ETV Bharat / state

ठाकरे सरकार पूर्णपणे भ्रष्टाचारात गुंतलंय; युवा वॅारिअर्स यात्रेच्या माध्यमातून घरोघरी भाजप युवा योद्धा तयार करू - चंद्रशेखर बावनकुळे - thackeray government involved in corruption chandrashekhar bawankule

महाविकास आघाडी सरकार भ्रष्टाचाराबरोबरच ड्रग्सच्या सौदागरांना संरक्षण देण्यात व्यस्त आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला तुरुंगात पाठवण्याची धमकी देत आहेत. त्यांच्यावर वैयक्तिक हल्ले करत आहेत, हे निषेधार्ह आहे. याकडे मुंबईसह संपूर्ण देशातील जनता पाहत आहे.

chandrashekhar bawankule
चंद्रशेखर बावनकुळे
author img

By

Published : Oct 27, 2021, 3:11 PM IST

Updated : Oct 27, 2021, 4:41 PM IST

मुंबई - महाविकास आघाडी सरकार पूर्णपणे भ्रष्टाचारात गुंतले आहे. ड्रग्जच्या माध्यमातून आपले आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी तरुण-तरुणी उत्सुक आहेत. त्यांचा हा हेतू भाजप कदापि यशस्वी होऊ देणार नाही, असे भाजपचे प्रदेश सरचिटणीस आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. तसेच युवा वॅारिअर्स यात्रेच्या माध्यमातून गावा-गावात, घरोघरी जाऊन आम्ही भाजप युवा योद्धा तयार करू, असेही त्यांनी सांगितले. ते मुंबई भाजप कार्यालय वसंत स्मृती येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

पत्रकार परिषदेत बोलताना भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे

युवा वॅारिअर्स यात्रेचा दुसरा टप्पा सुरू होत आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री व विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसजी यांच्या संकल्पनेने मुंबई भाजपा अध्यक्ष व आमदार मंगल प्रभात लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईत ५ लाख युवा वॉरियर्स या प्रवासात जोडले जातील, अशी माहिती बावनकुळे यांनी दिली.

जनताच सरकारला उत्तर देईल -

ते म्हणाले, महाविकास आघाडी सरकार भ्रष्टाचाराबरोबरच ड्रग्सच्या सौदागरांना संरक्षण देण्यात व्यस्त आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला तुरुंगात पाठवण्याची धमकी देत आहेत. त्यांच्यावर वैयक्तिक हल्ले करत आहेत, हे निषेधार्ह आहे. याकडे मुंबईसह संपूर्ण देशातील जनता पाहत आहे. याचे सडेतोड उत्तर मुंबईसह महाराष्ट्रातील जनता आगामी निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारला देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा - माझ्या नावात कोणीतरी छेडछाड केली - ज्ञानदेव वानखेडे

ठाकरे सरकारच्या विरोधात जनआक्रोश आहे. राज्यात अनेक प्रश्न प्रलंबित असून भ्रष्टाचाराच्या घटना समोर येत आहेत. शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही. महिलांवरील अत्याचार वाढत आहेत. यावर सरकारचं नियंत्रण राहिलं नाही. असे असतानाही मुख्यमंत्री मंत्रालयात येत नाहीत. ठाकरे सरकारचे सर्व आमदार आपल्या गावापुरते आणि मुख्यमंत्री वांद्रेपुरते मर्यादित असल्याची टीकादेखील चंद्रशखेर बावनकुळे यांनी केली.

Last Updated : Oct 27, 2021, 4:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.