुकांसाठी भाजपानं देवांना लावलं कामाला'

Last Updated : May 9, 2023, 10:51 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.