ETV Bharat / state

Thackeray Fraction in SC : ठाकरे गट पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीत, नेमकं कारण काय? - अजित पवार गट

Thackeray Fraction in SC : ठाकरे गटानं आमदारांवर कारवाई करण्यासंदर्भात विधिमंडळ सचिवांना दोन वेळा पत्र देऊनही आतापर्यंत कुठलीही कारवाई झाली नाही. त्यामुळं ठाकरे गट पुन्हा सुप्रीम कोर्टात धाव घेणार असल्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येतेय.

Thackeray Fraction in SC
Thackeray Fraction in SC
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 19, 2023, 12:06 PM IST

मुंबई Thackeray Fraction in SC : ठाकरे गटानं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे वेळकाढूपणा करतात, असा आरोप सर्वोच्च न्यायालयात केला गेला होता. यानंतर सर्वोच्च न्यायालयानं दोन दिवसांपूर्वी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना वेळापत्रक तयार करा असे निर्देश देत चांगलचं सुनावलं होतं. यानंतर आता ठाकरे गटानं विधिमंडळ सचिव जितेंद्र भोळे यांच्या विरोधातही सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी सुरू केलीय. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी जितेंद्र भोळे यांना आमदार अपात्रतेबाबत प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्त केलंय. त्यांच्याकडं आमदार अपात्रता प्रकरणाबाबत कार्यवाही करण्याची जबाबदारी आहे. हे पदही घटनात्मक असल्यानं त्यांनीदेखील सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशानुसार वेळेत कार्यवाही करायला हवी, अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून केली जात आहे.

पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाण्याचं कारण काय? : विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी जितेंद्र भोळे यांना आमदार अपात्रतेसंदर्भात प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्त केलंय. परंतु, नियुक्ती झाल्यापासून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून विधिमंडळाच्या सचिवांना दोन वेळा अधिकृत पत्र दिलंय. त्यानंतरही आमदार अपात्रतेबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही; असं उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं म्हणणं आहे. त्यामुळंच आता जसं राहुल नार्वेकर यांना सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश प्राप्त झाले. त्याचप्रमाणे सर्वोच्च न्यायालयानं आता विधिमंडळाच्या सचिवांनाही निर्देश द्यावेत. जेणेकरुन आमदार पात्र-अपात्रतेबाबत निकाल येईल; त्यादृष्टीनं सर्वोच्च न्यायालयात पुन्हा स्वतंत्र याचिका दाखल होण्याची शक्यता आहे.

हिवाळी अधिवेशनापर्यंत कारवाई लांबणार : दरवर्षीप्रमाणे विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन काही दिवसांवर येऊन ठेपलंय. जोपर्यंत हे अधिवेशन होत नाही. तोपर्यंत आमदार अपात्रतेबाबत कारवाई सुरू होणार नाही. आधीच विधानसभा अध्यक्षांनी यांनी वेळ घेतला आहे. आता विधिमंडळ साचिव यांनी तरी वेळेत कार्यवाही करावी. त्याबाबतीत वेळापत्रक जारी करावं, असं म्हणत ठाकरे गटानं न्यायालयाचं लक्ष वेधलंय.

परस्परांविरोधात याचिका : सर्वोच्च न्यायालयात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं नीलम गोऱ्हे, आमदार मनीषा कायंदे आणि विप्लव बजोरिया ह्या आमदारांना अपात्र करावे संदर्भात याचिका दाखल केलीय. तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं पवार गटाकडून जयंत पाटील यांनी अजित पवार गटात गेलेले आमदार सतीश चव्हाण, अमोल मिटकरी, विक्रम काळे, अनिकेत तटकरे यांच्या अपात्रतेबाबत याचिका केलेल्या आहेत. शिवाय अजित पवार गटाकडून आमदार जितेंद्र आव्हाड यांनी रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या अपात्रतेबाबत याचिका दाखल केलेली आहे.

हेही वाचा :

  1. Rahul Narwekar Met CM : राहुल नार्वेकरांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; अर्धा तास बंद दाराआड चर्चा कशावर?
  2. Rahul Narvekar On MLA Disqualification : असंवैधानिक काय ते आधी ठरवावं लागेल; आमदार आपात्र प्रकरणावर राहुल नार्वेकरांनी सुनावलं
  3. Sanjay Raut on Rahul Narvekar: आमदार अपात्रता प्रकरण रखडल्यानं संजय राऊत संतप्त.. म्हणाले राहुल नार्वेकर हे चोरांचे...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.