ETV Bharat / state

ठाकरे कुटुंबाचे बिल्डरांसोबत व्यावसायिक संबंध; किरीट सोमैयांचा पुन्हा निशाणा - किरीट सोमैयांची शिवसेनेवर टीका

अन्वय नाईक प्रकरणावरून भाजप नेते किरीट सोमैया यांनी ठाकरे कुटुंबीयांवर पुन्हा निशाणा साधला आहे. तसचे ठाकरे कुटुंबाचे बिल्डरांशी व्यावसायिक संबंध असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

किरीट सोमैयांचा ठाकरेंवर पुन्हा निशाणा
किरीट सोमैयांचा ठाकरेंवर पुन्हा निशाणा
author img

By

Published : Nov 19, 2020, 5:36 PM IST

Updated : Nov 19, 2020, 6:12 PM IST

मुंबई - वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणाची पुन्हा एकदा चौकशी सुरू केल्यानंतर भाजप नेते किरीट सोमैया हे सातत्याने शिवसेनेवर निशाणा साधताना दिसून येत आहेत. तसेच त्यांनी नाईक आणि ठाकरे कुटुंबीयामध्ये झालेल्या जमीन व्यवाहाराचे प्रकरणही उघडकीस आणले आहे. त्याच अनुषंगाने सोमैया यांनी आणखी एक सवाल उपस्थित केला आहे. मृत अन्वय नाईक कुटुंबीयांकडून रश्मी उद्धव ठाकरे आणि मनीषा वायकर यांनी जमीन विकत घेण्याचे कारण काय? असा सवाल किरीट सोमय्या यांनी केला आहे. तसेच ठाकरे कुटुंबीयांचे बिल्डर सोबत व्यावसाईक संबंध असल्याचा आरोप पुन्हा एकदा केला आहे. आदित्य ठाकरे हे मंत्री पदावर असताना 2 कंपन्यांमध्ये पार्टनर होते, असाही आरोपही किरीट यांनी केला आहे. ते मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

किरीट सोमैयांचा पुन्हा निशाणा

काय केले आहेत आरोप

मी ठाकरे कुटुंबीयांना 5 प्रश्न विचारले होते, ज्यांची उत्तरे मिळालेली नाहीत. संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत. ठाकरे परिवाराचा व्यवसाय काय आहे? जमीन विकणे घेणे, बांधकाम करणे यात आपले भागीदार कोण आहेत? आदित्य व उद्धव यांनी ठाण्यातील मोठे बिल्डर अजय आशर यांच्या सोबत भागीदारी केली आहे. असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

जमिनीवरून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा-

ठाकरे कुटुंब बिल्डर अजय आशर सोबत बांधकाम व्यवसाय करतात का? उद्धव ठाकरे यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले होते. त्यात त्यांच्या कुटुंबीयांची माहिती देण्यात आली आहे. ज्यामध्ये रश्मी ठाकरे यांना उद्धव ठाकरे यांनी एक जमीन भेट दिली आहे. कर्जतच्या जमिनीचा उल्लेख आहे. या बाबत उद्धव ठाकरे यांनी स्पष्टीकरण करावे. कारण काही गोष्टी लपविण्यासाठी एकच सर्वे नंबर दोन ठिकाणी दाखविण्याचे काय कारण आहे? असा सवाल किरीट सोमय्या यांनी केलाय.

आदित्य ठाकरे यांचे प्रतिज्ञा पत्र पाहिले असता, ते मंत्री सोबत व्यावसायिक सुद्धा आढळून येतात. एका हेबिक्स फूड कंपनीत डेसिग्नेटेड पार्टनर म्हणून दर्शविण्यात आले आहेत. दोन कंपनीतून त्यांनी राजीनामा दिलाय. मात्र तुम्ही त्या आगोदर मंत्री सुद्धा होता आणि व्यवसाय करत होता. या बद्दल उद्धव ठाकरे यांनी स्पष्टता करावी, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे. तसेच मोठ मोठे बिल्डर ठाकरे कुटुंबीय सोबत व्यवसाय करत असल्याचाही आरोप सोमैया यांनी केला आहे.

Last Updated : Nov 19, 2020, 6:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.